LIC च्या शेअरमध्ये तेजी का आली ? php // echo get_authors();
?>
LIC विमा बाजारात मोठी खळबळ माजवणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात एलआयसी निश्चित परतावा देणारी योजना बाजारात आणणार आहे.या योजनांमुळे एलआयसीच्या नवीन हप्त्यांची वाढ ही दोन अंकी होणार आहे. या योजनेत पॉलिसीधारकांना निश्चित परतावा तर मिळणारच आहे . त्यासोबतच आयुष्यभर सम-एश्योर्ड रक्कमेच्या दहा टक्के परतावा देखील मिळणार आहे
LIC च्या शेअर शुक्रवारी 9.71 टक्क्यांनी वाढलाय. बाजार उघडल्यानंतर 627 रुपयांवर असलेला एलआयसीच्या शेअर 59.95 रुपयांनी वाढलाय. बाजार बंद झाला त्यावेळी शेअर 677.65 रुपयांवर पोहचला होता. आज एलआयसीच्या शेअर 682 रुपयांच्या उच्चाकांवर पोहचला होता. गुरूवारी एलआयसीचा शेअर हा 617.70 रुपयांवर होता. 17 नोव्हेंबर रोजी एलआयसीचा शेअर हा 610 रुपयांवर ट्रेड करत होता. 27 मार्च रोजी एलआयीचा शेअर हा 583 रुपयांवर होता.
एका वर्षात LIC नं दिला फक्त 3 टक्के रिटर्न
LIC च्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्वच गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक तोटा झालाय. त्यामुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी LIC च्या शेअर्सची विक्री केलीय. गेल्या एका वर्षात निफ्टीनं 8 टक्के रिटर्न दिला असताना एलआयसीच्या शेअर्सनं फक्त तीन टक्के रिटर्न दिलाय.
LIC च्या शेअर्समध्ये तेजी का आली ?
गुंतवणूकदारांना निराशा करणाऱ्या एलआयसीनं आता व्यवसाय वाढीवर जोर देण्याचं ठरवलं आहे.
LIC विमा बाजारात मोठी खळबळ माजवणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात एलआयसी निश्चित परतावा देणारी योजना बाजारात आणणार आहे.या योजनांमुळे एलआयसीच्या नवीन हप्त्यांची वाढ ही दोन अंकी होणार आहे. या योजनेत पॉलिसीधारकांना निश्चित परतावा तर मिळणारच आहे . त्यासोबतच आयुष्यभर सम-एश्योर्ड रक्कमेच्या दहा टक्के परतावा देखील मिळणार आहे,अशी माहिती एलआयसीचे चेअरमन सिद्धार्थ मोहंती यांनी दिली आहे या योजनेत पॉलिसीधारकांना मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे. तसेच पॉलिसीवर कर्जही घेता येतं. निश्चित परतावा देणाऱ्या योजना ग्राहक आणि विमा कंपन्या दोघांसाठीही फायदेशीर आहेत.
नवीन विमा योजनामुळे एलआयसीच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा असल्यानंच एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी आलीय.
Published: November 24, 2023, 16:40 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App