HDFC बँकेच्या शेअरमध्ये तेजी कशामुळे ?

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

नमस्कार मी श्रावणी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
खासगी क्षेत्रातील नंबर एक क्रमाकांची बँक असलेल्या HDFC बँकेने कर्ज वितरणात 25 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि ठेवीतही 26.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यामुळे शेअर बाजारात HDFC बँकेच्या शेअरमध्ये 1.49 टक्क्यांनी वधारत शेअरचा दर हा 1550 रुपयांपर्यंत पोहचलाय. ठेवी आणि कर्जातील वाढीमुळे गेले अनेक दिवस बराच काळ एकाच किंमतीवर रेंगाळत असलेल्या HDFC च्या शेअरमध्ये हालचाल दिसून आलीय.HDFC बँकेच्या गृह, वैयक्तिक कर्ज, आणि ग्राहक कर्ज वितरणात 108 टक्के वाढ झाली आहे. आता आरबीआयनं रेपो दर स्थिर ठेवल्यानंHDFC बँकेला फायदा होणार आहे.

आता बातमी आरबीआयच्या व्याज दराची
आरबीआयनं रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवल्यानं कर्जदारांचा हप्ता आहे तसाच राहणार आहे. तर नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना चढ्या व्याज दरातच कर्ज घ्यावं लागणार आहे. आरबीआयनं रेपो दर स्थिर ठेवल्यानंतर कर्जदारांनी सध्याच्या कर्जाची समीक्षा करावी. कर्जाचा कालावधी किती आहे हे पाहून कमी व्याज दरात कर्ज मिळत असल्याच चौकशी करावी. नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांनी विविध बँकांचा गृहकर्जाच्या व्याज दराची तुलना करावी. सिबिल स्कोअर चांगला असल्यास बँकेसोबत व्याजदराबाबत घासाघीस केल्यास आणखी कमी व्याज दरात कर्ज मिळू शकतं. तसेच कर्जदारांनी आपल्या गरजेनुसार फिक्स किंवा फ्लोटिंग दरात कर्ज घ्यावं. फिक्स व्याज दरात कर्ज घेतल्यास व्याज दरात बदल होत नाही. मात्र, फ्लोटिंग व्याज दरात कर्ज घेतल्यास आरबीआयच्या रेपो दरानुसार व्याज दर कमी जास्त होत असतात.

आता बातमी खाद्य पदार्थातील महागाईची
कांदा,टोमॅटो आणि बटाटा यांचे दर वाढल्यानं शाकाहारी ताटाचा दरात सात टक्के वाढ झालीय. मार्च महिन्यात शाकाहारी ताटाचा दर हा 27 रुपये 30 पैशांवर गेलाय. तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाकाहारी ताटाचा दर हा 25 रुपये 50 पैसे एवढा होता.
क्रिसिल या मानांकन देणाऱ्या संस्थेनं Roti,Rate Rice निर्देशांक जाहीर केलाय. त्यात ही माहिती देण्यात आलीय. शाकाहारी ताटाचा दर कमी होत असताना पोल्ट्रीचे दर कमी झाल्यानं मासांहारी ताटाचा दर सात टक्क्यानं कमी झालाय. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मासांहारी ताटाचा दर हा 59 रुपये 20 पैसे होता तो तर आता 54 रुपये 90 पैशांवर आलाय.

आता बातमी रिअल इस्टेट बाजाराची
एक कोटींहून जास्त किंमत असलेल्या घराच्या विक्रीत 51 टक्के वाढ झाल्याची माहिती नाईट फ्रँकच्या या संस्थेच्या अहवालातून उघड झालीय.
जानेवारी ते मार्च दरम्यान देशभरात 86,345 घरांची विक्री झालीय. विशेष म्हणजे एकट्या या कालावधीत मुंबईत 23,743 अलिशान घरांची विक्री झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत घरांच्या विक्रीत तब्बल 17 टक्के वाढ झालीय. तर पुण्यात 11,832 अलिशान घरांची विक्री झालीय. मुंबईप्रमाणेच पुण्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटींहून अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीत 14 टक्के वाढ झालीय.

आता बातमी इलेक्ट्रिक वाहनांची

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, पुणेकर अद्याप ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यात म्हणावं तेवढं प्राधान्य देत नाहीत. 2023-24 या आर्थिक वर्षात पुण्यात पेट्रोल आणि डिझेलवरील दोन लाख 95 हजार 230 नवीन वाहनांची भर पडली. या वाहनांमध्ये सर्वाधिक एक लाख 83 हजार दुचाकी आहेत. तर 32 हजार 636 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झालीय. ई-वाहनांमध्ये 29 हजार 285 म्हणजेच 29 टक्के वाहनं दुचाकी आहेत. ई-वाहनांची किंमत जास्त आहे तसेच बॅटरीच्या आयुर्मानाची चिंता तसेच चार्जिंगची सुविधा नसल्यानं इलेक्ट्रिक वाहनांबाबत ग्राहकांच्या मनात अद्याप सांशकता आहे

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता इथंच थांबूयात पाहात रााहा मनी9 मराठी

Published: April 5, 2024, 15:34 IST

HDFC बँकेच्या शेअरमध्ये तेजी कशामुळे ?