निवडणुकीनंतर मोबाईलवर बोलणं महाग होणार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

नमस्कार मी श्रावणी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

बातमीपत्राच्या सुरूवातीला पाहूयात सोनं आणि चांदीच्या दरातील तेजीची बातमी

सोन्याच्या दरात दररोज एक नवा विक्रम होतोय. शुक्रवारीही सोन्यानं दराच्या बाबतीत विक्रम केलाय. सोनं पहिल्यांदाच 72 हजार रुपयांच्यावर गेलंय. MCX वर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 72,678 रुपयांवर पोहचलाय.
सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झालीय. एक किलो चांदीचा दर हा 84 हजार रुपयांवर पोहचलाय. अमेरिकेत महागाई वाढत असल्यानं डॉलरचे दर कमी होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी करायला सुरूवात केलीय. तसेच जगभरातील मध्यवर्ती बँकांही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत.
आता बातमी मोबाईलच्या रिचार्जची
लोकसभा निवडणुकीनंतर दूरसंचार कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे. ही दरवाढ सुमारे 15 ते 17 टक्के असणार आबे. जिओ आणि एअरटेलकडून प्रीमियम ग्राहकांना देत असलेला अनलिमिटेड डाटा देणं ही बंद करू शकतात. मोबाईलचे रिचार्ज हे 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. 2021 नंतर दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ केली नाही.
आता बातमी ऍपल फोनची
एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावधान राहण्याचा इशारा अॅपलनं दिलाय. भारतासह 91 देशांतील आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांना ही इशारावजा सूचना देण्यात आलीय. तसेच गोपनियता आणि डेटा सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. पेगॅसस मालवेअरमुळे राजकीय वादंग झाले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा देण्यात आल्यानं पुन्हा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे.

आता बातमी अर्थव्यवस्थेबाबतची

आशियाई विकास बँकेनं भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी हा सात टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या अगोदर जीडीपी हा 6.7 टक्के राहील असं सांगण्यात आलं होतं. त्यात सुधारणा करण्यात आलीय.सरकारी आणि खासगी गुंतवणूक तसेच सेवा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे आशियाई बँकेनं भारताच्या जीडीपीमध्ये सुधारणा केलीय.

आता बातमी म्युच्युअल फंडाबाबतची

2022-23 पेक्षा 2023-24 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड हाऊसेसनी सत्तर टक्के नवीन गुंतवणूकदार जोडले आहेत. शेअर मा्र्केटमधून चांगला परतावा मिळत असल्यानं म्युच्युअल फंडानी नवीन 68 लाख गुंतवणूकदार जोडले आहेत. तसेच म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत म्हणजेच AUM मध्येही 35 टक्के वाढ झालीय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 12, 2024, 16:57 IST

निवडणुकीनंतर मोबाईलवर बोलणं महाग होणार