पुण्यात सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीला बातमी कोरोना लसीची
कोरोनाचा प्रसार रोखणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होण्याची शक्यता आहे, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा करत ब्रिटनमधील एका व्यक्तीनं न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना कंपनीनं कोव्हिशिल्ड लसीमुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, हृदयविकार, ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो अशी कबुलीअ‍ॅस्ट्राझेनेकानं न्यायालयात दिली. मात्र,लसीच्या तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत तसेच दुष्परिणाम सगळ्याच व्यक्तींमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.
भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोव्हिशिल्ड ही लस तयारी केली होती.
आता बातमी पतंजली समूहाची
दिशाभूल जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितल्यानंतर रामदेव बाबा यांना आणखी एक धक्का बसला आहे. उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे. औषध आणि प्रसाधने कायद्यातील तरतुदींचा वारंवार भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली
आता बातमी पुण्यातील घरभाड्याची
आयटी कंपन्यामोठ्या प्रमाणात असल्यानं पुण्यात घरभाड्यात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंजवडी आणि वाघोलीत सर्वाधिक घरभाड्यात वाढ झाली आहे. 2022 मध्ये हिंजवडीत टू बीएचकेचं भाडं 21 हजार रुपये होतं 2023 मध्ये 25 हजार 600 रुपये झलं तर यावर्षी साडे सव्वीस हजार रुपये झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंजवडीत चार टक्क्यांनी घर भाडं वाढलंय. तर वाघोलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घरभाड्यात सात टक्क्यांनी वाढ झालीय. वाघोलीत 2 BHK घराचं भाडं 22 हजार रुपयांवर पोहचलंय

Published: April 30, 2024, 15:10 IST

पुण्यात सर्वाधिक घरभाडे कोणत्या भागात