नवीन आर्थिक वर्षात कोणत्या ऍसेटमध्ये मिळेल चांगला रिटर्न?

मागचं आर्थिक वर्ष चांगलं गेलं, ही चांगली गोष्ट आहे, मात्र यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात चांगला रिटर्न मिळवणं अवघड होणार आहे. ज्यांना 2024 25 मध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी कोणता ऍसेट चांगला आहे, ते आता जाणून घेऊया.

मागच्या आर्थिक वर्षात सोनं, रिअल इस्टेट, FD, म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केट या सगळ्याच ऍसेट्समध्ये गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळाला. रिजर्व बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे बँकांनी FD च्या व्याजदरात जवळपास 2 टक्यांची वाढ केली. 1 वर्षांपूर्वी 60000 ला ट्रेड करणारं सोनं आता 72000 रुपयाच्या वर गेलं आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सने मागच्या 1 वर्षात साधारण 28% रिटर्न दिला आहे. रिअल इस्टेटमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पुण्यासारख्या शहरात घरांची सर्वाधिक विक्री झाली, त्यामुळे ऍप्रिसिएशन आणि rental यिल्ड मिळून गुंतवणूकदारांना सरासरी 10 टक्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला. म्युच्युअल फंड्सनी देखील गुंतवणूकदारांना 30 ते 50% रिटर्न देऊन मालामाल केलं. मागचं आर्थिक वर्ष चांगलं गेलं, ही चांगली गोष्ट आहे, मात्र यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात चांगला रिटर्न मिळवणं अवघड होणार आहे. ज्यांना 2024 25 मध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी कोणता ऍसेट चांगला आहे, ते आता जाणून घेऊया.

सगळ्यात आधी ज्यांना कोणतीही जोखीम न घेता 3 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची त्यांच्यासाठी एक ऍसेट बघूया. मागच्या 2 वर्षात जागतिक स्थरावर महागाई वाढल्यामुळे RBI सह इतर अनेक सेंट्रल बँकांनी व्याजदरवाढ केली. मात्र, आता महागाई बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. तसेच, आता आणखी व्याजदरवाढ केली तर मंदी येण्याची भीती आहे. त्यामुळे, पुढच्या 3 वर्षाचा विचार केला तर सध्याचा व्याजदरापेक्षा 3 वर्षानंतरचे व्याजदर कमी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्म डेट फंड्समध्ये गुंतवणूक चालू केली तरच पुढच्या 3 वर्षात खूप चांगला रिटर्न मिळू शकतो. व्याजदर कमी झाले तर लॉन्ग टर्म बॉण्डच्या किमती बऱ्यापैकी वाढतील आणि त्यामुळे डेट फंड्सवर चांगला रिटर्न मिळेल. आता दुसरा ऍसेट आहे चांदी. सोनं आणि चांदीमध्ये साधारण एकसरळच रिटर्न मिळतो, असं ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं. मात्र ऑगस्ट 2020 नंतर चांदीने काहीच रिटर्न दिला नाहीये, दुसरया बाजूला या दरम्यान सोन्याच्या किमतींमध्ये 40% रिटर्न मिळाला आहे. यामुळे, सिल्वर टू गोल्डचा रेशिओ चार्ट महत्वाच्या सपोर्टवर आला आहे. त्यामुळे, पुढच्या काही वर्षात सोन्यापेक्षा जास्त रिटर्न चांदीमध्ये मिळू शकतो. त्यामुळे, आपण सिल्वरमध्ये ब्रेकआऊट ट्रेडिंग केलं तर चांगला रिटर्न मिळू शकतो.

आजचा आपला तिसरा ऍसेट आहे बँकनिफ्टी किंवा प्रायव्हेट बँकांचे शेअर्स. मागच्या 1 वर्षात बॅंकनिफ्टीने निफ्टीला बऱ्यापैकी अंडर परफॉर्म केलं आहे. मागच्या 1 वर्षात निफ्टीने 28% तर बॅंकनिफ्टीने केवळ 19% रिटर्न दिला आहे. बॅंकनिफ्टी आणि निफ्टीचा रेशिओ चार्ट आता अतिशय महत्वाच्या सपोर्ट जवळ आला आहे. त्यामुळे, बॅंकनिफ्टी आणि विशेषतः प्रायव्हेट बँकांच्या शेअर्समध्ये रिस्क रिवॉर्ड अतिशय फेव्हरेबल आहे. बँकिंग फंड, बँकिंग बीस, बॅंकनिफ्टी फ्युचर्स किंवा HDFC आणि कोटकसारख्या शेअर्समध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केली तर पुढच्या 3 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो. अश्या प्रकारे या 3 ऍसेट्समध्ये आपण ओव्हर वेट पोजिशन घेतली तर पोर्टफोलिओवर चांगला अल्फा कमावता येईल आणि यासाठी आपल्याला कोणतीही अतिरिक्त जोखीम घ्यावी लागणार नाही.

Published: April 20, 2024, 20:56 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App