बिटकॉईन जगातील आठवी मूल्यवान मालमत्ता

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १ मे, २०२४ रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आभासीचलन बिटकॉईनचा समावेश जगाील आठव्या मूल्यवान मालमत्तेत झालाय. बाजार भांडवलात चांदीला मागे टाकून बिटकॉईननं हा मान पटकावला आहे. 11 मार्च रोजी बिटकॉईनची किंमत 72 हजार डॉलरवर गेल्यानंतर मार्केट कॅप 1.42 ट्रिलियन डॉलरवर पोहचलं होतं. तर चांदीचं मार्केट कॅप हे सध्या 1.387 ट्रिलयन डॉलर एवढं आहे. डिडिटल टोकनमध्ये वाढती गुंतवणूक आणि मर्यादित टोकनचा पुरवठा यामुळे बिटकॉईनमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.

 

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महानगरपालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. . महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क, लंडन येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील भाविकांना अयोध्येत गेल्यानंतर महाराष्ट्र भवनात माफक दरात राहण्याची सोय होणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास मान्यात दिलीय . 9420.55 चौ. मीटर आकारच्या भूखंडाची किंमत 67 कोटी 14 लाख इतकी आहे. भूखंड उत्तर प्रदेश आवास आणि विकास परिषदेमार्फत सेक्टर 8 डी, भूमी विकास गृहस्थान एवं बाजार योजना, शहानवाजपूर या भागात आहे. महाराष्ट्र भवनाचे बांधकाम झाल्यावर भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेणे सोयीचं होणार आहे.

British American Tobacco (BAT), चे ITC कंपनीत 29 टक्के हिस्सा आहे.या आठवड्यात British American Tobacco दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे.त्यामुळे आयटीसीचा शेअर दोन टक्क्यांनी घसरत 400 रुपयांच्या खाली आलाय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: March 12, 2024, 13:55 IST

बिटकॉईन जगातील आठवी मूल्यवान मालमत्ता