पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किमती बघून राधाने इलेक्ट्रिक वेहिकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल आणि डिझेल कार चालवण्यासाठी प्रति किलोमीटर 5 ते 9 रुपये खर्च येतो. तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक वेहिकलची रनिंग कॉस्ट केवळ 1 ते दिढ रुपया प्रति किलोमीटर आहे. म्हणूनच लोकं सध्या इलेक्ट्रिक वेहिकलला पसंती देत आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2023 च्या पहिल्या त्रैमासिकात भारतात EV च्या विक्रीने 10 लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. 2023 मध्ये, देशातील एकूण वाहन विक्रीत EVs चा वाटा 6.4% आहे. इतर लोकांप्रमाणे राधाने सगळा विचार करून इलेक्ट्रिक वेहिकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने व्यवस्थित रिसर्च करून टाटा कंपनीची EV खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण आता गाडीची डिलिव्हरी घ्यायच्या आधी तिला कार इंश्युरन्स खरेदी करावा लागणार आहे. पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्यांच्या इंश्युरन्समध्ये काही फरक आहे का, असा प्रश्न राधाला पडला आहे. तसेच, इलेक्ट्रिक वेहिकलचा इंश्युरन्स इतर गाड्यांच्या तुलनेत स्वस्त असतो का महाग, असे अनेक प्रश्न राधाच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या महाग आहेत. गाडीच्या किमतीपैकी 50 टक्यापेक्षा जास्त किंमत बॅटरीची असते.
त्यामुळे, इलेक्ट्रिक कारचा इंश्युरन्स खरेदी करताना व्यवस्थित रिसर्च केला पाहिजे. इतर गाड्यांप्रमाणे EV साठी ग्राहकांनी शक्यतो कॉम्प्रिहेन्सिव्ह इंश्युरन्स खरेदी करावा, असं मत बजाज जनरल इन्शुरन्सचे मोटर डिस्ट्रिब्युशनचे प्रमुख सुभाषीष मजुमदार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या पॉलिसीसोबत ग्राहकांनी रायडर्सची माहिती घ्यावी आणि गरजेनुसार रायडरची निवड करावी, असा सल्ला सुभाषीष मजुमदार यांनी दिला आहे. काही गाड्यांमध्ये बॅटरीची किंमत गाडीच्या किमतीच्या 60 टक्यापेक्षा जास्त असते. पूर आला किंवा मुसळधार पाऊस पडला तर बॅटरी खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो… जर बॅटरीमध्ये मोठा दोष निर्माण झाला तर दुरुस्तीची शक्यताही कमी असते… नवीन बॅटरी विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात…आणि दुरुस्तीसाठी, अनेकदा नवीन वाहन खरेदी करण्याइतकाच खर्च येऊ शकतो. त्यामुळे, बॅटरीसाठी पुरेसा इंश्युरन्स असणं अतिशय महत्वाचं आहे.
कार जशी जशी जुनी होईल तसं तिची किंमत कमी होत जाते.
डेप्रीसिएशनच्या मदतीने दर वर्षी गाडीची किंमत काढता येते. मात्र, इलेक्ट्रिक वेहिकल इंडस्ट्री अजून विकसित होत आहे. EV ची रिसेल व्हॅल्यू आणि मेंटेनन्ससाठी लागणार खर्च, याबद्दल अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाहीये. त्यामुळे, नंतर EV मोटर इंश्युरन्सचा प्रीमियम किती कमी होईल याचा अंदाज लावता येत नाही. म्हणूनच रिटर्न टू इनव्हॉइस रायडर हा EV साठी चांगला पर्याय आहे… जर तुमची कार पूर्णपणे खराब झाली किंवा चोरीला गेली तर इंश्युरन्स कंपनी तुम्हाला नवीन वाहन खरेदीसाठी लागणारा पूर्ण खर्च देईल… भारतात, EV अद्याप फार लोकप्रिय नाहीयेत, त्यामुळे EV मेकॅनिकची संख्या मर्यादित आहे. तुमची EV खराब झाली किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, काही इंश्युरन्स कंपन्या अॅड-ऑन कव्हर ऑफर करत आहेत ज्याला “रोडसाइड असिस्टन्स” म्हणतात. मोठ्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही या रायडरला तुमच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करू शकता. काही विमा कंपन्या बेस पॉलिसीमध्येच प्रमुख अॅड-ऑन देतात. वेगवेगळे रायडर्स घेण्यापेक्षा अशा पॉलिसी कमी पैशात खरेदी करता येतील. EV चार्ज करण्यासाठी बरेच लोकं घरात चार्जिंगची सुविधा करून घेतात. चार्जिंगची सिस्टीम बसवायला बराच खर्च येतो. त्यामुळे, चार्जरचा इंश्युरन्स घेणं देखील महत्वाचं आहे. पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये एवढे रायडर घेण्याची गरज नसते. पण EV सेगमेंट नवीन आहे, तसेच नंतर मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी किती खर्च येणार आहे, हे सध्या कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही इलेक्ट्रिक वेहिकल खरेदी करणार असाल, तर इंश्युरन्स पॉलिसीमध्ये सर्व आवश्यक रायडर खरेदी करा. यामुळे, सुरुवातीला जास्त पैसे गेले तरी नंतर टेन्शन राहणार नाही.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App