सोन्यात विक्रमी तेजी कशामुळे आली ?

सोन्यानं पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतलीय. भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कॉमेक्सवर पहिल्यांदाच सोनं 2100 डॉलर प्रति औंसचा टप्पा पार केलाय. MCX वर प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,000 रुपयांवर पोहचलाय. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ होऊन प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,350 रुपयांवर पोहचलाय. तर 18 कॅरेट सोन्यामध्येही 330 रुपयांची वाढ होत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 48270 रुपयांवर पोहचलाय. इस्राईल- पॅलेस्टाईन युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झालीय त्यामुळेही सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिकेत फेड व्याज दर कमी करण्याची शक्यता असल्यानं सोन्याच्या दरात वाढ झालीय. तसेच बिटकॉईनमध्येही तेजी दिसून येत आहे.

  • Team Money9
  • Last Updated : December 4, 2023, 16:09 IST

बातमीपत्राच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.
महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. या संकटाच्या काळात पिकविमा महत्त्वाचा ठरतो. एका रुपयात पिक विमा भरण्याची योजना सरकारनं सुरू केलीय. 30 नोव्हेंबरपर्यंत रब्बी हंगामासाठी पिक विमा भरण्याची शेवटची मुदत होती. मात्र,अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे पिकविमा भरता आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळपिक विमा भरण्याला मुदतवाढ दिलीय. आता पाच डिसेंबरपर्यंत पिक विमा भरता येणार आहे.

सोन्यानं पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतलीय. भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कॉमेक्सवर पहिल्यांदाच सोनं 2100 डॉलर प्रति औंसचा टप्पा पार केलाय. MCX वर प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,000 रुपयांवर पोहचलाय. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ होऊन प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,350 रुपयांवर पोहचलाय. तर 18 कॅरेट सोन्यामध्येही 330 रुपयांची वाढ होत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 48270 रुपयांवर पोहचलाय. इस्राईल- पॅलेस्टाईन युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झालीय त्यामुळेही सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिकेत फेड व्याज दर कमी करण्याची शक्यता असल्यानं सोन्याच्या दरात वाढ झालीय. तसेच बिटकॉईनमध्येही तेजी दिसून येत आहे.

दिवाळी आणि लग्नाच्या सीझनमुळे नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक लाख 68 हजार कोटी रुपयांचा जीएसटी जमा झालाय. गेल्या वर्षीची तुलना केल्यास यंदा जीएसटीमध्ये 15 टक्के वाढ झालीय. तरीही ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये थोडी घट दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात एक लाख 72 हजार कोटी जीएसटी जमा झाला होता.

युवा वर्ग आता लग्नाच्या नियोजनाबाबत गंभीर दिसून येत आहे. 42 टक्के तरूणांनी लग्नाचा खर्च स्वत:च्या बचतीतून करणार असल्याचं सांगितलं. 60 टक्के मुलींना लग्नासाठी स्वत:च्या कमाईचा हिस्सा खर्च करणार असल्याचं सांगितलंय. मुलींना लग्नाचं ओझं आई-वडिलांवर टाकायचं नाही. इंडियालेंड्स या अर्थविषयक सेवा पुरविणाऱ्या प्लेटफॉर्मनं नुकतंच ‘वेडिंग स्पेंड्स रिपोर्ट 2.0’ अहवाल जारी केलाय. सध्याच्या काळात सामाजिक परिस्थितीत बदल होतोय आणि तरूणांचा आर्थिक दृष्टीकोनात बदल होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

वाहन खरेदीदारांसाठी वाईट बातमी.
मारूती,हुंडाई,महिंद्रा आणि टाटानंतर आता Honda Cars India नं वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं जानेवारी महिन्यांपासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत,अशी माहिती कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट कुणाल बहल यांनी दिलीय. या महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्या मॉडेलचे रेट किती वाढणार आहेत याचा निर्णय होणार असल्याचंही बहल यांनी माहिती दिलीय.

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आणि जीडीपीमधील वाढीमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे .निफ्टी 20,600 अंकानी उघडलाय. बँक निफ्टीमध्येही 857 अंकाची वाढ झालीय.

.
शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण असताना झिरोदाचा वापर करणाऱ्या टे ग्राहकांचा हिरमोड झालाय. अनेक ग्राहकांना झिरोदाचा काईट अॅपवर लॉगईन करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. Kite Web वापरण्यात अडचणी येत असतील तर ग्राहकांनी Kite Mobile App चा वापर करावा असं निवेदन झिरोदानं सोशल मीडिया X वर दिलंय.

ICICI बँकांच्या ग्राहकांना आता Rupay Credit Card चा वापर करून यूपीआय पेमेंट करता येणार येणार आहे. BHIM, Paytm, Google Pay, PhonePe द्वारे पेमेंट करता येणार आहे. Rupay Credit Card चा वापर करून व्यापाऱ्याला पैसे देता येतात. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठवता येत नाहीत.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इतकच, पाहात राहा मनी9 मराठी

Published: December 4, 2023, 16:09 IST

सोन्यात विक्रमी तेजी कशामुळे आली ?