मुकेश अंबानींची साखर कारखान्यांवर नजर

तुमच्या आयुष्यावर आणि उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

  • Team Money9
  • Last Updated : December 7, 2023, 15:26 IST

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीलाच ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
यंदा देशात महाराष्ट्र आणिल कर्नाटक राज्यांत पाऊस झाला नाही त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. उसाचं उत्पादनात घट होणार असल्यानं साखरेच्या दरात देखील वाढ होत आहे. साखरेचे दर 14 वर्षाच्या उच्चाकांवर आहेत. साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर सरकार बंधनं घालण्याची शक्यता आहे. साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीत कमी झाल्यानंतर बाजारात साखरेचा पुरवठा सुरळित होऊ शकतो. सरकारच्या या निर्णयाचा फटका साखर कारखानदारांना आणि इथेनॉल उद्योगाला बसणार आहे. सरकारच्या संभाव्य निर्णयाचा परिणाम शुगर स्टॉकवरही झालाय.

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानीची आता साखर कारखान्यांवर नजर पडलीय. कॉप्रेसड बायोगॅस म्हणजेच सीबीजी तयार करण्यात उसाची मळी अत्यंत उपयोगाची आहे. त्यामुळे रिलायन्स उद्योग समूह देशातील साखर कारखान्यांना प्रेस मड म्हणजेच उसाच्या मळीच्या पुरवठ्याबाबत साखर कारखानदारांसोबत चर्चा करणार आहे. सध्या रिलायन्स उद्योग समूहाचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सीबीजी प्रकल्प आहे. येत्या तीन वर्षात शंभर सीबीजी प्रकल्प उभारण्याचं रिलायन्सचा उद्देश आहे.

नोव्हेंबर महिन्यात देखील वाहनांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झालीय. गेल्या महिन्यात 28 लाख 54 हजार विविध वाहनांच्या मॉडलची विक्री करणअयात आलीय. या अगोदर मार्च 2020 मध्ये 25.69 लाख वाहनांचती विक्री पाहायला मिळाल. वाहनांच्या विक्रीत भारतानं आता जापानलाही मागे टाकले आहे.

सहा ते आठ टक्के व्याज दर देणाऱ्या एफडी म्हणजेच मुदत ठेवींच्या हिश्यात 80 टक्के वाढ झालीय. मार्च महिन्यात 58 टक्के एफडीचा असणारा हिस्सा आता सप्टेंबरअखरेपर्यंत 80 टक्क्यांवर पोहचलाय. आरबीआयनं रेपो दर वाढवल्यानं बँकांना आता नागरिकांकडून जास्त व्याज दर देऊन पैसे उभारावे लागत आहेत.

ICICI Bank ने दोन कोटी रुपये ते पाच कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याज दरात वाढ केलीय. आयसीआयसीआयमध्ये आता सात ते दहा वर्षाच्या एफडीवर आता 4.75 ते सव्वा सात टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे. HDFC बँकेनेही पाच कोटी रुपयांच्या एफडीच्या व्याज दरात वाढ केलीय.

नोव्हेंबर महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ झालीय. पावसातील खंडामुळे भाजीपाला उत्पादन घटलंय. तसेच सणासुदीमुळे भाजीपाल्याची मागणी वाढल्यानं ऑक्टोबरच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात दहा टक्के वाढ झालीय. मासिक आधारावर नॉन व्हेज थाळीच्या दरातही पाच टक्के वाढ झालीय. कांद्याच्या दरात 58 टक्के आणि टोमॅटोचत्या दरात 35 टक्के वाढ झाल्यानं शाकाहारी जेवण महाग झालंय.

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनाही डीपफेकचा फटका बसलाय. टाटा यांचा शंभर टक्के निश्चित परतावा देणारा व्हिडीओ जारी करण्यात आला होता. हा व्हिडीओ खोटा असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलंय. सोना अग्रवाल हिने माझ्या मुलाखतीतील काही भागाला ट्विस्ट केला आहे. हा व्हिडीओ फेक आहे ,असं रतन टाटा यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहत राहा मनी9 मराठी

 

Published: December 7, 2023, 15:26 IST

मुकेश अंबानींची साखर कारखान्यांवर नजर