बँकाचे काम लवकर उरकून घ्या, मार्चमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद

मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने मार्च महिन्यात बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. यामध्ये चार रविवार, दुसरा आणि शेवटचा शनिवार हे मिळून सहा दिवस तर आहेतच पण याव्यतिरीक्त गुड फ्रायडे, महाशिवरात्री, होळीसह काही दुसऱ्या सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची महत्त्वाची बँकेतील कामे लवकर पूर्ण करून घ्या.

१. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झालीय. १ मार्चपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ झालीय त्यानुसार आता सिलिंडरची किंमत 1795 रुपये इतकी झालीय.. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.

२.विमानप्रवास करणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे..सरकारी तेल कंपन्यानी विमानात वापरल्या जाणाऱ्या एविएशन टरबाइन फ्यूल म्हणजेच ATF मध्ये दरवाढ केलीय. मिळालेल्या माहितीनुसार या इंधनात 624.37 रुपयांची वाढ दर किलोलीटरमागे करण्यात आलीय. याअगोदर चार वेळा हवाई इंधन दरात कपात करण्यात आली होती पण मार्चमध्ये या किंमतीत वाढ झालीय. वाढलेली इंधन दर आजपासून लागू होतील. यामुळे अगोदरच मंदीत अस+लेल्या हवाई कंपन्या त्यांच्या तिकिटदरात वाढ करणाऱ्याची शक्यता आहे. यामुळे नेहमी विमानप्रवास करणाऱ्या लोकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

३.आयुष्यमान भारत आरोग्य खाते म्हणजेच ABHA ने महत्त्वाचा टप्पा पार केलाय. या सुविधेद्वारे देशभरात 2 कोटींहून अधिक रुग्णांना तात्काळ बाह्य रुग्ण विभाग नोंदणीचा लाभ मिळाला आहे. ज्यामुळे रुग्णांना लॅब टेस्टच्या रांगा, डॉक्टरची वाट पाहत ताटकळत बसण्यापासून सुटका मिळालीय, यामुळे गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि ज्यांना चालण्या-फिरण्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांना विशेषकरुन दिलासा मिळालाय, ऑनलाईन ओपीडी रजिस्ट्रेशन करण्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि जम्मू काश्मीर ही राज्य आघाडीवर आहेत.

४. मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने मार्च महिन्यात बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. यामध्ये चार रविवार, दुसरा आणि शेवटचा शनिवार हे मिळून सहा दिवस तर आहेतच पण याव्यतिरीक्त गुड फ्रायडे, महाशिवरात्री, होळीसह काही दुसऱ्या सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची महत्त्वाची बँकेतील कामे लवकर पूर्ण करून घ्या.

५. केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजूरी दिली आहे. यावर सरकार जवळपास 75,021 कोटी खर्च करणार आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांच्या घरावर सोलर पॅनल लावले जाणार आहेत, त्यासाठी त्यांना 78,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे. त्यासोबतच 300 युनिटपर्यंत वीज निशुल्क मिळणार आहे. जी कुटुंब सोलर पॅनल लावण्यास इच्छूक असतील ते नॅशनल पोर्टलद्वारे यासाठी आवेदन देऊ शकतात. या पोर्टलवर यासंबंधी संपूर्ण माहिती नागरिकांसाठी खुली आहे.

६. पेटीएमने पेटीएम पेमेंट बँकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. पेटीएमची संचालक कंपनी One 97 Communications च्या संचालक मंडळाने आरबीआयच्या कारवाईदरम्यान या दोन कंपन्यांमधील अंतर्गत करार संपवण्यास मंजुरी दिलीय. वन९७ कम्युनिकेशन्सने शुक्रवारी याबाबत माहिती दिलीय. दोन कंपन्यांनी एकमेकांवर विसंबून न राहता स्वतंत्र आर्थिक वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

७. महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला हळूहळू दिलासा मिळतांना दिसतोय. आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घट झालीय. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महागाईचा दर हा 4.59 टक्क्यांवर आलाय. डिसेंबर महिन्यात हाच दर ४.९१ टक्के होता तर वर्षभरापूर्वी घाऊक महागाई दर 6. 13 टक्के होता.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबुयात, पाहत रहा मनी९ मराठी.

 

Published: March 1, 2024, 17:37 IST

बँकाचे काम लवकर उरकून घ्या, मार्चमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद