भारतीय अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचा वाटा वाढणार, 2034 पर्यंत 1 लाख 30 कोटींचे योगदान

030 पर्यंत सात कोटी अतिरिक्त घरांची मागणी निर्माण होणार आहे. तसेच 45 लाखांहून जास्त रकमेच्या घराची मागणी 87.4 टक्के असणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या वाढीमुळे सरकारी महसूल आणि बँकिंग परिसंस्थेच्या वाढीसोबतच दरडोई उत्पन्नातही वाढ होणार असल्याचं क्रेडाईनं म्हटलंय.

desktop

‘जीडीपी’च्या योगदानातही बांधकाम क्षेत्राचे योगदान वाढणार

28 कोटी नागरिकांचं घर खरेदीचे स्वप्न 

विकसित भारत निर्मितीत बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा

भारतीय अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. तसेच आगामी काळातही बांधकाम क्षेत्राचे योगदान वाढत जाणार आहे. 2034 या आर्थिक वर्षापर्यंत बांधकाम क्षेत्र एक लाख तीस हजार कोटी डॉलर होणार आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत 13.8 टक्के होणार आहे. तर 2047 पर्यंत बांधकाम क्षेत्र 5.17 लाख कोटी डॉलर म्हणजेच अंदाजित जीडीपीच्या साडे सत्तरा टक्के होणार आहे,असा अंदाज ‘क्रेडाई’नं वर्तवला आहे.

28 कोटी नागरिकांचं घर खरेदीचे स्वप्न 

देशात सध्या चाळीस कोटी लोकसंख्येपैकी 28 कोटी लोकांना घर खरेदी करायचे आहे. 2030 पर्यंत सात कोटी अतिरिक्त घरांची मागणी निर्माण होणार आहे. तसेच 45 लाखांहून जास्त रकमेच्या घराची मागणी 87.4 टक्के असणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या वाढीमुळे सरकारी महसूल आणि बँकिंग परिसंस्थेच्या वाढीसोबतच दरडोई उत्पन्नातही वाढ होणार असल्याचं ‘क्रेडाई’नं म्हटलंय.

भारतातील बांधकाम क्षेत्राची परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित करणाऱ्या ‘ विकसित भारताची उभारणी’ या अहवालाचे ‘क्रेडाई’ने प्रकाशन केले आहे. या अहवालानुसार भारतीय बांधकाम क्षेत्राची सध्याची बाजारपेठ 24 लाख कोटी रुपये आहे. ही बाजारपेठ निवासी विभागात 80 टक्के आणि वाणिज्य विभागात वीस टक्के आहे.  निवासी विभागामध्ये सध्याच्या पुरवठ्यापैकी 61 टक्के घरांचा पुरवठा हा सरासरी 45 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचा आहे. घरांचे सरासरी क्षेत्रफळही वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढत आहे.

विकसित भारत निर्मितीत बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा

देशाला 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था करण्याच्या प्रवासात बांधकाम क्षेत्राची निर्णयाक भूमिका आहे. सध्या बांधकाम क्षेत्र निर्णायक वळणावर उभे आहे. बांधकाम क्षेत्राच्या प्रभावामुळे आणि वाढत्या मागणीमुळे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीमध्येही वाढ होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी दिली आहे.

Published: March 19, 2024, 15:32 IST