भारतातील लोकांची कमाई किती , तसेच कोणत्या राज्यातील लोक अधिक कमावतात ? या प्रश्नांची उत्तरे पर्सनल फायनान्स सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहेत. या सर्वेक्षणामध्ये भारतीय कुटुंबाचे उत्पन्न गेल्या एका वर्षामध्ये वाढले असल्याचे समोर आले आहे. पण या वाढत्या कमाईमागे कारणे नक्की काय आहेत ते जाणून घ्या.
मनी 9 च्या सर्वेक्षणानुसार भारतातील एका कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 25,910 रुपये आहे. हा आकडा मनी 9 च्या मागील वर्षीच्या आकडेवारीपेक्षा 10 % जास्त आहे. 2022 मध्ये भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 23,000 रुपये होती. मागील वर्षी कुटुंबामध्ये सदस्यांची सरासरी संख्या 4.2 होती तर कमाई करणाऱ्यांची संख्या 1.6 % होती तीच संख्या या वर्षी वाढू 4.3 झाली आहे.
कोरोंनाच्या दरम्याने कामासाठी शहरात राहणाऱ्या लोकांनी गाव गाठल होतं पण कोरोंनाचा प्रभाव कमी होताच शहरांमध्ये ते परत आले. त्यामुळे कमाईमध्ये देखील वाढ झाली आणि कुटुंबाचा आकार देखील वाढला.
कोणत्या राज्यामध्ये अधिक कमावणारी कुटुंब ?
सरासरी उत्पन्न वाढल्याचे आपल्याला समजले पण कोणत्या राज्यात कुटुंब अधिक कमावतात हे माहीत आहे का ? मनी 9 च्या सर्वेक्षणानुसार भारत अधिक उत्पन्न असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, आणि चंदीगड या राज्यांचा समावेश आहे. यामध्ये 2 राज्यांच्या आकडेवारीमध्ये बदल झालेला दिसून येत आहे. मागील वर्षीच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 35,559 रुपये असून पहिल्या क्रमांकावर असून या वर्षी 35,392 रुपयांसहित दुसऱ्या क्रमांकावर आहे . तर या वर्षी कर्नाटकमधील कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 35,411 रुपयांसहित पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच मागील वर्ष दिल्लीतील कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 28,536 रुपयांसहित तिसऱ्या क्रमांकांवर होता पण या वर्षी चंदीगड 34,588 रुपये सरासरी उत्पन्न असून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.
कोणती राज्ये उत्पन्नाच्या बाबतीत पिछाडीवर ?
देशामध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यांच्या रॅंकिंगमध्ये देखील बदल दिसून आला आहे. बिहारमधील सरासरी उत्पन्नात वाढ झाली असून देखील कमी करणारे राज्य म्हणून समावेश झाला आहे. मागील वर्षी बिहारमधील कुटुंबाची सरासरी उत्पन्न 14,366 रुपये होते या वर्षी ते वाढून 17,567 रुपये झाले आहे. मागील वर्षी झारखंड दुसऱ्या टर ओडिसा तिसऱ्या क्रमांकावर होतं पण आता ओडीसा दुसऱ्या तर झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Published: December 23, 2023, 19:10 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App