जगभरात भारतात सर्वाधिक रेंटल यिल्ड

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

  • Team Money9
  • Last Updated : February 23, 2024, 17:32 IST

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
एनपीएसमध्ये आता खाते लॉगिन करण्यासाठी प्रमाणीकरण प्रकिया अजूनच कडक केली आहे. एनपीएसद्वारा cra system लॉगिन करण्यासाठी आता आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. नवीन सुरक्षा प्रणाली येत्या १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. आता सीआरए सिस्टम लॉगिन करण्यासाठी Two-Factor Authentication नंतरच लॉगिन करता येणार आहे

भारत सरकारने कांदा व्यापाऱ्यांना बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान देशांना कांदा निर्यात करण्याची मंजुरीदिली आहे. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत व्यापार वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांवर ३१ मार्चपर्यंत निर्यातीला बंदी घालण्यात आली होती. आता बांग्लादेशला ५० हजार टन, मॉरिशला १२०० टन, बहरीनला तीन हजार टन आणि भूतानला ५६० टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानंतर घेण्यात आल्याचे ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले.

सरकारने आयात मुक्त तुरदाळीचा कालावधी वाढवून दिला आहे. या्बाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानु्सार आता एप्रिल २०२४ पर्यंत आयात तूरडाळीवर कोणतंही आयात शुल्क लागणार नाही. याअगोदर ही मुदत मार्चपर्यंतच होती आता त्याला एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आलीय. . यानंतर महागाई वाढल्यानंतर हे शुल्क हटवण्यात आहे होते. भारत मुख्यत्वे कॅनडा आणि रशियाकडून तूरडाळ आयात करतो.

भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईवर भाष्य केले आहे. महागाई कमी करण्यात अजून यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.आर्थिक धोरणाबाबत अत्यंत सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उबर अॅपशिवायदेखील आता उबर राईड आता बुक करता येणार आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजेच ONDC द्वारा आता उबर राईड बुक करता येणार आहे.उबरचे ग्लोबल सीईओ दारा खोसरोशाही यांनी ही माहिती दिलीय. भारतात आता अल्पशुल्क सुविधा ज्यात दुचाकी आणि तीनचाकी राईड सुविधा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय काही देशांत बससेवा सुरु करणार असल्याचेही खोसरोशाहा यांनी सांगितले.

रेल्वेप्रवासादरम्यान आता लवकरच तु्म्ही स्वीगीवरुन जेवण मागवु शकणार आहात. प्रवासादरम्यान प्रवाशांना आपल्या आवडीचे जेवण मागवता यावे यासाठी irctc ने स्विगीसोबत हातमिळवणी केली आहे. सुरुवातीला ही सेवा ४ शहरांपासून सुरु होणार आहे ज्यात बंगळुरु, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. त्यानंतर देशभरात या सुविधेचे विस्तारीकरण होणार आहे.

भारतातील मालमत्तांवरील भाडं म्हणजेच रेंटल यिल्ड हे इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सिंगापूरमध्ये भाड्याची महागाई ही 29 टक्के आहे. तरीही भारतातील भाड्यातील निव्वळ महागाई ही इतर देशांच्या तुलनेत जास्तच आहे. भारतातील काही मेट्रो शहरांमध्ये 30 टक्यांहून अधिक वाढ झालीय. चांगलं भाडं मिळत असल्यानं अनेक गुंतवणूकदार दुसरी मालमत्ता घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेटमध्ये तेजी आलीय आणि लक्झरी प्रॉपर्टीची मागणीही वाढलीय .

Published: February 23, 2024, 17:32 IST

जगभरात भारतात सर्वाधिक रेंटल यिल्ड