मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या

मुंबई, पुणे अहमदाबाद,बंगळुरू,चैन्नई, दिल्ली-एनसीआर,हैदराबाद,कोलकत्ता या शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात घरांच्या किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. क्रेडाई,कोलिअर्स आणि Liases Foras यांनी सयुक्तरित्या एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यात ही माहिती देण्यात आलीय. सध्याचा काळ हा बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्णकाळ असल्याची माहितीही अहवालात नमूद करण्यात आलीय. २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुण्यातील बांधकाम क्षेत्राच्या बाजारपेठेची वाढ ४५ टक्यांनी वाढली आहे

  • Team Money9
  • Last Updated : February 29, 2024, 16:55 IST

नमस्कार मी मंगेश.बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपले स्वागत…..

एक मार्चपासून अनेक नियमांत बदल होणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. पहिला निर्णय हा गॅस सिलेंडरबाबतचा आहे. घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीबाबत तेल कंपन्या काही बदल करू शकतात. दुसरा निर्णय हा फास्टटॅगबाबतचा आहे. फॉस्टटॅगचा केवायसी अपडेट केलेला नसल्यास एक मार्चपासून केवायसी अपडेट नसलेले फास्टटॅग निष्क्रिय केले जाऊ शकतात. तसेच फेसबूक,युट्यूब,एक्स आणि इंस्टाग्रॉमसारख्या सोशल मीडिया ऍप्सवर तथ्यहीन बातम्या चालवल्यास दंड लागणार आहे.

वाढत्या औषधांच्या खर्चामुळे उपचार घेणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय. वैद्यकीय महागाईबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने मधुमेह, उच्च रक्तदाबसह इतर 100 औषधांचे दर निश्चित केले आहेत. या औषधांमध्ये लहान मुलांच्या अॅंटीबायोटिकचाही समावेश आहे. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी 69 फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत तर 31 औषधांची विक्री किंमत ठरवण्यात आलीय.

भारतात दिवसेंदिवस अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या वेगानं वाढतेय. 2023 मध्ये अतिश्रीमंताची संख्येत 6.1 टक्क्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सध्या भारतात 13,263 अतिश्रीमंत म्हणजेच Ultra High networth व्यक्ती आहेत. तर 2028 मध्ये ही संख्या 19,908 होणार आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे,अशी माहिती नाइट फ्रैंकच्या अहवालात देण्यात आलीय.

.हुंदाई मोटर इंडियानं मिड साइज SUV Creta N-line या कारसाठी ऑफलाईन बुकिंग सुरू करण्यात आली आहे. येत्या ११ तारखेला ही कार बाजारात येणार आहे. पंचवीस हजार रुपयांचं टोकन रक्कम भरून कार ग्राहकांना बुक करता येणार आहे. या कारची एक्स शो रुम किमत साडे सतरा लाखांपासून सुरू होणार आहे.

मुंबई, पुणे अहमदाबाद,बंगळुरू,चैन्नई, दिल्ली-एनसीआर,हैदराबाद,कोलकत्ता या शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात घरांच्या किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. क्रेडाई,कोलिअर्स आणि Liases Foras यांनी सयुक्तरित्या एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यात ही माहिती देण्यात आलीय. सध्याचा काळ हा बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्णकाळ असल्याची माहितीही अहवालात नमूद करण्यात आलीय. २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुण्यातील बांधकाम क्षेत्राच्या बाजारपेठेची वाढ ४५ टक्यांनी वाढली आहे

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: February 29, 2024, 16:48 IST

मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या