FMCG सेक्टरमध्ये गुंतवणुकीची संधी? अश्या पद्धतीने करा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय

आपलं उत्पन्न खूप कमी झालं किंवा वाढलं म्हणून आपण बिस्कीट, टूथपेस्ट, चहा, कॉफी, साबण यासारख्या गोष्टी वापरणं बंद करत नाही. त्यामुळे, या कंपन्यांच्या विक्रीवर मंदीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे, आपण इक्विटी पोर्टफोलिओचा काही भाग FMCG शेअर्ससाठी एलॉकेट केला पाहिजे. पण कोणते FMCG शेअर्स खरेदी करायचे, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आणि यातून किती रिटर्न मिळू शकतो, ते आता जाणून घेऊया.

शेअर मार्केटमध्ये जोखीम असते. आपण खरेदी केलेल्या शेअरची किंमत कधीही कमी होऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्थेत जे चांगले वाईट बदल होतात, त्याचा प्रत्येक व्यवसायावर परिणाम होतो. परिणाम सकारात्मक असेल तर शेअरची किंमत वाढते, याउलट कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला तर शेअरच्या किमतींमध्ये घसरण होते. आपल्या नोकरी आणि व्यवसायात होणाऱ्या बदलानुसार लोकं पैसे खर्च करण्याच्या पद्धतीत बदल करतात. त्याचा कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होतो. मात्र, अश्या काही गोष्टी असतात ज्या काहीही झालं तरी आपल्याला खरेदी कराव्याच लागतात. आर्थिक परिस्थिती कितीही चांगली किंवा वाईट झाली तरी या गोष्टी खरेदीचा निर्णय आपण फार काळ पुढे टकलू शकत नाही. अश्या सेक्टर्सचा डिफेन्सिव्ह सेक्टर म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने FMCG आणि फार्मा सेक्टरचा समावेश आहे. आपलं उत्पन्न खूप कमी झालं किंवा वाढलं म्हणून आपण बिस्कीट, टूथपेस्ट, चहा, कॉफी, साबण यासारख्या गोष्टी वापरणं बंद करत नाही. त्यामुळे, या कंपन्यांच्या विक्रीवर मंदीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे, आपण इक्विटी पोर्टफोलिओचा काही भाग FMCG शेअर्ससाठी एलॉकेट केला पाहिजे. पण कोणते FMCG शेअर्स खरेदी करायचे, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आणि यातून किती रिटर्न मिळू शकतो, ते आता जाणून घेऊया.

भारतातल्या FMCG सेक्टरमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट, पतंजली, गोदरेज कन्ज्युमर, इमामी, ज्योती लॅब्स आणि बजाज कन्ज्युमर सारख्या अनेक नामांकित कंपन्या आहेत. प्रत्येकाचा बिझनेस सेगमेंट आणि बिझनेस मॉडेल वेगळं आहे. पण या सर्व कंपन्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या कंपन्यांच्या व्यवसायात खूप मोठे चढ उतार होत नाहीत. तुमच्या समोर डाबर कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, ते बघितलं तर आपल्या लक्षात येईल, ती म्हणजे मागच्या 10 वर्षात कंपनीच्या उत्पन्न आणि नफ्यामध्ये काहीच चढ उतार झाले नाहीयेत. FMCG सेक्टरमधील सगळ्याच कंपन्यांच्या P अँड L स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळेल. या कंपन्यांच्या व्यवसायात सातत्याने वाढ होते, त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्सदेखील चांगला रिटर्न देतात. शेअर मार्केटमध्ये क्रॅश आला तर या शेअर्समध्ये खूप जास्त पडझड होत नाही. उदारणार्थ, कोविडच्या क्रॅशमध्ये निफ्टीमध्ये 38% पडझड झाली, मात्र डाबरचा शेअर केवळ 15% खाली आला, तर हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर केवळ 9% खाली आला होता. आपल्या पोर्टफोलिओला स्थैर्य देण्यासाठी FMCG शेअर्सचा आपल्या कोअर पोर्टफोलिओमध्ये समावेश केला तर पोर्टफोलिओ मजबूत होईल आणि या गुंतवणुकीवर साधारण 12 ते 15% वार्षिक रिटर्न मिळेल.

FMCG शेअर्समध्ये सातत्याने चांगला रिटर्न मिळतो आणि क्रॅशमध्ये कमी पडझड होते, मात्र या शेअर्समध्ये सध्या एक अडचण आहे ती म्हणजे हे सगळे शेअर्स ओव्हर वॅल्यूड आहेत. त्यामुळे, पुढचे काही वर्ष या शेअर्समध्ये थोडं प्राईज करेक्शन किंवा टाइम करेक्शन होऊ शकतं. हे सहन करायची तयारी असेल तरच आपण या शेअर्समध्ये गुंतवणूक चालू केली पाहिजे. हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट, पतंजली, गोदरेज कन्ज्युमर, इमामी, ज्योती लॅब्स आणि बजाज कन्ज्युमर हे आठही शेअर्स फंडामेंटल मजबूत आहेत. मात्र सगळ्या शेअर्सचा PE रेशो 30 ते 80 च्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे, टप्याटप्याने आपण हे शेअर्स खरेदी केले तर आपल्याला चांगला रिटर्न मिळेल. यासाठी आपल्याला गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागेल. समजा डाबरचा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे, जो आता ट्रेड करतोय 500 रुपयाला. 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये आणि 200 रुपये अश्या 4 किमतीला हा शेअर खाली आला तर आपण शेअर्स खरेदी करू शकतो. सध्याची किंमत, 20%, 40% आणि 60% घसरणीमध्ये आपण हे आठही शेअर्स खरेदी केले तर जोखीम कमी होईल. पुढच्या 3 ते 5 वर्षात कंपन्यांचे अर्निंग्स वाढले कि व्हॅल्युएशन स्वस्त होईल आणि मग आपल्याला रिटर्न मिळेल. अश्या पद्धतीने इक्विटी पोर्टफोलिओचा किमान 10 ते 20% भाग आपण FMCG शेअर्समध्ये एलॉकेट केला तर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होईल आणि चांगला रिटर्न ही मिळेल.

Published: April 15, 2024, 10:17 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App