एलॉन मस्क भारतात दोन ते तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करणार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

बातमीपत्राच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्याची बातमी
टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सोमवारी भेट घेणार आहेत. भारत दौऱयात मस्क दोन ते तीन अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करणार आहेत. अमेरिका,चीननंतर भारतातील वाहनाची बाजारपेठ ही जगातील तिसरी मोठी बाजारपेठ आहे.

आता बातमी व्होडाफोन आयडियाची
व्होडाफोन आयडिया लिमिटेडची सार्वजनिक समभाग विक्री म्हणजेच FPO ला सुकाणू गुंतवणूकदार म्हणजेच Anchor Investor कडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीनं 74 Anchorद Investor कडून 5,400 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या गुंतवणूकदारांमध्ये जीक्यूजी पार्टनर, द मास्टर ट्रस्ट,बँक ऑफ जपान, यूबीएस,मॉर्गन स्टॅन्ले इन्वेस्टमेंट,सिटीग्रुप ग्लोबल यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. व्होडाफोन-आयडियाने 11 रुपये प्रति शेअर या दरानं 411 कोटी शेअरचे वाटप केले आहे. Anchor Investor मध्ये जीक्यूजी पार्टनरने सर्वाधिक 1,345 कोटी रुपयांचे 26 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. आज व्होडाफोन आयडियाचा शेअरची किंमत सुमारे सव्वातीन टक्क्यानं वाढून 13 रुपये 40 पैशांवर पोहचली.
आता बातमी साखर उत्पादनाची
सलग तीसऱ्या वर्षीही साखर उत्पादनात महाराष्ट्राने मक्तेदारी कायम ठेवलीय. या गळित हंगामात महाराष्ट्रानं 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करीत अव्वल स्थान पटकावलंय. उत्तर प्रदेशात 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात मुळ अंदाजापेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झालीय.

आता बातमी नेस्लेची
नेस्ले कंपनीकडून तान्या मुलांच्या सेरलेक या खाद्यपदार्थात अतिरिक्त साखर मिसळत असल्याचा एक अहवाल प्रदर्शित झालाय. या अहवालाची केंद्र सरकारनं स्वत:हून दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही नेस्लेकडून सेरलेकमध्ये अतिरिक्त साखर मिसळत असल्याचं अहवालात म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील याबाबत चिंता व्यक्त केलीय.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 18, 2024, 18:23 IST

एलॉन मस्क भारतात दोन ते तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करणार