आनंदाची बातमी, ऍपल देणार भारतात 5 लाख जणांना रोजगार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

बातमीपत्राच्या सुरूवातीला बातमी नोकऱ्यांची
जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माण करणारी कंपनी ऍपल येत्या तीन वर्षात भारतात जवळपास पाच लाख जणांना नोकरी देणार आहे. या नोकऱ्या ऍपलला सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्या देणार आहेत. सध्या ऍपलला सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांनी जवळपास दीड लाख जणांना नोकरी दिलीय. ऍपलचे दोन प्रकल्प चालवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं सर्वाज जास्त नोकऱ्या दिल्या आहेत.
आता बातमी झोमॅटोची

आता तुम्ही झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. झोमॅटोनं प्लेटफॉर्म शुल्क 25 टक्क्यानं वाढवल्यानं आता प्रत्येक ऑर्डरमागे पाच रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. गेल्यावर्षी झोमॅटोनं दोन रुपये प्लेटफॉर्म शुल्क लावण्यास सुरूवात केली होता. त्यानंतर तीन रुपये शुल्क करण्यात आले होते. गोल्ड मेंबरनाही फीस द्यावी लागणार आहे. सोमवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये जवळपास साडे चार टक्के वाढून 197 रुपयांवर पोहचलाय.

विमा नियामक इरडानं आता आरोग्य विम्याच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय. आता 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. इरडानं आता आरोग्य विम्यातील वयाचं बंधन हटवलं आहे. यामुळे वृद्ध नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचे कवच मिळत नव्हते. वृद्ध नागरिकांच्या आजारानुसार कंपन्या पॉलिसी तयार करणार आहेत.

आता बातमी HDFC बँकेची
HDFC बँकेतल्या कर्मचाऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांनी ही घोषणा केलीय. या अनुदानामुळे तरूण कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढार आहेत. नुकतंच HDFC बँकेचा निकाल जाहीर झालाय त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीय. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 16,511 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. बँकेचे कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली असल्यानं त्यांना त्याचं फळ मिळालं आहे,असंही जगदीशन यांनी म्हटलंय .

आता बातमी कर संकलनाची
2023-24 या आर्थिक वर्षात थेट प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 17.7 टक्क्यानं वाढून 19 . 58 लाख कोटी रुपयांवर पोहचलंय. मागील आर्थिक वर्षात थेट प्रत्यक्ष कर संकलन 16.63 लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष कराच्या संकलात 2.95 लाख कोटी रुपयांची वाढ झालीय. 2023-24 या आर्थिक वर्षात 3.79 लाख कोटी रुपयांचं रिफंड पण देण्यात आलंय . गेल्या वर्षीच्या तुलनेत रिफंडमध्येही 22.74 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय.

सिंगापूरनंतर हाँगकाँगच्या अन्न आणि औषधी प्रशासनानं भारतातील MDH आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या पॉकेटवर बंदी घातलीय.या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड या रसायनाचं प्रममाण प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आलीय इथिलीन ऑक्साईडमुळे कॅन्सरचा होण्याचा धोका असतो. एमडीएचच्या मद्रास करी,सांबर मसाला,करी पावडर आणि एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय.,

जॉनसन एंड जॉनसनच्या टेल्कम बेबी पावडरमध्ये asbestos चे प्रमाण आढळल्यानं कंपनीला अमेरिकेच्या न्यायालयानं साडे चार कोटींचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी अमेरिकेत एका महिलेने दहा वर्षांपूर्वी जॉनसन एंड जॉनसनच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. asbestos मुळे त्या महिलेला कॅन्सर झाला होता आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात साडे चार कोटी रुपयांची नुकसान भरपाई करण्याचे आदेश न्यायालयाने कंपनीला दिलेत

बातम्यांचा लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

Published: April 22, 2024, 17:35 IST

आनंदाची बातमी, ऍपल देणार भारतात 5 लाख जणांना रोजगार