इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी का?

अमेरिकेच्या नॅसडॅकने 18400 चा उच्चांक नोंदवला. मागच्या 18 महिन्यात नॅसडॅकने तब्बल 70% रिटर्न दिला आहे. मागच्या 1, 2 आणि 5 वर्षाचा रिटर्न चांगला असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार नॅसडॅक फंड्समध्ये गुंतवणूक चालू करत आहेत. मात्र, इथे एक बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करावी का?

भारताच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने 50 लाख कोटींचा विक्रमी टप्पा पार केला आहे. विशेषतः तरुण गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्सला जास्त पसंती दिली आहे. ज्या ज्या वेळेला शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी येते, त्यानंतर गुंतवणूकदार शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात, हे आपण पाहिलं आहे. अगदी हर्षद मेहतांच्या काळातली 1991 ची असो, किंवा 1999 2007 किंवा 2019 च्या फेजमध्ये झालेली तेजी असो. आता 2020 नंतर निफ्टीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे, स्मॉलकॅप इंडेक्स निच्चांकापासून तब्बल 5 पट वाढला आहे. पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक वाढवणार हे निश्चित होतं. मात्र, 1992 1999 2007 किंवा 2019 पूर्वी झालेल्या तेजीमध्ये आणि आत्ताच्या तेजीमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे या वेळेला गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत. SIP हा असा एक रामबाण उपाय आहे, ज्यातून मार्केट कुठेही गेलं तरी शेवटी फायदाच होतो. SIP च्या माध्यमातून गुंतवणूक चालू केल्यामुळे गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये यश मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढली आहे. मात्र, तरीदेखील यामध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. SIP करूनदेखील ज्या गुंतवणूकदारांना चांगला अनुभव आणि रिटर्न मिळत नाही, याचं एक मुख्य कारण आहे तेजीमध्ये गुंतवणूक चालू करणं.

अनेक गुंतवणूकदार गुगलवर जाऊन टॉप फंड्स इन इंडिया किंवा बेस्ट परफॉर्मिंग फंड्स इन इंडिया असं सर्च करतात. मग तिथे एक लिस्ट येते, एखाद्या कॅटेगरीने मागच्या 1 3 किंवा 5 वर्षात चांगला रिटर्न दिला आहे म्हणजे पुढेदेखील तसाच रिटर्न मिळेल, असा अनेकांचा गैरसमज होतो. ज्या कॅटेगरीचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे, ज्या कॅटेगरीचा अपट्रेंड पूर्ण झाला अश्या कॅटेगरीमध्ये डाउनट्रेंड चालू होण्याची शक्यता जास्त असते, आणि नेमकं या डाउनट्रेंडमध्ये गुंतवणूकदार अडकतात. सध्याचं उदाहरण बघायचं असेल तर अमेरिकेच्या नॅसडॅकने 18400 चा उच्चांक नोंदवला. मागच्या 18 महिन्यात नॅसडॅकने तब्बल 70% रिटर्न दिला आहे. मागच्या 1 2 आणि 5 वर्षाचा रिटर्न चांगला असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार नॅसडॅक फंड्समध्ये गुंतवणूक चालू करत आहेत. मात्र, इथे एक बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करावी का? यामध्ये अनेक लोकांचे वेगवेगळे मतं असू शकतात, पण आमचं मतं आहे कि भारतीय गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू नये. आम्ही असं म्हणतोय, यामागे नक्की लॉजिक आहे ते समजून घेऊया.

कोणत्याही देशातलं शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स किती रिटर्न देणार, हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे GDP ची वाढ आणि दुसरी गोष्ट म्हणजे महागाईचा दर. GDP वाढीचा आणि महागाईचा विचार केला तर भारत हा जगातला सर्वात आघाडीवर असणारा देश आहे. पुढचे अनेक गरज भारताची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहील. म्हणूनच अमेरिका, कॅनडा, युरोप, UK सह जगातले अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपलीच असताना आपण इतर देशांमध्ये गुंतवणूक करून काय फायदा, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही लोकं म्हणतील कि डायव्हर्सिफिकेशनसाठी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. पण जागतिक पातळीवर एखादं संकट आलं तर जगातले सगळेच शेअर बाजार कोसळतात. कोविडच्या कॅराश्मध्ये निफ्टी साधारण 38% खाली आला होता, साधारण तेवढीच पडझड अमेरिकेच्या डॉव जोन्समध्ये झाली होती. त्यामुळे, एकाच वेळेला आपले भारतातले फंड्स आणि इंटरनॅशनल फंड्समध्ये नुकसान होणार असेल, तर डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मिळणार नाही. त्यापेक्षा, आपण भारतातच गोल्ड बॉण्ड्स किंवा लॉन्ग टर्म डेट फंड्समध्ये डायव्हर्सिफाय केलं तर आपला अधिक फायदा होईल. तुम्हाला जर भविष्यात मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही इथेच पैसे साठवून नंतर ते पैसे परदेशात पाठवू शकता. त्यामुळे, आपला मित्र किंवा नातेवाईक इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करतोय किंवा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणून इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू नका.

Published: May 3, 2024, 14:52 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App