तिसऱ्या टर्ममध्ये मोदींचा कृषीक्षेत्रासाठी 'मेगाप्लान'

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच मोदी तिसऱ्यांता पंतप्रधान झाल्यास त्यांनी कृषी क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्याचं नियोजन केलंय.
केंद्र सरकारकडून बासमती तांदूळ,अल्कोहल असलेली पेय,मध,आंबा आणि केळसह मोठी संधी असलेल्या 20 कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर जोर देणार आहे. येत्या तीन महिन्यात यासंदर्भातला कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत अपेडामार्फत विविध राज्य सरकार आणि इतर भागधारक उदाहरणार्थ निर्यातदार यांच्याशी चर्चा सुरू केली आहे,अशी माहिती वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलीय

कृषी आणि कृषीसंलग्न पुरवठा साखळीतली नासाडी थांबवून मूल्यवर्धनासाठी कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअप्ससाठी तब्बल 750 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. अॅग्रीशुअर या फंडाच्या नावानं कृषी क्षेत्रातल्या 85 स्टार्टअप्ससाठी पुढील पाच वर्षात प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कृषी तंत्रज्ञान,अन्न प्रक्रिया,पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, पुरवठा साखळी व्यवस्थापन,कृषी यांत्रिकीकरण आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ला निधी देण्यात येणार आहे. तसेच दोन कोटी रुपयांच्या कर्जावर तीन टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. कृषी पायाभूत निधीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

दूरसंचार क्षेत्रातील टेलिकम्युनिकेशन कन्सलटन्ट लिमिटेड म्हणजेच टीसीआयएल या सरकारी कंपनीकडून केंद्र सरकारला 3 हजार 443 कोटी रुपयांचा घसघशीत लाभांश मिळाला आहे. या आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांकडून केंद्र सरकारला 48 हजार कोटी रुपयांचा लाभांश मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या एडीआरमध्ये 1.8 टक्क्यानं वाढून 67,835 कोटी रुपयांवर पोहचलाय.

दहा गिगागॅट ऑवर अडव्हान्स केमिकल सेल बॅटरी निर्मितीसाठी 3,620 कोटी रुपयांच्या उत्पादनावर आधारित अनुदान मिळण्यासाठी रिलायन्स इंड्स्ट्रीज,JSW,अमारा राजा,लुकासटीव्हीएस या कंपन्यांनी निविदा भरली आहे.

ऍपलच्या मुंबई आणि दिल्ली इथल्या स्टोअरमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 190 आणि 210 कोटी रुपयांच्या महसूल संकलित झालाय. सर्वाधिक महसूल देणाऱ्या ऍपलच्या स्टोअरमध्ये मुंबई आणि दिल्लीतल्या स्टोअरचा समावेश जालाय. दर महिन्याला या स्टोअरमधून 16 ते 17 कोटी रुपयांचा विक्री होते. मुंबईनंतर आता ऍपल पुण्यातही एक नवीन स्टोअर उघडणार आहे

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

 

Published: April 24, 2024, 16:40 IST

तिसऱ्या टर्ममध्ये मोदींचा कृषीक्षेत्रासाठी 'मेगाप्लान'