घर खरेदीदारांना दिलासा,पॉर्किंगबाबत महारेराचा नवा निर्णय

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

गृहप्रकल्पातील सशुल्क पार्किंगच्या तक्रारींची महारेरानं गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे बिल्डरला आता फ्लॅट विकतानाच पार्किंगबाबतची सर्व माहिती ग्राहकाला द्यावी लागणार आहे. ही माहिती विक्री कराराच्या वेळी जोडपत्राच्या स्वरूपात द्यावी लागणार आहे. पार्किंगचं इमारतीतील ठिकाण, पार्किंगचा आकार,उंची,रुंदी इत्यादी तपशील जोडपत्रात असणार आहे. महारेराच्या या नवीन नियमाममुळे घर घेणाऱ्या नागिरकांना मोठा फायदा होणार आहे.

आता बातमी महागाईची
देशात यंदा पाऊस समाधानकारक असल्यानं खाद्यवस्तूंची महागाई पुढील काळात कमी होईल,असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्रालयानं वर्तवलाय. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्यानं शेतीचं उत्पादन वाढून खाद्य महागाईचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

आता बातमी कांदा निर्यातीची
कांदा निर्यातबंदी शिथिल करत केंद्र सरकारनं देशातील तीन बंदरातून पांढरा कांदा विदेशात निर्यात केलाय. गुजरातमधल्या दोन आणि महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरातून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलीय. सध्या निवडणुकीचा काळ असल्यानं कांदा निर्यातीवर बंदी कायम आहे. मात्र, मित्रराष्ट्रांच्या मागणीनुसार ठराविक प्रमाणात कांदा निर्यातीस मुभा देण्यात आलीय.

आता बातमी आयसीआयसीआय क्रेडिट कार्डची
नुकतंच आयसीआय बँकचा क्रेडिट कार्ड संबंधित झालेली चूक समोर आली आहे. आयसीआय बँकने जवळपास १७ हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले असून चुकीच्या ‘मॅपिंग’मुळे ही जुन्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना नवीन क्रेडिट कार्ड ग्राहकाची संपूर्ण माहिती लीक झाली. परिणामी बँकेने तब्बल १७ हजार कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे, ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहे,अशी माहिती बँकेनं दिलीय. सुदैवानं आतापर्यंत कोणाचंही यात आर्थिक नुकसान झालं नाही. कुणाचं आर्थिक नुकसान झालं असल्यास बँक नुकसान भरपाई देणार आहे.

आता बातमी म्युच्युअल फंड गुंतवुकीसंदर्भातली

लहान शहरं आणि खेडेगावातील नागरिकांच्या डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या खात्यांची संख्याही शहरी भागातल्या नागरिकांपेक्षा जास्त झालीय. शहरी भागातली म्युच्युअल फंड खात्यांची संख्या ही दोन कोटी साठ लाख एवढी आहे तर ग्रामीण भागातली म्युच्युअल फंड खात्यांची संख्या दोन कोटी 81 लाख एवढी आहे.
आता बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच pfची

2023-24 या आर्थिक वर्षात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. 8.15 ऐवजी आता पीएफमचा व्याज दर हा 8.25 टक्के करण्यात आलाय. येत्या काही दिवास नवीन व्याजदरानं रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती पीएफ कार्यालयानं दिलीय.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: April 26, 2024, 15:45 IST

घर खरेदीदारांना दिलासा,पॉर्किंगबाबत महारेराचा नवा निर्णय