घर खरेदीदारांना दिलासा, रेडीरेकनर 'जैसे थे'

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी निखिता बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीलाच घर खरेदीदारांना दिलासा देणारी बातमी
मालमत्ता खरेदी-विक्री करतानना पाहिले जाणाऱ्या चालू बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडीरेकनर दरात यंदा कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणूका असल्यानं रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ज्यांनी गुंतवणूक म्हणून घर खरेदी केले आहेत त्यांना मात्र फटका बसणार आहे. मावळत्या आर्थिक वर्षात मालमत्ता-खरेदी विक्रीतून सरकारच्या खजिन्यात तब्बल 49 हजार 750 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय.

————-
आता बातमी काँग्रेसला आलेल्या प्राप्तीकर विभागाचत्या नोटीसची
2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सुमारे 3,500 कोटी रुपये वसूल करण्यासाठी प्राप्तीकर विभाग कोणतीही दंडात्मक पावले उचलणार नाही,असं आश्वासन भारताचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले. प्राप्तीकर विभागानं काँग्रेला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस बजावली आहे. 2014-15 ते 2016-17 या मूल्यांकन वर्षासाठी 1,745 कोटी रुपये कर थकबाली असल्याचे नोटिशीत म्हणटले आहे. यामुळे आता काँग्रेसकडे प्राप्तिकर थकबाकीची एकूण रक्कम 3,576 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
———
आता बातमी सिलेंडरच्या दराबाबतची
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलोग्रॅम व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत सिलेंडरची किंमत 1717.50 पैसे एवढी झाली.. मात्र, व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या नाहीत.

भारतीय स्टेट बँकेने काही डेबिट कार्डच्या वार्षिक शुल्कात 75 रुपयांची वाढ केलीय. या वाढीनंतर क्लासिक,सिल्वर,ग्लोबर,कॉन्सटेक्टलेस डेबिट कार्डसाठी आता 125 रुपयांऐवजी 200 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच या शुल्कावर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी वेगळा द्यावा लागणार आहे.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9मराठी

 

Published: April 1, 2024, 15:47 IST

घर खरेदीदारांना दिलासा, रेडीरेकनर 'जैसे थे'