आरबीआयच्या कारवाईनंतर कोटक बँकेचा शेअर लोअर सर्किटमध्ये

तुमच्या आयुष्यावर आणि खर्चावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

बातमीपत्राच्या सुरूवातीला पाहूयात कोटक महिंद्र बँकेबाबतची बातमी
खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेवर आरबीआयनं कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईनंतर बँकेला ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरीत करण्यावर मनाई करण्यात आलीय . बँकेच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या २०२२ आणि २०२३ या वर्षातील परीक्षणातील त्रुटी आणि उणिवांमुळे आणि त्रुटीचे निराकरण करण्यात बँक अपयशी ठरल्यानं आरबीआयनं कारवाई केलीय. आरबीआयच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर कोटक महिंद्र बँकेचा शेअर लोअर सर्किटमध्ये गेलाय.

आता बातमी ऍक्सिस बँकेची
ऍक्सिस बँके समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून 55 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. रोखे विक्रीतून 35 हजार कोटी तर समभाग म्हणजेच शेअर विक्रीतून 20 हजार कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला बँकेच्या संचालक मंडळानं मान्यता दिलीय. मार्च तिमाहित बँकेला 7,130 कोटी रुपयांचा नफा झालाय. चांगल्या कामगिरीमुळे ऍक्सिस बँकेच्या शेअर 6.4 टक्के म्हणजेच जवळपास 68 रुपयांनी वाढलाय. विशेष म्हणजे आरबीआयनं घातलेल्या निर्बंधानंतर महिंद्र बँकेच्या जागी ऍक्सिस बँक चवथ्या स्थानावर पोहचलीय. आरबीआयनं कारवाई केल्यानंतर कोटक बँकेचे बाजार भांडवल मूल्य 3.3 लाख कोटी झालंय तर ऍक्सिस बँकेचे बाजार भांडवल मूल्य 3.4 लाख कोटीवर पोहचलंय.

आता बातमी रिअल इस्टेट संदर्भातली.
इन्वेस्टमेंट ट्र्ट म्हणजेच रिट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट टॅस्ट इन्विट्स या दोन्ही नवीन प्रकारच्या गुंतवणूीक साधनांमध्ये गेल्चा चार वर्षाच्या कालावधीत मार्च 2024 पर्यंत 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झालीय. अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून देण्यात आलीय.श्रीमंत आणि अतिश्रीमंत गुंतवणूकदार या दोन्ही साधनांमध्ये गुंतवणूक करतात.

आता बातमी कृषी क्षेत्रातली

यंदाच्या द्राक्ष हंगामात एक लाख 81 हजार 396 टन द्राक्षांची निर्यात झालीय. अमेरिका आणि युरोपातील देशात सर्वाधिक म्हणजेच एक लाख 31 हजार 421 टन द्राक्षांची निर्यात झालीय. पश्चिम आशियातील अशांत परिस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. निर्यात करताना दक्षिण आफ्रेकला वळसा घालून निर्यात करावी लागत असल्यानं वाहतूक खर्चात वाढ झालीय. या निर्यातीमुळे द्राक्षाला 110 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे.

आता बातमी रेल्वे प्रवासाची
उन्हाळाच्या सुट्टया सुरू असल्यानं रेल्वेत मोठी गर्दी आहे. रेल्वेनंही गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वे सोडल्या आहेत. तरीही अनेकांना आरक्षण मिळत नसल्यानं लाबं पल्याचा प्रवास हा विनाआरक्षित डब्यातून करावा लागतो. जनरल डब्यात पाणी आणि खाण्याची सोय नसते. त्यामुळे अनेक जण
प्रवास टाळतात. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन जनरल डब्यातील प्रवाशांनाही आता 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार आहे. तर तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अनेकांना आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
आता बातमी क्रेडिट कार्डाद्वारे करण्यात येणाऱ्या खर्चाची

2023-24 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा वापर करून होण्याऱ्या खर्चात तब्बल 27 टक्क्यांची वाढ होऊन हा खर्च 18.26 लाख कोटींवर पोहचलाय. गेल्या वर्षी क्रेडिट कार्डचा वापर करून 14 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.,अशी माहिती आरबीआयनं दिलीय. , असे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डाद्वारे ग्राहकांनी सर्वाधिक खर्च केलाय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 25, 2024, 15:43 IST

आरबीआयच्या कारवाईनंतर कोटक बँकेचा शेअर लोअर सर्किटमध्ये