शेअर बाजारातील तेजीमुळे विक्रमी 15 कोटी डिमॅट खाती

तुमच्याल आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी निखिता बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीलाच बातमी कर्मचारी कपातीची
जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात थांबण्याचं नाव घेत नाही. अमेरिकेतल्या अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता जपानमध्येही कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची नामुष्की आलीय.तोशिबा कंपनी जवळपास पाच हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास सात टक्के लोकांना नोकरी गमावण्याची वेळ आलीय.
आता बातमी आरबीआयची
2024-25 या आर्थिक वर्षात आरबीआयकडून रेपो दर कमी होण्याची शक्यता धूसर झालीय,अशी माहिती मॉर्गन स्टॅनलीनं दिलीय. गुंतवणूक दरामध्ये होत असलेली वाढ, चार टक्क्यांच्यावर महागाईचा दर असल्यानं आरबीआय रेपो दर आहे तसेच म्हणजेच साडे सहा टक्के कायम ठेवणार आहे.
आता बातमी एव्हरेस्ट मसाल्याची
नेस्लेच्या सिरेलॅकनंतर आता एवरेस्ट मसाल्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतातून सिंगापूरमध्ये निर्यात झालेले एवरेस्टचे फिश करी मसाले बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मसाल्यात इथिलिन ऑक्साईडची या रसायनाची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त असल्याने सिंगापूरनं हा निर्णय घेतलाय.

आता बातमी ज्येष्ठ नागरिकांबाबतची

2050 मध्ये भारतात तब्बल 34 कोटी नागरिक हे ज्येष्ठ नागरिक असणार आहेत, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अडीचशे टक्क्यानं वाढणार आहे.,अशी माहिती रिअल इ्टेट कंपनी सीबीआरईनं दिलीय. 2025 पर्यंत जगभरातील एकूण ज्येष्ठ नागरिकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 17 टक्के राहणार आहे,असंही अहवालात नमूद करण्यात आलंय. गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रकल्पाची मोठी मागणी वाढलीय. वरिष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार बांधकाम व्यावसायिकही प्रकल्पांची उभारणी करत आहेत.

आता बातमी शेअर बाजाराची

शेअर बाजारातील तेजीकडे पाहून किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित होत आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच 15 कोटी .१ लाख विक्रमी टप्पा गाठला आहे, अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालात देण्यात आलीय. मार्च महिन्यात 31 लाख 30 हजार नवीन डिमॅट खात्यांची भर पडली आहे. संपूर्ण वर्षभर हा कल कायम आहे 2024 या आर्थिक वर्षात मासिक आधारावर सरासरी 31 लाख नवीन खाती उघडली गेली आहेत. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येण्याची अपेक्षा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीमध्ये होत असलेली वाढ पाहून अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत.

आता बातमी सोनं आणि चांदीतल्या दरातील तेजीची
गेल्या दोन महिन्यात भारतात सोन्याच्या दरात 11 हजार रुपयांची वाढ झालीय. 23 फेब्रुवारील रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर हा 62,000 रुपये होता, तर 19 एप्रिल रोजी सोन्याचा दर हा 73,600 रुपयांवर पोहचलाय. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही गेल्या दोन महिन्यात 13,797 रुपयांची वाढ झालीय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढती महागाई यामुळे सोनं आणि चांदीच्या दरात तेजी आलीय.

आता बातमी टाटा मोटर्सची
टाटा मोटर्सकडून जग्वार लँड रोव्हरच्या आलिशान कारचं उत्पादन भारतात केले जाणार आहे. कार उत्पादन निर्मितीसाठी टाटा मोटर्स तमिळनाडूत एक अब्ज डॉलर गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. भारतात पहिल्यांदाच जग्वार लँड रोव्हरचं उत्पादन होणार आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या आलिशान कारची विक्री भारतात आणि भारताबाहेर केली जाणार आहे. सध्या चीन,ब्राझील आणि स्लोव्हाकियातल्या प्रकल्पात जग्वार लँड रोव्हरची निर्मिती होते. ब्रिटनमधून सुटे भाग आयात करून पुण्याजवळील प्रकल्पात बाांधणी करून भारतात जग्वार लँड रोव्हरची विक्री करण्यात येते. जग्वार लँड रोव्हर ब्रॅण्डच्या रेंज रोव्हर एव्होक, डिस्कव्हरी स्पोर्ट आणि जग्वार एफ-पेस या तीन मॉडेलची विक्री भारतात करण्यात येते

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 19, 2024, 17:22 IST

शेअर बाजारातील तेजीमुळे विक्रमी 15 कोटी डिमॅट खाती