PayTM चा ट्रॅक रेकॉर्ड आधीपासूनच खराब आहे का?

RBI च्या परिपत्रकानुसार, कॅशबॅक आणि रिफंड वगळता 29 फेब्रुवारीनंतर Paytm बँकेचा कोणताही ग्राहक अकॉउंट, प्रीपेड कार्ड, वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये यापुढे पैसे जमा करू शकणार नाही. 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप्सना परवानगी दिली जाणार नाही. 29 फेब्रुवारीपर्यंत ग्राहक त्यांच्या अकॉउंटमध्ये असणारी रक्कम काढू शकतात किंवा कुठेही वापरू शकतात, मात्र 1 मार्चनंतर यावर अनेक निर्बंध येणार आहेत.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकार सामान्य लोकांना टॅक्स कमी करून दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. सरकारकडून PPF ची मर्यादा वाढवली जाईल, 80C अंतर्गत कर सवलतीची संधी दिली जाईल किंवा टॅक्स रेट कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने यापैकी काहीच केलं नाही. त्यामुळे, बजेटनंतर सामान्य लोकांचा अपेक्षा भंग झाला. लोकं यातून सावरत असतानाच रिजर्व बँकेने आणखी एक धक्का दिला. रिजर्व बँकेने PayTM पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर बंदी घातली. त्यामुळे, 1 मार्च 2024 नंतर PayTM पेमेंट्स बँकेचे ग्राहक बँक खात्यात आता पैसे जमा करू शकणार नाहीत. RBI च्या परिपत्रकानुसार, कॅशबॅक आणि रिफंड वगळता 29 फेब्रुवारीनंतर Paytm बँकेचा कोणताही ग्राहक अकॉउंट, प्रीपेड कार्ड, वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये यापुढे पैसे जमा करू शकणार नाही. 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप्सना परवानगी दिली जाणार नाही. 29 फेब्रुवारीपर्यंत ग्राहक त्यांच्या अकॉउंटमध्ये असणारी रक्कम काढू शकतात किंवा कुठेही वापरू शकतात, मात्र 1 मार्चनंतर यावर अनेक निर्बंध येणार आहेत.

Paytm ला 2017 मध्ये रिजर्व बँकेकडून बँकिंग व्यवसायासाठी लायसन्स मिळालं. मात्र, Paytm ची वाटचाल सुरुवातीपासूनच खडतर राहिली आहे. रिजर्व बँकेकडून लायसन्स मिळाल्यावर पहिल्या 1 वर्षात लायसन्समध्ये असणाऱ्या अटी पाळल्या नाही म्हणून PayTM ला RBI च्या कारवाईला सामोरं जावं लागलं. KYC चे नियम पाळले नाही म्हणून PayTM वर नवीन अकॉउंट उघडण्यासाठी जून 2018 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर, रिजर्व बँकेला चुकीची माहिती दिली म्हणून ऑक्टोबर 2021 मध्ये रिजर्व बँकेने PayTM बँकेला 1 कोटीची पेनल्टी लावली होती. त्यानंतर, कंपनीने वन 97 कम्युनिकेशन्स आणि PayTM बँकेने 2 वेगवेगळे सर्वर वापरले नाही म्हणून पुन्हा एकदा कंपनीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर, कंपनीवर पुन्हा एकदा नवीन अकॉउंट उघडण्यासाठी तात्काळ बंदी घालण्यात आली. त्यानंतर, कंपनीला थर्ड पार्टी कंपनीकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टीम ऑडिट करून घेण्याची सक्ती करण्यात आली.

त्यानंतर, Paytm ने KYC नियमांचं पालन केलं नाही म्हणून ऑक्टोबर 2023 मध्ये रिजर्व बँकेने पुन्हा एकदा 5 कोटी 39 लाख रुपयाची पेनल्टी लावली. म्हणजेच, PayTM वर आता झालेली ही कारवाई पहिली नाहीये, तर याआधी अनेक वेळेला PayTM वर कारवाई झाली आहे. मात्र, या वेळेला PayTM ला जो झटका बसला आहे, त्यामुळे कंपनीचा बँकिंग व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. बँकिंग व्यवसायावर झालेल्या कारवाईमुळे PayTM च्या ब्रँड वॅल्युला फटका बसला आहे. कंपनीने KYC मध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Paytm पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांनी त्यांचा पॅन नंबर व्हॅलिडेट केला नाही तसेच KYC मंजूर करून घेतली नाही, असे गंभीर आरोप कंपनीवर ठेव्यात आले आहेत. त्यामुळे, PayTM चे बँक अकॉउंट वापरून मनी लॉण्डरिंग झालं आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकाच पॅन नंबरचा वापर करून शेकडो अकॉउंट उघडल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे. डॉरमन्ट अकॉउंटचा वापर मनी लॉण्डरिंगसाठी करण्यात आला आहे, असे आरोप PayTM वर करण्यात आले आहेत. एकंदरीत विचार केल्यास, कम्प्लायन्सच्या बाबतीत PayTM चा ट्रॅक रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये. त्यामुळे, येणाऱ्या काळात PayTM या संकातून कशी बाहेर पडणार, ते पाहावं लागेल.

Published: February 28, 2024, 19:16 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App