परदेशात सुट्टीसाठी जाणाऱ्या भारतीयांचा खर्च या महिन्यापासून वाढला आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून परदेश टूर पॅकेजवर 20 टक्क्यांपर्यंत TCS लागू करण्यात आला. पण हा 20 % तुम्ही वाचवू शकता. कसे ते जाणून घ्या.
TCS नवीन दर :
1 ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर लागणाऱ्या TCS च्या दरामध्ये वाढ झाली आहे. स्वत: किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह परदेश दौऱ्यावर गेलात तर तुम्हाला टूर पॅकेजवर टीसीएस भरावा लागेल. जर आर्थिक वर्षातील टूर पॅकेजची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर TCS 20 टक्के दराने भरावा लागेल तसेच 7 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास 5 % TCS भरावा लागेल.
TCS च्या नियमांनुसार परदेशी टूर पॅकेज म्हणजे काय ते जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे तिकीट आणि हॉटेल निवास म्हणजेच हॉटेल अॅकोमॉडेशन या दोन गोष्टी परदेशी टूर पॅकेजमध्ये असणे आवश्यक आहे.ऑफलाइन किंवा ऑनलाइन फॉरेन टूर पॅकेज बुक केल्यास पॅकेजसाठी तुम्हाला त्यासोबत TCS भरावा लागेल. तुम्ही मेक माय ट्रिप, यात्रा किंवा इज माय ट्रिप यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटरद्वारे पॅकेज बुक केल्यास TCS ला देखील पैसे द्यावे लागतील.
काय आहे मार्ग :
हे टाळण्याचा मार्ग म्हणजे येण्याजाण्याचे तिकीट स्वतंत्रपणे बुक करा. हॉटेलमध्ये रहाण्याचे बुकिंग देखील स्वतंत्रपणे करा. साईट सीनसाठी स्वतंत्रपणे बुक करा. तुम्ही अशा प्रकारे बुकिंग केल्यास परदेशी टूर पॅकेज मानले जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही TCS भरणे टळू शकते.
Published: October 13, 2023, 14:00 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App