'प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्स'मध्ये मुंबईची बाजी

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

महाराष्ट्र सरकारच्या तेरा आणि दहा वर्षे मुदतीच्या प्रत्येकी तीन हजार कोटी असे एकूण सहा हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २१ मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.रोख्यांचा कालावधी २२ मार्च, २०२४ पासून सुरू होणार आहे, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २२ मार्च २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २२ सप्टेंबर आणि २२ मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येणार आहे.

महागाईत वाढ होत असली तरीही ठराविक काळानंतर खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे महागाईचा धोका कायम असल्याचा उल्लेख आरबीआयच्या लेखात करण्यात आलाय. आरबीआयला आर्थिक विकासाचा कायम ठेवण्यासाठी चार टक्क्यांच्या आत महागाईचा दर ठेवण्याची जबाबदारी आहे.2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासाचा दर हा 7.4 राहू शकतो असंही आरबीआयनं लेखात नमूद केलंय.

आगाऊ कर संकलनात वाढ झाल्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात 17 मार्चपर्यंत निव्वळ थेट कर संकलन हे 19.88 टक्क्यांनी वाढून 18 लाख 90 हजार कोटी रुपयांवर पोहचलंय,अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलीय. या कर संकलनानंतर 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या सरकारच्या सुधारित उद्दिष्टानुसार थेट कर संकलनाचं 97 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक कर संकलन हे कंपनीच्या कर संकलनापेक्षा जास्त आहे. 17 मार्चपर्यंत 18 लाख 90 हजार 259 कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनापैकी परताव्यासह 9 लाख 14 हजार 469 कोटी रुपये , परताव्यासह वैयक्तिक आयकर 9 लाख 72,224 एवढा आहे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचाही समावेश आहे.

आरबीआयनं किरकोळ कर्ज देताना अनेक निर्बंध घातल्यामुळे या आर्थिक वर्षात किरकोळ कर्जात शंभर अंकाची म्हणजेच 15 टक्क्यांची घसरण होऊ शकते. एचडीएफसी बँकेचे एकत्रिकरणाचा परिणाम यात गृहित धरल्यास सोळा ते साडेसोळा टक्क्यानं रिटेल कर्ज वाटप कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयनं बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनाअसुरक्षित कर्जाचे वाटप करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय तसेच विविध निर्बंधही घातले आहेत.
2023 च्या चवथ्या तिमाहीत प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्समध्ये मुंबईनं जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. वर्षागणिक मुंबईतल्या मालमत्तेच्या किमतीत दहा टक्के वाढ झाली आहे,अशी माहिती नाईट फ्रॅक या संस्थेनं दिलीय. मुंबईप्रमाणेच नवी दिल्ली, बंगळुरू या शहरातल्या आलिशान प्रॉपर्टीच्या किमतीतही वाढ झाली आहे. वेगवान आर्थिक विकास तसेच चांगलं जीवन जगण्यासाठी लोकांनी मुंबईला पसंती दिल्यानं मुंबईत प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थाबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

Published: March 20, 2024, 16:42 IST

'प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्स'मध्ये मुंबईची बाजी