IPO ची इश्यू साईज पाहून गुंतवणूक करा

सध्या अनेक IPO बाजारात येत आहेत. गुंतवणुूकदारांना चांगला लिस्टिंग गेनही मिळत आहे. मात्र, गुंतवणूक करताना आयपीओचा इश्यू साईज पाहून गुंतवणूक करा

  • Team Money9
  • Last Updated : December 4, 2023, 13:32 IST

संजीव ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काम करत होता. पण तो नाराज आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. संजीवचा चेहरा बघून दीपक त्याची विचारपूस करतो. तू का नाराज आहेस, काही अडचण आहे का, असं दीपक विचारतो. अरे दीपक, मी अनेक दिवसांपासून IPO मध्ये गुंतवणूक करतोय. ज्या IPO मध्ये चांगला लिस्टिंग गेन मिळतो, त्या IPO चे शेअर्स मला एलोटच होतं नाहीत आणि ज्या IPO मध्ये एलोटमेन्ट मिळते, त्या शेअर्समध्ये लिस्टिंग गेन मिळत नाही. LIC चे शेअर्स मी IPO मध्ये खरेदी केले, पण दिड वर्ष झालं तरी हा शेअर IPO किमतीपेक्षा 30 % खाली आहे. होनासा कन्ज्युमर म्हणजेच मामाअर्थच्या IPO मध्ये मला असाच वाईट अनुभव आला. या IPO मध्ये खूप चांगला लिस्टिंग गेन मिळेल, असं वाटत होतं. मात्र, असं काहीच झालं नाही, असं संजीव म्हणतो. संजीव तू म्हणतो ते 100 % बरोबर आहे. अनेक गुंतवणूकदारांना असाच अनुभव आला आहे.

2023 हे वर्ष आता संपत आलं आहे. 2023 च्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता होती. रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेत वाढणारे व्याजदर, यामुळे भारतासारख्या इमर्जिंग मार्केटला फटका बसेल असं अनेक तज्ज्ञांचं मत होतं. मात्र, असं काहीच झालं नाही. हे सगळे अडथळे पार करत भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकाला पोहोचला. निफ्टीने 20222 …… चा नवा उच्चांक नोंदवला. तर, स्मॉल आणि मिडकॅप गुंतवणूकदारांची या वर्षी चांदी झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये काही महिने जोरदार विक्री केली, मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी दर महिन्याला SIP च्या माध्यमातून गुंतवणूक चालू ठेवली.

या कालावधीत, प्रायमरी म्हणजेच IPO मार्केटमध्ये बरीच एक्शन पाहायला मिळाली… 2023 मध्ये 50 पेक्षा IPO लॉन्च करण्यात आले… मात्र, ज्याप्रकारे स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये सरसकट रिटर्न मिळाला तास रिटर्न IPO मार्केटमध्ये पाहायला मिळाला नाही. IPO मार्केटमध्ये कभी ख़ुशी, कभी गम हा प्रकार पाहायला मिळाला. निफ्टी आणि सेन्सेक्सने मागच्या 2 वर्षात पॉजिटीव्ह रिटर्न दिला आहे.

मात्र, या कालावधीत BSE IPO इंडेक्सने सेन्सेक्सला अंडर परफॉर्म केलं आहे.… मागच्या 2 वर्षात IPO इंडेक्सने निगेटिव्ह 12 % रिटर्न दिला आहे.

मागच्या दोन वर्षांत 101 IPO चं लिस्टिंग झालं आणि त्यापैकी केवळ 19 IPO त्यांच्या इश्यू प्राईजच्या खाली ट्रेड करत आहेत. म्हणजे केवळ 19 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान झालं आहे…  IPO मध्ये गुंतवणूकदारांना पॉजिटीव्ह रिटर्न मिळाला आहे… 101 पैकी 82 IPO मध्ये जर पॉजिटीव्ह रिटर्न मिळाला असेल तर मग IPO इंडेक्सने निगेटिव्ह रिटर्न का दिला, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. यामागे काय कारण आहे, ते आपण जाणून घेऊया.

ज्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळाला आहे, त्या कंपन्यांचं मार्केट कमी होतं. उदारणार्थ, हरी ओम पाईपच्या IPO ची इश्यू प्राईज होती 153 रुपये, या IPO ने सगळ्यात जास्त म्हणजे 330% रिटर्न दिला आहे. मात्र, जेव्हा हा IPO लिस्ट झाला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप 500 कोटींपेक्षा कमी होतं.  तर दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह रिटर्न देणाऱ्या IPO मध्ये LIC , नायका, PayTM सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.  या कंपन्यांचं मार्केट कॅप 50000 कोटींपेक्षा जास्त होतं. IPO इंडेक्स मार्केट कॅपवर आधारित असल्यामुळे, या इंडेक्सने निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.

किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा ब्रोकरेज हाऊसच्या अहवालात दिलेलं एनालिसिस वाचून किंवा पत्रकार परिषदेत दिलेली आश्वासने पाहून त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतात… पण IPO मध्ये पैसे गुंतवणे हा सट्टा नाही… जेव्हा आपण IPO मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपण गुंतवणूक करतो. जर आपण लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करत असू तर आपली 10 ते 20 वर्ष शेअर्स होल्ड करण्याची तयारी पाहिजे…यासाठी आपल्याला कंपनीच्या बिझनेसचं पूर्ण एनेलीसीस आणि सर्व पॅरामीटर्सचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे…सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे एनालिसिस कार्यांसाठी केवळ 3 दिवस मिळतात, त्यामुळे आपल्याला कमी वेळात निर्णय घेता आला पाहिजे. याचा अर्थ IPO मध्ये पैसे गुंतवणे ही एक मोठी रिस्क आहे. कारण IPO मार्केटमध्ये मर्यादित माहिती असते आणि कमी वेळेत निर्णय घ्यायचा असतो. एवढं सगळं एनालिसिस करून आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तरी शेअर्स एलोट होतील का नाही ते सांगता येत नाही. चांगला रिटर्न देणारे IPO खूप ओव्हर सबस्क्राईब होतात, त्यामुळे अश्या चांगला IPO मध्ये एलोटमेन्ट मिळण्याची शक्यता फार कमी असते. पण मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे कि आपण IPO मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची.

IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर IPO च्या 2 कॅटेगरी बनवाव्या लागतील.  ज्या IPO ची इश्यू साईझ 1000 कोटींपेक्षा कमी आहे, ते पहिली कॅटेगरी असेल. तसेच, ज्या IPO ची इश्यू साईझ 1000 कोटींपेक्षा जास्त असेल, त्या IPO ला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टाका. तुम्हाला जर केवळ लिस्टिंग गेनसाठी अर्ज करायचा असेल तर केवळ 1000 कोटींपेक्षा कमी इश्यू साईझ असणाऱ्या IPO ला अर्ज करा. रिटर्न मिळण्याची शक्यता वाढवायची असेल तर शेवटच्या दिवशी आधी GMP बघा आणि मगच अर्ज करा. एलोटमेन्टची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही घरातल्या अनेक मेम्बर्सच्या नावावर अर्ज करू शकता.

आता दुसऱ्या कॅटेगरीचे जे IPO आहेत, म्हणजेच ज्यांची इश्यू साईझ 1000 कोटींपेक्षा जास्त आहे, त्यामध्ये कंपनीचा PE रेशो बघा.   जर PE रेशो 35 पेक्षा कमी असेल तरच अर्ज करा. जर PE रेशी खूप जास्त असेल तर IPO मध्ये अर्ज करू नका. लिस्टिंगनंतर हा शेअर लिस्टिंग प्राईजच्या 50% खाली आला तर सेकंडरी मार्केटमधून शेअर्स खरेदी करा. उदारणार्थ, झोमॅटोचा शेअर साधारण 120 रुपयाला लिस्ट झाला, पण त्यावेळेला शेअर खूप जास्त ओव्हर वॅल्यूड होता. अश्या परिस्थितीत, आपण काहीच न करणं फायद्याचं आहे. हाच शेअर नंतर 40 रुपयांपर्यंत खाली आला. आपल्याला लिस्टिंग प्राईज म्हणजे 120 रुपयाच्या निम्म्या किमतीला म्हणजेच 60 रुपयाला झोमॅटोचा शेअर आरामात खरेदी करता आला असता. या स्ट्रॅटेजीमुळे, आपल्याला खूप मोठं नुकसान होणार नाही आणि कमी जोखीम घेऊन चांगला रिटर्न मिळेल.

 

Published: December 4, 2023, 13:31 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App