अंबानी श्रीमंतीत तर ब्रॅण्ड व्हॅल्यूत LIC अव्वल

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकरनी गुंतवणूक केलेली आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी महाराष्ट्रात सेमीकंडक्टरमध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक येत्या पाच वर्षात केली जाणार आहे. या गुंतवणुकीत तेंडूलकर यांची किती गुंतवणूक आहे याची सविस्तर माहिती नाही.
गेल्या २३ मार्च रोजी नवी मुंबईत तेंडुलकर, निवृत्त अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, आणि कंपनीचे संस्थापक, प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोंडणकर यांच्या उपस्थित २५ हजार चौरस क्षेत्रफळावर कंपनीने नवीन सेमीकंडक्टर असेंबली व चाचणी युनिटचं उदघाटन केलंय.

भारताच्या चालू खात्यावरील तूट सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 11.4 अब्ज डॉलरच्या पातळीवरून १०.५ अब्ज डॉलरवर घसरली आहे. तुटीचे हे प्रमाण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्परादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत 1.2 टक्के एवढे आहे. वर्षभरा पूर्वी चालू खात्यातील तूट ही १६.८ अब्ज डॉलर एवढी होती .

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअरमध्ये 54 टक्के वाढणार असल्याचं गोल्डमन सॅचने आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये जाहीर केलंय. २०२६ या आर्थिक वर्षात रिलायन्सचा शेअर 4,495 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. रिलायन्स आणि डिस्नी या दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत माध्यम व्यवसायात काम करणार आहेत. रिलायन्स या उपक्रमात 11 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही विम्यातील जगातील सर्वाधिक मजबूत ब्रॅण्ड असल्याचं ब्रॅण्ड फायनान्सनं आपल्या अहवालात नमूद केलंय. एलआयसीची ब्रॅण्ड व्हॅल्यू ही 9.8 अब्ज डॉलर आहे. तर एलआयसीचा ब्रॅण्ड इंडेक्स स्कोअर हा 88.3 आहे तर ब्रॅण्ड रेटिंग ही ट्रिपल A आहे.

भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म,लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 190 sme कंपन्यांनी भांडवली बाजारातून सुमारे 5,579 कोटी रुपयांची निधी उभारला आहे. तर 2022-23 या वर्षातकंपन्यांनी एसएमई आयपीओद्वारे भांडवली बाजारातून 2,235 कोटी रुपयांची उभारणी केलीय

मुंबईने अब्जाधिशांच्या संख्येत बीजिंगला मागे टाकत जागतिक अव्वल स्थान पटकावले आहे,अशी माहिती हुरून ग्लोबलनं जाहीर केलेल्या यादीत मिळालीय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या वर्षभरात अंबानीच्या संपत्तीत ४० टक्के भर पडली आहे.अंबानींची संपत्ती ११५ अब्ज डॉलर आहे. तर गौतम अदानी हे देशातील श्रीमतांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी यांची संपत्ती कमी झाली होती. मात्र, त्यांनी हा तोटा भरून काढत गेल्या वर्षी संपत्तीत ६२ टक्क्यांची भर पाडली आहे.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

 

Published: March 27, 2024, 12:54 IST

अंबानी श्रीमंतीत तर ब्रॅण्ड व्हॅल्यूत LIC अव्वल