म्युच्युअल फंडात लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी खूप काम करण्यात आले आहे. आता गुंतवणूकदाराच्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे ? या दृष्टीने काम करण्याची अत्यंत गरज आहे,असं मत एसबीआय म्युच्युअल फंडाचे उप व्यवस्थापकीय संचालक आणि संयुक्त कार्यकारी अधिकारी डीपी सिंग यांनी व्यक्त केलंय. ‘मनी माँक’या विशेष कार्यक्रमात मनी9 चे संपादक अंशुमान तिवारी यांनी डी.पी.सिंग यांची मुलाखत घेतलीय. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
म्युच्युअल फंडात पहिल्यांदाच गुंतवणूक सुरू करताना डी.पी.सिंग यांनी मोलाचा सल्ला दिलाय. त्यांच्या सल्लानुसार जो फंड त्याच्या गुंतवणुकीचा काही भागाची गुंतवणूकूक शेअर बाजारात करतो त्या फंडात सुरूवातीला गुंतवणूक करा.सुरूवातीला गुंतवणूकदारांनी कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड, मल्टि अॅसेट अलोकेशन फंड, बॅलन्स्ड अॅडव्हानटेज फंड किंवा डायव्हर्सिफाय इक्विटी फंड हे पर्याय सुरूवातीच्या काळात फायदेशीर ठरू शकतात असा सल्ला डी.पी.सिंग यांनी गुंतवणूकदारांना दिलाय.
गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ते इक्विटी फंडात हिस्सा वाढवू शकतात,असा सल्लाही सिंग यांनी दिलाय. संपत्तीची निर्मिती करायची असल्यास किंवा महागाईला मात करणारा परतावा हवा असल्यास इक्विटी गुंतवणुकीला पर्याय नसल्याचं प्रतिपादनही सिंग यांनी केलंय. किरकोळ महागाई ही जास्त असते. त्यामुळे एखाद्याच्या पोर्टफोलिओचा परतावा हा 8 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तर महागाईवर मात करता येणार नाही. त्यामुळे महागाईवर मात करायची असल्यास इक्विटी फंडा शिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र,सध्या इक्विटी फंडात एक रकमी गुंतवणूक करू नका,टप्पा टप्प्यानं म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला डी.पी.सिंग यांनी दिलाय.
SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार शिस्त पाळत नाहीत,त्यामुळे गुंतवणूकदारांना सतत जागरूक करत राहणं आवश्यक असल्याचं मतही डी.पी.सिंग यांनी मनी9 चे संपादक अंशुमान तिवारी यांच्यासोबत चर्चा करताना व्यक्त केले आहे.कालावधी पूर्ण होण्याच्या अगोरच SIP बंद करतात किंवा पैसे काढून घेतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत नाही. कोणताच पर्याय नाही त्यावेळी SIP मधून पैसे काढावेत अन्यथा SIP मधून कधीही पैसे काढू नयेत असा सल्ला सिंग यांनी गुंतवणूकदारांना दिलाय.
सध्या म्युच्युअल फंडात जवळपास पाच कोटी नागरिक गुंतवणूक करत आहेत. पुढील तीन वर्षात सुमारे दहा कोटी नागरिक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतील.त्यामुळेच म्युच्युअल फंडात लहान गुंतवूकदारांचा सहभाग वाढावा यासाठी 250 रुपयांच्या SIP च्या प्रस्तावावर सेबी विचार करत असल्याची माहिती सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांनी दिली होती. लहान गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी असं म्युच्युअल फंडांना वाटतंय. मात्र,250 रुपयांच्या SIP मुळे फंडाचा उत्पादन खर्च वसुल करणं खूप आव्हानात्मक होईल,असं मत सिंग यांनी व्यक्त केलंय.
मुलाखतीत डी.पी.सिंग यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे मंत्र सांगितले आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा श्रीगणेशा हायब्रिड म्युच्युअल फंडानं करण्याचा सल्ला सिंग यांनी दिला आहे.शिस्तबद्द पद्धतीनं गुंतवणूक करा आणि महागाईला मात देणाऱ्या फंडा निवड करा असंही सिंग यांनी सल्ला दिला आहे.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App