• सोसायटीच्या मनमानी विरोधात कसं लढायचं?

    अपार्टमेंट किंवा सोसायटीमधील घरमालकांच्या ग्रुपला अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन किंवा AOA म्हणतात… असोसिएशनला रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा RWA म्हणून देखील ओळखलं जातं. वीज, पाणी, सोसायटीतले रस्ते, गार्डन, क्लबहाऊस, स्ट्रीट लाईट यांची दुरुस्ती आणि सुरक्षा करणे आणि इतर आवश्यक सेवा पुरवणे हे AOA चं काम आहे.. या कामांसाठी सोसायटी घर मालकांकडून मेंटेनन्स चार्जेस आकारते… घराच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्जेस आकारले जातात.

  • LEAVE & LICENSE AGREEMENT चे फायदे

    तुम्ही घर भाड्याने दिलं किंवा घेतलं असेल, तर रेंट एग्रीमेंट किंवा लीज एग्रीमेंट हे शब्ध नक्की ऐकले असतील. घर भाड्याने दिलं तर घरमालक 11 महिन्यांसाठी रेंट एग्रीमेंट करतो. त्यामध्ये भाडेकरूची सगळी माहिती, प्रॉपर्टीचा पत्ता, महिन्याचं भाडं आणि डिपॉजिट या सगळ्याचा उल्लेख केला जातो. हे पेपरवर्क झाल्यानंतर, पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं आणि नंतर घरमालक घराचा ताबा भाडेकरूला देतो. मात्र, रेंट एग्रीमेंट करूनदेखील अनेक वेळा घरमालक आणि भाडेकरूमध्ये वाद होतात. असे वाद होऊ नये असं वाटत असेल तर रेंट एग्रीमेंटपेक्षा लिव्ह अँड लायसन्स एग्रीमेंट करणं अधिक फायदेशीर आहे. पण लिव्ह अँड लायसन्स एग्रीमेंट म्हणजे काय? आणि रेंट एग्रीमेंटच्या तुलनेत लिव्ह अँड लायसन्स एग्रीमेंटचे काय फायदे आहेत, ते आता जाणून घेऊया.

  • डॉक्युमेंट वेळेत परत करा, RBI चा आदेश

    ग्राहकांना लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करायचं असेल किंवा ते बंद करायचं असेल, तर बँका ग्राहकांना चांगली सेवा देत नाहीत. विनाकारण टाईमपास करतात. कर्ज बंद करण्यासाठी प्रक्रिया काय आहे, याची नीट माहिती देत नाहीत. ग्राहकांना होणारा हा त्रास लक्षात घेता RBI ने या संदर्भात कडक नियम केले आहेत. हे नियम काय आहेत आणि यामुळे ग्राहकांना कसा फायदा होईल, ते आता जाणून घेऊया.

  • बांधकामाचा दर्जा खराब असल्यास कुठं करावी

    नवीन फ्लॅटच्या बांधकामाचा दर्जा खराब असल्यास कुठं तक्रार कराल

  • REAL ESTATE BROKER ची निवड कशी करावी?

    घर खरेदी करताना सर्वात मोठी अडचण असते ती योग्य घर शोधणे.. जर तुमच्याकडे विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रोकर तुम्हाला मदत करेल, तर अनेक समस्या नाहीशा होतात. अनेक ब्रोकर स्वतःच्या फायद्यासाठी खरेदीदारांसोबत विविध युक्त्या खेळतात. खरेदीदाराने अशा एजंटना टाळावे आणि योग्य ब्रोकर निवडावा. रिअल इस्टेट एजंटमध्ये कोणते गुण असावेत? त्याला किती अनुभव असावा? आणि ब्रोकरने काही चूक केली तर तुम्ही कुठे तक्रार करू शकता?

  • ऑनलाईन लिलाव, नवीन पोर्टलची सुरुवात

    जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्ज घेते आणि कर्जाची परतफेड करू शकत नाही, तेव्हा गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा बँकेला अधिकार असतो. पैसे वसूल करण्यासाठी बँकांना हे पाऊल उचलावं लागतं. या प्रॉपर्टीची माहिती बँक ज्या प्रकारे वर्तमानपत्रात देतात, त्याच प्रकारे ग्राहकांना ही माहिती एका क्लिकवर ऑनलाईन मिळावी, यासाठी IBA म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशनने एक पोर्टल चालू केलं आहे.

  • Festival offer मध्ये फ्लॅट खरेदी करताय ?

    सणासुदीच्या काळात अनेक बिल्डर अनेक ऑफर आणतात. या ऑफरमध्ये घर खरेदी करणार असाल तर या बाबी ध्यानात ठेवा.

  • TOP-UP LOAN VS PERSONAL LOAN

    तुम्ही ज्या वेळेला नवीन घर खरेदी करता किंवा प्लॉट घेऊन त्यावर बांधकाम करता, त्या वेळेला प्रॉपर्टीची त्यावेळची व्हॅल्यू आणि तुमचं उत्पन्न यानुसार बँक होम लोन देते. मात्र, काही वर्षानंतर घराची व्हॅल्यू आणि कर्जदाराचं उत्पन्न दोन्हीमध्ये वाढ होते. त्यामुळे, बँका ग्राहकांना आहे त्या लोनवर टॉप-अप लोन ऑफर करतात. बँकेकडे कर्जदाराचा ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध असतो, त्यामुळे बँक जोखीम घ्यायला तयार असते.

  • जुना फ्लॅट खरेदी करताना याचा विचार करा

    बिल्डर काही कारणास्तव आर्थिक अडचणीत सापडला तर पझेशन मिळायला बराच उशीर होऊ शकतो. या प्रकारची जोखीम नको असेल, तर रिसेलचा फ्लॅट घेणं हा एक पर्याय विवेककडे आहे. मात्र, रिसेलच्या फ्लॅटमध्ये वेगळ्या अडचणी असू शकतात. रिसेलच्या फ्लॅटवर काही कायदेशीर वाद असतील, तर खरेदीदार अडचणीत येऊ शकतो. तसेच, फ्लॅट खूप जुना असेल तर कन्स्ट्रक्शन संदर्भात अडचणींना खरेदीदाराला सामोरं जावं लागतं.

  • ऑनलाईन पोर्टलवर प्रॉपर्टी शोधताय?

    बरेच लोकं बाहेरच्या शहरातून नोकरी किंवा व्यवसायासाठी पुणे किंवा मुंबईसकरख्या शहरांमध्ये येतात. एरिया नवीन असतो, त्यामुळे फ्लॅट शोधण्यासाठी ऑनलाईन पोर्टल हाच एकमेव पर्याय असतो. ऑनलाईन पोर्टलवर अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे, चांगलं घर शोधणं सोपं होतं. मात्र, ऑनलाईन पोर्टल मालक कमी आणि ब्रोकर जास्त असतात. ब्रोकर ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आयडिया वापरतात. त्यामुळे, ग्राहकांचं नुकसान होण्याची शक्यता असते.