ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंडला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. ICICI च्या या फंडमध्ये गुंतवणूकदारांची सध्या 24,060.99 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. मल्टी-ऍसेट एलोकेशन कॅटेगरीमध्ये या फंडचा 57% मार्केट शेअर असून, हा फंड या सेगमेंटमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. सातत्याने चांगला रिटर्न दिल्यामुळे, गुंतवणूकदारांनी या फंडला चांगला प्रतिसाद दिला आहे. 21 वर्षांपूर्वी ज्यावेळेला या फंडचं लॉन्चिंग झालं, त्यावेळेला ज्यांनी 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या 1 लाख रुपयाचं मूल्य आता 54 लाख 90 हजार रुपये झालं आहे. म्हणजेच, मागच्या 21 वर्षात या फंडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 55 पट वाढले आहेत.
वार्षिक रिटर्नचा विचार केल्यास, या फंडने सरासरी 21% CAGR रिटर्न दिला आहे. [निफ्टी 200 TRI (65%) + निफ्टी कंपोझिट डेट इंडेक्स (25%) + सोन्याची देशांतर्गत किंमत (6%) + चांदीची देशांतर्गत किंमत (1%) + iCOMDEX कंपोसिट इंडेक्स (3%)] हा या फंडचा बेंचमार्क आहे. मागच्या 21 वर्षात या इंडेक्सने सरासरी 16% CAGR रिटर्न दिला आहे, म्हणजेच या फंडने बेंचमार्क इंडेक्सला 5 टक्याने आऊटपरफॉर्म केलं आहे. ज्या गुंतवणूकदारांनी फंडच्या स्थापनेपासून SIP द्वारे या फंडमध्ये दर महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे, म्हणजेच ज्यांनी एकूण गुंतवणूक 25.2 लाख रुपये केली आहे, त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य 30 सप्टेंबरपर्यंत वाढून 2.1 कोटी रुपये झालं आहे. SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडने 17.5% चा CAGR रिटर्न दिला आहे. तर, या दरम्यान बेंचमार्क इंडेक्सने केवळ 13.7% CAGR रिटर्न दिला आहे.
गुंतवणूकदारांनी मल्टी-कॅप फंडच्या माध्यमातून विविध ऍसेट्समध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केली तर चांगली वेल्थ क्रिएट करता येते, असं मत ICICI प्रुडेन्शियल AMC चे MD आणि CEO निमेश शाह यांनी व्यक्त केलं आहे. दर वर्षी काही ऍसेट्स चांगली कामगिरी करतात. काही ऍसेट खूप चांगला रिटर्न देतात, तर काही ऍसेटची कामगिरी चांगली असते. आज ज्यांची कामगिरी खराब आहे, ते ऍसेट्स भविष्यात चांगली कामगिरी करतात. त्यामुळे, विविध ऍसेटमध्ये आपण गुंतवणूक केली, तर या चढ-उताराचा फायदा होतो, असं मत ICICI प्रुडेंशियल AMC चे एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आणि CIO एस. नरेन यांनी व्यक्त केलं आहे.
ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंड हा ओपन-एंडेड फंड आहे, जो इक्विटी, डेट आणि एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्हज / गोल्ड ईटीएफचे युनिट्स / आरईआयटी आणि इनव्हीआयटी / प्रेफरन्स शेअर्सच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करतो. या फंडमध्ये किमान 5000 रुपयाची एकरकमी गुंतवणूक करावी लागते, तर ज्यांना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करायची आहे, ते महिन्याला 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकतात.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App