SIP चालू करण्यापूर्वी कोणते कागदपत्र पाहावे?

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्र नीट वाचावीत. आपल्यापैकी अनेकांनी अश्या प्रकारची जाहिरात पहिली असेल, पण योजनेशी संबंधित कागदपत्र म्हणजे नक्की काय, हे कोणते कागदपत्र आहेत, त्यामध्ये अशी कोणती महत्वाची माहिती असते आणि आपल्याला हे कागदपत्र कुठे मिळतील, असे अनेक प्रश्न निमेशला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

SIP चालू करण्यापूर्वी कोणते कागदपत्र पाहावे?

निमेशने टीव्हीवर म्युच्युअल फंडची जाहिरात पाहिली, ज्यात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्र नीट वाचावीत, असं सांगण्यात आलं होतं. आपल्यापैकी अनेकांनी अश्या प्रकारची जाहिरात पहिली असेल, पण योजनेशी संबंधित कागदपत्र म्हणजे नक्की काय, हे कोणते कागदपत्र आहेत, त्यामध्ये अशी कोणती महत्वाची माहिती असते आणि आपल्याला हे कागदपत्र कुठे मिळतील, असे अनेक प्रश्न निमेशला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

ज्या वेळेला कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी नवीन फंड लॉन्च करते, त्या वेळेला त्यांना काही कागदपत्र सेबीकडे सादर करावे लागतात. यामध्ये स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट, स्टेटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन आणि की इन्फॉर्मेशन मेमोरँडम या 3 महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश असतो. या डॉक्युमेंट्सला ऑफर डॉक्युमेंट्स म्हणतात. गुंतवणूकदाराने फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे डॉक्युमेंट वाचले तर त्याला स्कीम संदर्भात सविस्तर माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारावर गुंतवणूकदार गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेऊ शकतो. यापैकी, SID म्हणजेच स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट याला सर्वात जास्त महत्व आहे, कारण SID मध्ये स्कीम संदर्भात सविस्तर माहिती असते. फंड मॅनेजर कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करणार आहे, स्कीमचं उद्दिष्ट काय आहे, त्यामध्ये ऍसेट एलोकेशन कसं होईल, चार्जेस कोणते आणि किती असतील, तसेच फंडमध्ये लॉक-इन कालावधी असेल का यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा SID मध्ये समावेश असतो. फंडमध्ये एंट्री आणि एक्सिट लोड किती असेल, ऐतिहासिक कामगिरी, बेंचमार्क, जोखीम, फंड मॅनेजरची माहिती आणि रिस्क कमी करण्यासाठी फंड मॅनेजर कोणती स्ट्रॅटेजी वापरणार आहे, अशी अतिशय महत्वाची माहिती SID मध्ये असते.

म्युच्युअल फंड योजनेशी संबंधित दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन, ज्यातून म्युच्युअल फंडबद्दल कायदेशीर तपशील आपल्याला मिळतो. यात म्युच्युअल फंड कंपनी, स्पॉन्सर, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आणि कस्टोडिअन यांच्याबद्दल माहिती आहे. यामध्ये ऍसेट मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख अधिकारी आणि सहयोगी म्हणजेच रजिस्ट्रार, कस्टोडियन, बँकर, ऑडिटर आणि कायदेशीर सल्लागार यांच्याबद्दल माहिती असते. याव्यतिरिक्त, इतर आर्थिक आणि कायदेशीर गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. म्युच्युअल फंडशी संबंधित तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे KIM अर्थात की इन्फॉर्मेशन मेमोरँडम. स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये सविस्तर माहिती असते, त्याचीच समरी KIM मध्ये असते. ज्यांना फंडबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे आहे, ते KIM चा वापर करू शकतात. कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण फंडबद्दल बेसिक माहिती घेतली पाहिजे, आणि ती माहिती आपल्याला KIM मध्ये मिळेल.

हे 3 डॉक्युमेंट्स म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी का महत्वाचे आहेत, ते आपल्याला लक्षात आलं. मात्र, त्याचं स्वरूप अधिक सोपं करण्यासाठी आणि त्याची पारदर्शकता वाढवण्यासाठी सेबीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट मध्ये केलेल्या बदलांनुसार, योजनेच्या पोर्टफोलिओ होल्डिंग्सची माहिती आता वेब लिंकद्वारे द्यावी लागणार आहे. फंडचे टॉप 10 होल्डिंग्ज आणि कोणत्या सेक्टरमध्ये किती गुंतवणूक करण्यात आली आहे, ही अतिशय महत्वाची माहिती यामध्ये असेल. तसेच, ऍप्लिकेशन फॉर्म, SID आणि KIM वर आता रीस्को-मीटर टाकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच, अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या डायरेक्टर आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी योजनेत केलेल्या एकूण गुंतवणुकीची माहिती उघड करावी लागेल. आपण म्युच्युअल फंडमध्ये आपल्या कष्टाचे पैसे टाकतो. मुलांचं शिक्षण किंवा रिटायरमेंट प्लँनिंगसारखे महत्वाचे उद्दिष्ट आपल्याला SIP च्या माध्यमातून पूर्ण करायचे असतात. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असतील तर आपल्याला व्यवस्थित नियोजन करून योग्य फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कोणताही फंड आपल्यासाठी योग्य आहे का नाही, याची सविस्तर माहिती आपल्याला SID SAI आणि KIM या 3 डॉक्युमेंट्समधून मिळेल, त्यामुळे कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक चालू करण्यापूर्वी हे डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचले पाहिजे.

Published: January 25, 2024, 12:20 IST