म्युच्युअल फंडाची गंगाजळी पोहचली 39 लाख कोटींवर

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

बातमीपत्राच्या सुरूवातीला पाहूयात म्युच्युअल फंडासंदर्भातली बातमी
किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि भांडवली बाजाराच्या चांगल्या कामगिरीमुळे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत देशातील सर्व 45 म्युच्युअल फंड घराण्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 14 लाख कोटी रुपयांनी वधारून 53 लाख 40 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे. मार्च 2023 मध्ये म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता केवळ 39 लाख 42 हजार कोटी रुपयांवर होती. एकूण मालमत्तेत अवघ्या एका वर्षात 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजेच अॅम्फीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिलीय.
गेल्या वर्षात म्युच्युअल फंड फोलिओची संख्याही 17 कोटी 78 लाखांच्या विक्रमी पातळीवर पोहचलीय. विशेष म्हणजे 4 कोटी 46 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले आहेत.

आता बातमी रुपयाची
अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपया बुधवारी 83 रु. 50पैशांची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे. आखातातील भू-राजकीय तणाव, अमेरिकेच्या व्याज दर कपातीची अनिश्चितता यामुळे रुपयाचे अवमूल्यन होतंय. जागतिक अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार जोखिम असलेल्या मालमत्तेची विक्री करत आहेत
आता बातमी महिला सक्षमीकरणाची
महिलेच्या नावानं सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत राज्य सरकारकडून देण्यात येतेय.या नियमामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात 28 हजार 942 महिलांनी या सवलतीचा फायदा घेतला. पुण्यातील 9938 तर मुंबईतील 5687 महिलांनी या सवलतीलाचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात मुद्रांक शुल्क विभागानं सवलतीपोटी तब्बल 202 कोटी 14 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क माफी दिलीय. या अगोदर ही सवलत घेणाऱ्यांना सदनिका खरेदी केल्यापासून 15 वर्षापर्यंत सदनिकेची विक्री करता येत नाही. तसेच अशा सदनिका केवळ महिलांनाच विक्री कराव्या लागतात या अटी राज्य सरकारनं शिथिल केल्या आहेत.

आता बातमी सोन्याच्या दराची
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेसह देशभरात वाढत असलेली महागाई यामुळे सोन्याच्या दरा तेजी येतेय.
दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 73 हजार 130 रुपयांवर पोहचली तर चांदीचा दर हा 83,850 रुपये किलोपर्यंत पोहचला.
आता बातमी भारतीय अर्थव्यवस्थेची
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच आयएमएफने आर्थिक वर्ष २०२५ साठी भारताच्या वाढीचा म्हणजेच जीडीपी अंदाज साडे सहा टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. देशांतर्गत मागणीची चांगली स्थिती,खासगी गुंतवणूक आणि तरुणांची वाढती लोकसंख्या लोकसंख्या यामुळे जानेवारीत वर्तविलेल्या साडे सहा टक्क्यांच्या अंदाजात तीस आधारभूत अंकांची वाढ करण्यात आली आहे.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 17, 2024, 12:41 IST

म्युच्युअल फंडाची गंगाजळी पोहचली 39 लाख कोटींवर