फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये फिनटेक कंपन्यांची बाजी

अँपचा वापर करून तरुण गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये या फिनटेक कंपन्यांच्या अँप्सनी नवीन इतिहास रचला. नोव्हेंबर महिन्यात भारतात साधारण 30 लाख नवीन SIP चालू करण्यात आल्या, त्यापैकी 13 लाख SIP अँपच्या माध्यमातून चालू करण्यात आल्या आहेत.

सध्याच्या जगात भाजीपासून ते इंश्युरन्सपर्यंत आणि औषधांपासून ते फर्निचरपर्यंत सगळ्या वस्तू ऑनलाईन खरेदी करते येतात. ज्या अँपवरून आपण जेवण ऑर्डर करत होतो, त्याच अँपवरून आपण भाजीपाला ऑर्डर करू शकतो. ज्या अँपचा वापर आपण पेमेंट करण्यासाठी करत होतो, त्याच अँपवरून आपण इंश्युरन्स खरेदी करू शकतो. एवढंच नाहीतर ग्राहकांना एकाच अँपमध्ये म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि अन्य ठिकाणी गुंतवणूक करणं आता सहज शक्य आहे, तर त्याच अँपवरून अगदी काही सेकंदात लोनदेखील घेता येतं. या अँपचा वापर करून तरुण गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये या फिनटेक कंपन्यांच्या अँप्सनी नवीन इतिहास रचला. नोव्हेंबर महिन्यात भारतात साधारण 30 लाख नवीन SIP चालू करण्यात आल्या, त्यापैकी 13 लाख SIP अँपच्या माध्यमातून चालू करण्यात आल्या आहेत.

ग्रो, एंजेल वन, फोन पे आणि झिरोधासारख्या अँप्सचा वापर करून गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. यामध्ये तरुण गुंतवणूकदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये कमिशन नसतं, त्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचतील अश्या प्रकारचं मार्केटिंग कंपन्यांनी केलं आणि ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. म्युच्युअल फंड्सप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांनीदेखील या अँप्सलाच पसंती दिली आहे. NSE वर होणाऱ्या ट्रेडिंग वोल्युममध्ये सर्वाधिक हिस्सा ग्रो, एंजेल वन आणि झिरोधाचा आहे. ऍक्टिव्ह क्लायंट्सचा विचार केल्यास, या कंपन्यांनी ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज, SBI सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवालसारख्या दिग्गजांना अवघ्या काही वर्षात मागे टाकलं आहे. या कंपन्यांकडे 53% ऍक्टिव्ह क्लायंट आहेत, म्हणजेच 2 पैकी 1 गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. ज्यांनी वर्षभरात किमान एक शेअर खरेदी केला आहे त्यांना ऍक्टिव्ह क्लायंट म्हणतात.

नवीन पिढीचा विश्वास बसणार नाही पण 5 वर्षांपूर्वी कॅश किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत येतं नव्हतं. मात्र, आता बाकी नसेल आणि खिशात केवळ मोबाईल असेल तर आपण काहीही करू शकतो. पैशाचं पाकीट नसेल तरी आपण आरामात जगू शकतो, कारण आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. डिजिटल पेमेंटमध्ये भारताने सर्व देशांना मागे टाकलं आहे. आता गुगल पे, फोन पे आणि PayTM सारख्या अँप्सचा वापर करून जवळपास 93% पेमेंट होतात. UPI च्या माध्यमातून सध्या 4 लाख कोटींचे मर्चंट पेमेंट होतात. ज्यावेळेला एखादा ग्राहक दुकानदार किंवा व्यावसायिकाला पेमेंट करतो, त्याला मर्चंट पेमेंट म्हणतात.

फिनटेक कंपन्यांनी शेअर्स, म्युच्युअल फंड्स आणि पेमेंट बरोबरच लोन मार्केटवर देखील त्यांचं वर्चस्व निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे, लहान लोनच्या मार्केटमध्ये या अँप्सचा मार्केट शेअर बऱ्यापैकी वाढला आहे. PayTM, भारत पे, क्रेडिट बीसारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेत. या कंपन्यांकडे ग्राहक आणि मर्चंट या दोघांचीही पेमेंट हिस्टरी असते. त्यामउळे, त्याचा वापर करून या कंपन्या कमी कालावधीत लोन देऊ शकतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने या कंपन्यांनी क्रेडिट एनेलीसीस मॉडेल तयार केला आहेत. त्यामुळे, बँकांच्या तुलनेत या कंपन्या जलद कर्ज मंजूर करतात. त्यामुळे, ग्राहकांना घरबसल्या अवघ्या काही मिनिटात लोन मिळू शकतं. Experian च्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये फिनटेक स्टार्ट-अप्सनी लहान लोनच्या मार्केटमध्ये 45% बिझनेस मिळवला. तर, 2023 मध्ये हा आकडा वाढून 73% झाला. हाच प्रकार इंश्युरन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. बाईक, कार आणि हेल्थ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी ग्राहक फोन पे, मोबिक्विकसारख्या अँप्सचा वापर करत आहेत. या मार्केटमध्ये इंश्युरन्स देखो, टर्टल मिंट आणि पॉलिसी बाजारसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. एकंदरीत विचार केल्यास, फायनान्शिअल सर्व्हीसेस सेक्टरमध्ये फिनटेक कंपन्यांनी जोरदार विस्तार केला आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांना मोठ्या शहरांबरोबरच टायर 2 आणि टायर 3 शहरं आणि ग्रामीण भागातूनदेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या काळात हा ट्रेंड आणखी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल.

Published: February 10, 2024, 21:28 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App