अंबानी-अदानींची 'पॉवर'साठी युती

तुमच्या आयुष्यावर आणिि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या ऐका.

 

नमस्कार मी निखिता बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी.
भारतीय राजकारणात युती आणि आघाड्या नव्या नाहीत. मात्र, उद्योग व्यवसायातील या युतीमुळे सर्वाचेचेच लक्ष वेधलं गेलंय.
देशातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एका मोठ्या प्रकल्पासाठी करार झालाय. अदानी यांच्या मध्य प्रदेशातील एक वीज प्रकल्पात रिलायन्स इडस्ट्रीजने 26 टक्के हिस्सेदारी खरेदी केलीय. वीज प्रकल्पातून तयार होणाऱ्या 500 मेगावॅट वीज प्रकल्पासाठी हा करार करण्यात आलाय. अदानी यांच्या महान एनर्जेन लिमिटेड कंपनीचे दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले पन्नास कोटी समभाग रिलायन्स खरेदी करणार आहे. तसेच खासगी वापरासाठी पाचेश मेगावॅट वीजेचा वापरअंबानी करणार आहेत.

केंद्र सरकारची वित्तीय तूट फेब्रुवारी अखेरीस 15 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही तूट सुधारित वार्षिक उद्दिष्टांच्या 86.5 टक्के एवढी आहे. सरकारी खजिन्यात जमा होणारा महसूल आणि सरकारी खर्च यातील फरकाला वित्तीय तूट असे म्हणतात. गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट ही 14.53 लाख कोटी रुपये म्हणजेच वार्षिक उद्दिष्टाच्या 82.8 टक्के होती.

देशातील गव्हाचा साठा 16 वर्षातील नीच्चांकी पातळीवर पोहचला आहे. भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एफसीआयकडील गव्हाचा साठा 70 लाख टनांपर्यंत खाली आलाय. तर दुसरीकडे केंद्राने यंदा 320 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. 2023-24 या वर्षात 340 लाख गहू खरेदीचे उद्दिष्ट असतानाही 260 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आलीय.

महाराष्ट्रातल्या नामांकित ज्वेलर्समध्ये दुसरा क्रमांक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे आयपीओसाठी ‘सेबी’कडे ‘डीआरएचपी’ सादर केला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्याचे अकराशे कोटी रुपयांचे समभाग विक्रीला आणले जातील.उभारलेल्या भांडवलातून राज्यात १२ नवी दालने उघडली जातील, तर उरलेली रक्कम कंपनीची जुनी कर्जे फेडण्यासाठी; तसेच कंपनीच्या अन्य उद्दिष्टांसाठी वापरली जाईल. महाराष्ट्रात सर्वाधिक दुकाने असलेल्या बड्या आणि नव्या युगाच्या ज्वेलर्समध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’चा दुसरा क्रमांक लागतो. कंपनीची २०२१ ते २०२३ दरम्यान महसूलवाढ भारतात सर्वांत जास्त आहे.

नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत,अशी माहिती आरबीआयनं दिलीय. एप्रिल महिन्यात एक,पाच,सात,नऊ,दहा,अकरा,तेरा,चवदा,पंधरा, सतरा,वीस, एकवीस,सत्तावीस आणि 28 तारखेला बँका बंद राहतील.

 

Published: March 29, 2024, 15:07 IST

अंबानी-अदानींची 'पॉवर'साठी युती