व्होल्टासच्या एसींची विक्रमी विक्री,शेअरच्या किंमतीतही वाढ

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

नमस्कार मी श्रावणी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

बीएसईवर लिस्टेड असणाऱया कंपन्यांचं बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन हे 400 लाख कोटी रुपायांच्यावर गेले आहे. लॉर्ज,मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी आल्यानं हा टप्पा ओलांडला आहे. लॉर्ड कॅपमधील वेटेज जास्त असलेल्या शेअर्समध्ये तेजी आल्यानं हा टप्पा ओलांडता आलाय. HDFC बँकेच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानं निफ्टी-50 मध्ये मोठी वाढ झालीय.

आता बातमी सोनं आणि चांदी्च्या दरातील तेजीची
सोनं आणि चांदीच्या दरात तेजी कायम आहे. भारतातील सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने नवनवीन विक्रम होत आहेत आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदाच सोन्याने 71,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या वाढीनंतर भाव 81,000 रुपयांच्या वर दिसत आहेत.

बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बंधन बँकेचा शेअर बाजार सुरू होताच सुरूवातीच्या तासात 9 टक्क्यांनी घसरला आहे. 2015 पासून घोष बँकेचं नेतृत्व करत आहेत. 9 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीय तसेच राजीनामा दिलाय.

देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांना मोठी मागणी दिसून आली आहे. कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सह-कार्यालयीन जागा अर्थात को-वर्किंग अथवा फ्लेक्स स्पेसचे प्रमाण २३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यंदा फ्लेक्स स्पेसमध्ये पुणे आघाडीवर असून शहरात १२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. त्या खालोखाल बंगळूरुमध्ये ९ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत.‘नाइट फ्रँक इंडिया’ने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात देशांतील आठ महानगरांतील कार्यालयीन जागांच्या व्यवहारांचा जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आढावा घेण्यात आला.

भारतीय हवामान विभागानं यंदाचा उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतील असं सांगितल्यानंतर एसी,फॅन, रेफ्रिजेरेटर आणि शीतपेयांच्या विक्रीत वाढ होताना दिसून येतेय. गेल्या आर्थिक वर्षात व्होल्टास या कंपनीनं 20 लाख एसींची रेकॉर्डब्रेक विक्री केलीय. चांगल्या कामगिरीनंतर आज व्होल्टासच्या शेअरमध्ये सुमारे 8 टक्क्यांनी वाढला. जवळपास शेअरमध्ये 96 रुपयांची वाढ होत शेअर 1328 रुपयांच्या किंमतीवर पोहचला.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 8, 2024, 15:48 IST

व्होल्टासच्या एसींची विक्रमी विक्री,शेअरच्या किंमतीतही वाढ