इलेक्ट्रिक कारपेक्षा हायब्रिड कारलाच ग्राहकांची पसंती

देशात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होतांना दिसतेय.2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 90 टक्के अशी विक्रमी उच्चांकी वाढ झालेली असताना फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचलीय. 2023 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली 8 टक्के वाढ ही दहा पटीहून अधिक होती.

देशात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होतांना दिसतेय.2023 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 90 टक्के अशी विक्रमी उच्चांकी वाढ झालेली असताना फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचलीय. 2023 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली 8 टक्के वाढ ही दहा पटीहून अधिक होती.
अचानक असं काय झालं की इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत इतकी घट झाली,((ALPHA 1))भारतीय अजूनही इलेक्ट्रीक वाहनांना स्वीकारायला का तयार नाहीत.?इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतेय..

फेब्रुवारी 2024 मध्ये देशात एकूण 7,277 इलेक्ट्रीक कारची विक्री झाली. ऑक्टोबर 2023 नंतर झालेली ही सर्वात कमी विक्री आहे.  यामुळे देशातल्या टॉप कंपन्या टाटा मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि एमजी या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमतीत घटदेखील केलीय…  टाटा मोटर्सने टियागो आणि नेक्सन इलेक्ट्रीक कारच्या किंमतीत 70 हजार ते 1 लाख 20 हजारांपर्यंत घट केलीय…एमजीनं कॉमेट या कारची किंमत एका लाखाने कमी करुन 7 लाख केलीय तर महिंद्रा अॅण्ड महिंद्राने किंमती कमी केल्यानंतर जास्त फिचर्स देणारे दोन नवीन व्हेरीएंट लाँच केलेत. अशी माहिती सरकारच्या वाहन पोर्टलवरून मिळते.

किंमती कमी केल्यानंतर भारतीय ग्राहक इलेक्टीक कारकडे आकर्षित होतील असा कंपन्यांचा अंदाज होता तो अंदाज अंदाज फोल ठरलाय

ALPHA 3 STARTS इतकंच नाही तर एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत आणखी घट होईल अशी शंका आहे.  सरकार वाढत्या प्रदूषणाचा विचार करुन इलेक्ट्रीक वाहन निर्मात्या कंपन्यांना
फेम-२ या योजनेतर्फे विशेष सूट देत असते. फेम-२ चा कालावधीला आता संपला आहे… फेम-2 चा फायदा इलेक्ट्रिक वाहनांना झाला होता. विशेषत:इलेक्ट्रिक बस आणि ट्रक तयार करणाऱ्या कंपन्यांना फेम-2 मुदत संपली तसेच विक्रीतही घट होत असल्यानं टाटा मोटर्सनं एप्रिल आणि मे या महिन्यात इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतलाय. चार ते पाच महिन्यांपूर्वी दर महिन्याला 4500 वाहन उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्सने आता केवळ 2200-2500 इलेक्ट्रीक वाहने तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजतेय..

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारे सरकारे नवे धोरण

फेम 2 योजनेअंतर्गत मिळणारी सूट 31 मार्च 2024 मध्ये संपलीय,त्यानंतर इलेक्ट्रीक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केलीय… एप्रिल ते जुलैदरम्यान असणाऱ्या या योजनेवर 500 कोटी खर्च केले जाणार आहेत…  तसंच देशांतर्गत इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक धोरणाला नुकतीच मंजुरी दिलीय.या धोरणाला मंजुरी मिळाल्यानं जगप्रसिद्ध टेस्ला ही कार कंपनी भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

4150 कोटींहून अधिक गुंतवणूक आणि तीन वर्षाच्या आत उत्पादन प्रकल्प स्थापन करणाऱ्या इलेक्ट्रिक कार कंपन्यांना सुट्या भागांच्या आयातीवर आयात कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या अटी पूर्ण केलेल्या कंपन्यांच्या 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर पुढील पाच वर्षांसाठी 15 टक्के सीमा शुल्क द्यावे लावण्यात येणार आहे..
या अटींवर टाटा मोटर्स आणि महिंद्रा आणि महिंद्रा कंपन्यांनी नाराजी व्यक्त केलीय …

इलेक्टिक कारच्या विक्रीत घट झाल्याने भारतीय कंपन्यांची काळजी वाढलीय यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने पहिल्यांदाच वाहनांचे दर कमी केले आहेत. .बॅटरीच्या किंमती कमी झाल्यात यापुढील काळात किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या किंमती कमी केल्याची माहिती टाटा मोटर्सनं दिलीय.

ग्राहकांचा हायब्रीड कारकडे वाढलेला कल यामुळेही 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची विक्रीत घट झालीय.
हायब्रीड कारच्या किंमती किफायतशीर आहेत तसंच, मेंटनन्स खर्च कमी आहे, याउलट इलेक्ट्रीक वाहनांचा मर्यादीत रेंज, चार्जिंगच्या मुलभूत सुविधांची वानवा, तसंच इलेक्ट्रिक वाहनांचा विमाही जास्त असतो.

इलेक्ट्रिक कारवर संपूर्ण विश्वास नसल्यानं ग्राहक इलेक्ट्रीक कार घेण्याएवजी पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या हायब्रिड कारला पसंती देतायेत. त्यामुळे इलेक्ट्रिक इंधनावर कार कशी चालते याचीही त्यांना माहिती होते. यामुळेच वाहन कंपन्यांनी 51 हायब्रीड वाहनांच्या तुलनेत यावर्षी केवळ2 9 इलेक्ट्रीकल वाहने लाँच केली आहेत..2023 साली प्रवासी वाहनांच्या विक्रीत हायब्रीड वाहनांचा हिस्सा 12 टक्के होता तर इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केवळ 2.3 टक्के होता..
हायब्रिड वाहनांच्या विक्रीत टोयाटो कंपनीचा दबदबा आहे. टोयाटोचा हायब्रिड वाहन विक्रीत 78 टक्के वाटा आहे तर मारुतीचा 20 टक्के आणि होंडाकडे 2 टक्के वाटा आहे…

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे अशा परिस्थितीत गुंतवणुकीची रणनिती कशी ठरवावी.

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये चार्जिंगशी संबंधित पायाभूत सुविधेत आणखी सुधारणा होणं गरजेचे आहे,अशी माहिती शेअर बाजातील तज्ज्ञ अमरिश बलिगा यांनी दिलीय.
. 2025च्या नंतरच इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मारोती उतरणार आहे. तोपर्यंत चार्जिंगसाठी पायाभूत सविधा वाढतील. मारुतीने हायब्रीड कारसाठी टोयोटासोबत करार केलेला आहे. 12 ते 15 महिन्याचा विचार करून मारुतीच्या शेअरमध्ये 14800 रुपये आणि समवर्धना मदरसनमध्ये 180 रुपयांचं लक्ष्य ठेऊन गुतवणूक करू शकता.

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास इलेक्ट्रीक वाहनांना स्थिरस्थावर होण्यासाठी अजून 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागू शकतो किंमत,सर्विस चार्ज,विम्याचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच कमी दरात चार्जिगची सुविधाही मिळण्याची अपेक्षा आहे. अशावेळी हायब्रिड वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या ऑटो कंपन्यांच्या शेअरकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.

 

Published: April 3, 2024, 09:43 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App