अदानी ग्रुपला अमेरिकेनं क्लिनचिट दिल्यानंतर गुंतवणूकदार मालामाल

अदानी समूहाला अमेरिकेकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी ट्रान्समिशनमध्ये 11 टक्के, अदानी ग्रीनमध्ये 17 टक्के, अदानी इंटरप्रायझेसमध्ये 9.5 टक्के, अदानी पोर्टमध्ये साडे आठ टक्के, अदानी पॉवरमध्ये सुमारे सहा टक्के तेजी दिसून आलीय. अमेरिकेमधील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने हिंडेनबर्गनं अदानी समूहावर लावलेले सर्वच आरोप फेटालळे आहेत. तसेच अदानी श्रीलंकेत कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी 4,600 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे

  • Team Money9
  • Last Updated : December 5, 2023, 14:47 IST

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी कोल्हापुरातली
आरबीआयनं कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथल्या शंकरराव पुजारी नूतन नगरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलाय. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचं साधन नसल्यानं आरबीआयनं ही कारवाई केलीय. आरबीआयच्या आदेशानंतर बँकेचे सर्वच व्यवहार बंद झाले आहेत. आता बँकेत पैले जमा करता येणार नाहीत तसेच बँकेतून पैसेही काढता येणार नाहीत.

आता बातमी शेतकऱ्यांबाबतची

2021 च्या तुलनेत 2022 या वर्षात शेतकरी आत्महत्यामध्ये 2.1 टक्के घट झालीय तर शेतकरी मजुरांच्या आत्महत्येमध्ये 9.2 टक्क्यांनी वाढ झालीय. ही माहिती भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या या अहवालात देण्यात आलीय. 2022 या वर्षात शेती आणि शेतीशी निगडीत 11,290 जणांनी
आत्महत्या केलीय. 2021 मध्ये 10,881 जणांनी आत्महत्या केली होती. 2020 या वर्षात सुमारे 5,579 शेतकऱ्यांनी तर 5,098 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या.

आता बातमी अदानी ग्रुप संदर्भातली.
अदानी समूहाला अमेरिकेकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी ट्रान्समिशनमध्ये 11 टक्के, अदानी ग्रीनमध्ये 17 टक्के, अदानी इंटरप्रायझेसमध्ये 9.5 टक्के, अदानी पोर्टमध्ये साडे आठ टक्के, अदानी पॉवरमध्ये सुमारे सहा टक्के तेजी दिसून आलीय. अमेरिकेमधील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने हिंडेनबर्गनं अदानी समूहावर लावलेले सर्वच आरोप फेटालळे आहेत. तसेच अदानी श्रीलंकेत कंटेनर टर्मिनल उभारण्यासाठी 4,600 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे.

‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे विमान प्रवास 171 टक्क्यानी महाग झालाय. चेन्नई ते मुंबई, नवीन दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकत्ताच्या विमान प्रवाशाच्या भाड्यात 52 ते 171 टक्क्यांनी वाढ झालीय. चेन्नई-मुंबई विमानाचे तिकीटात 68.6 टक्क्यांनी वाढलंय. आता चैन्नईहून मुंबईला जाण्यासाठी 3,728 रुपयांऐवजी 6,286 रुपये मोजावे लागत आहेत.चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे.

दिल्ली विमानतळाच्या पॉर्किंगमध्ये पडून असलेल्या विमानावर जास्त शुल्क आकारण्यात येणार आहे,अशी माहिती विमानतळाचं व्यवस्थापन करणारी कंपनी डायलनं माहिती दिलीय. तांत्रिक आणि विविध कारणांमुळे या विमानांनी पॉर्किंगच्या जागेवर कब्जा केलाय. त्यामुळे विमान वाहतूक प्रभावित होत असल्याचं कंपनीनं सांगितलंय. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 295 पॉर्किंग उपलब्ध आहेत.

देशाबाहेरील क्रिप्टो एक्सचेंजना भारतात नोंदणी करणं बंधनकारक आहे तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा PMLA चेही पालन करावं लागणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी संसदेत दिलीय. PMLA कायद्याचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही अर्थराज्य मंत्री कराड यांनी दिलीय.

रस्ते अपघातील जखमींना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मोफत उपचार केले जाणार आहेत. पुढील तीन ते चार महिन्यात या योजनेची सुरूवात होणार आहे,अशी माहिती सचिन अनुराग जैन यांनी दिलीय. भारतात रस्ते अपघातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
मारुती,टाटानंतर आता MG मोरर्सही वाहनांच्या किमती वाढवणार आहे. नव्या किमती एक जानेवारीपासून लागू होणार आहेत. .

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात, पाहात राहा मनी9 मराठी

Published: December 5, 2023, 14:23 IST

अदानी ग्रुपला अमेरिकेनं क्लिनचिट दिल्यानंतर गुंतवणूकदार मालामाल