प्रीमियम वाढला म्हणून मेडिक्लेम बंद करू नका

मागच्या काही वर्षात मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे, त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स कंपन्यांनी प्रीमियममध्ये खूप मोठी वाढ केली आहे. त्याच बरोबर, प्रत्येक 5 वर्षाच्या स्लॅबनंतर मेडिक्लेमचा प्रीमियम वाढतो. अचानक प्रीमियम वाढल्यामुळे, लोकं कव्हर कमी करण्याचा किंवा पॉलिसी बंद करण्याचा विचार करतात, मात्र ही सर्वात मोठी चूक आहे.

प्रीमियम वाढला म्हणून मेडिक्लेम बंद करू नका

सुमित त्याच्या मेडिक्लेम पॉलिसीचं रिन्यूअल करायचं विसरून गेला आणि त्याची पॉलिसी लॅप्स झाली. तो कामासाठी दिल्लीला गेला होता, त्या गडबडीत प्रीमियम भरायचं लक्षात राहिलं नाही. परत घरी आल्यावर त्याच्या लक्षात आलं कि ड्यू डेट आणि ग्रेस पिरिअड दोन्ही निघून गेले आहेत. मात्र, यामागे ऑफिसच्या कामात बिझी असणं केवळ एवढंच कारण नाहीये. सुमितने 2015 मध्ये मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली होती, मात्र तेव्हापासून मागच्या 8 वर्षात त्याचा एकदाही क्लेम आला नाही. तसेच, त्याने जेव्हा पॉलिसी घेतली होती तेव्हा त्याचं वय कमी होतं. नंतर वय वाढलं आणि आता कोविडनंतर कंपन्यांनी प्रीमियममध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे, एवढा प्रीमियम कशाला भरायचा असा विचार तो करत होता. या वर्षी तो रिन्यूअल संदर्भात सिरिअस नव्हता. मात्र. अश्या प्रकारे विचार केला तर सुमितला तो नंतर महागात पडू शकतो. जस जसं त्याचं वय वाढेल तशी त्याला मेडिक्लेमची गरज भासेल. या दरम्यान त्याला एखादा आजार झाला तर त्याला कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, जरी मिळाला तरी त्याचा प्रीमियम जास्त असेल आणि अनेक वर्षांचा वेटिंग पिरिअड असेल.

मागच्या काही वर्षात मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे, त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स कंपन्यांनी प्रीमियममध्ये खूप मोठी वाढ केली आहे. त्याच बरोबर, प्रत्येक 5 वर्षाच्या स्लॅबनंतर मेडिक्लेमचा प्रीमियम वाढतो. उदारणार्थ, 26 ते 30 वयोगटासाठी एक प्रीमियम असतो, मात्र पॉलिसीहोल्डरचं वय वाढलं आणि 31 झालं की नवीन स्लॅबनुसार प्रीमियम भरावा लागतो. अचानक प्रीमियम वाढल्यामुळे, लोकं कव्हर कमी करण्याचा किंवा पॉलिसी बंद करण्याचा विचार करतात, मात्र ही सर्वात मोठी चूक आहे. आपण काही वर्षांपूर्वी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली असेल, तर त्यामध्ये आपल्याला नो क्लेम बोनस मिळालेला असतो. तसेच, वेटिंग पिरिअड संपलेला असतो. त्यामुळे, जुनी पॉलिसी बंद करणं हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. आपल्याला दुसऱ्या कंपनीची चांगली पॉलिसी मिळत असेल, तर आपण पॉलिसी पोर्ट करू शकतो. मात्र, पॉलिसी बंद करणं हे खूप धोकादायक आहे.

बरेच लोकं प्रीमियम वाढला म्हणून पॉलिसी बंद करत नाहीत, मात्र ते कव्हर कमी करतात. आपल्या बजेटमध्ये जेवढा कव्हर बसेल तेवढाच कव्हर ते घेतात. मात्र, मेडिकल इन्फ्लेशनमध्ये खूप मोठी वाढ होतीये. मग अश्या परिस्थितीत आपण कव्हर वाढवला पाहिजे. असं न करता आपण जर कव्हर कमी केला आणि अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली, तर मात्र आपली अडचण होऊ शकते. समजा आपला 10 लाख असणारा कव्हर आपण 5 लाख रुपये केला. त्यामुळे आपली दर वर्षी प्रीमियममध्ये 5 किंवा 10 हजार रुपयाची बचत होईल, मात्र पुढच्या काही वर्षात ऍडमिट करावं लागलं आणि 10 लाख रुपये बिल आलं तर मेडिक्लेममधून केवळ 5 लाख रुपये मिळतील. बाकीचे 5 लाख रुपये आपल्याला खिशातून भरावे लागतील. म्हणजेच काय तर 5 किंवा 10 हजार वाचवायच्या नादात 5 लाखाचा फटका बसू शकतो. त्यामुळे, आपण इतर कोणत्याही गोष्टींमध्ये काटकसर करायला हरकत नाहीये. मात्र, मेडिक्लेमचा प्रीमियम भरताना कोणतीही काटकसर करू नका. बजेटमध्ये नसेल तरी काहीही करून पॉलिसी रिन्यू करत राहा, नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल.

Published: January 25, 2024, 12:12 IST