महिलांच्या नावानं घर घेणं का आहे फायदेशीर ?

सिद्धार्थ नवीन घर घेण्याच्या विचारात आहे आणि गृहकर्जासाठी अनेक बँकेच्या संकेतस्थळांची छाननी करतोय. यावर सिद्धार्थला त्याच्या एका मित्राने त्याच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.सिद्धार्थने यावर त्याच्या मित्राला विचारले , पत्नीच्या नावावर घर घेण्याचा फायदा काय ? सिद्धार्थप्रमाणे तुमच्यापण मनात हाच प्रश्न उभा राहिला असेल तर पाहा

सिद्धार्थ नवीन घर घेण्याच्या विचारात आहे आणि गृहकर्जासाठी अनेक बँकेच्या संकेतस्थळांची छाननी करतोय. यावर सिद्धार्थला त्याच्या एका मित्राने त्याच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. सिद्धार्थने यावर त्याच्या मित्राला विचारले , पत्नीच्या नावावर घर घेण्याचा फायदा काय ? सिद्धार्थप्रमाणे तुमच्यापण मनात हाच प्रश्न उभा राहिला असेल…

तर याचं उत्तर आम्ही देऊ… पत्नीच्या नावावर घर घेण्याचा फायदा काय आणि यामुळे तुमचे किती पैसे वाचू शकतात..याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ  रिअल इस्टेटमध्ये महिलांच्या नावे गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक बँका आणि एनबीएफसी कमी व्याजदरावर गृहकर्ज देत आहेत.  पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मिळणाऱ्या व्याजदरामध्ये जवळपास 5 ते 10 बेसिक पॉइंट म्हणजे जवळपास 0.05 ते 0.10 टक्क्यापर्यंत सूट मिळते. क्रेडिट स्कोअरवर बँकाचा व्याजदर अवलंबून असतो. तसेच प्रत्येक बँकेचा व्याज दर कमी जास्त असतो. व्याज दरातील फरकामुळे दीर्घकालावधीत खूप मोठी व्याजाची रक्कम तुम्ही बचत करू शकता.

महिलांसाठी गृहकर्जाचे व्याज दर

भारतीय स्टेट बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर 9.15 टक्क्यांपासून सुरु होतो.. महिलांना व्याजदरावर 0.05 टक्के सुट मिळते… महिलांसाठी प्रारंभिक व्याजदर 9.10 टक्के आहे. याप्रमाणे सेंट्रल बँकत गृहलक्ष्मी योजनेतील गृहकर्जाचा व्याजदर 8.35 ते 9.25 टक्के आहे..महिलांव्यतिरीक्त हा दर 8.5 ते 9.5 आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर समजा सिद्धार्थने त्याच्या नावे सेंट्रल बँकेतून 1 कोटीचे कर्ज 9.50 टक्के व्याजदराने घेतले तर त्याला 93,213 रुपये हफ्ता असेल आणि पुढील 20 वर्षात त्याला मुळ रकमेपेक्षा 1 कोटी 23 लाख 71,149 इतके व्याज भरावे लागतील. पण पत्नीच्या नावाने कर्ज घेतल्यास त्याला 91,587 हफ्ता बसतो आणि व्याजासकट 1 कोटी 19 लाख 80 हजार 804 रुपये त्याला भरावे लागतील.या हिशोबाने महिन्याला महिन्याच्या हफ्त्यात दोन हजार रुपयांची बचत होईल. वीस वर्षात व्याजाचे जवळपास चार लाख रुपये एवढी मोठी रक्कमेची बचत होईल

यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी आपल्या पत्नीला सहकर्जदार बनवल्यास व्याजदरात किती कपात होईल हे नक्की विचारा…तसंच पत्नीला सहकर्जदार ठेवल्यास यामुळे गृहकर्जाची पात्रता वाढल्याने जास्त रकमेचं कर्ज बँक मंजूर करते.

घरखरेदी करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा खर्च आहे तो म्हणजे स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क. मुद्रांक शुल्काचा भरणा घर खरेदी करताना करायचा असतो.

अनेक राज्य सरकारं महिलांच्या नावे घर खरेदी केल्यानंतर मुद्रांक शुल्कात विशेष सूट देतात…

महाराष्ट्रात सदनिकेचा खरेदी व्यवहार करताना दस्त नोंदणीवर सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते.एकल महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास एक टक्का सवलत मिळत असल्याने सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते.

गृहकर्ज केवळ तुमचं घराचं स्वप्न साकार करत नाही तर आयकर वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतो…

आयकर कलम 80c अंतर्गत करदात्याला एकूण करपात्र उत्पन्न दरवर्षी दीड लाखापर्यंत कमी करु शकतो. शिवाय एका आर्थिक वर्षासाठी भरलेल्या व्याजदरावर 2 लाखांपर्यंत कर कपातीची सवत मिळते.व्याजाची रक्कम तुमच्या उत्पन्नातून वजावट केल्यानंतर तुमचं कर प्राप्त उत्पन्न कमी होते. महिलांना मालमत्तेत स्थान मिळावे,यासाठी भारत सरकारने व्याज अनुदानसह अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत…

पंतप्रधान आवास योजनेत क्रेडिट लिंक्ड अनुदान म्हणजेच CLSS चा ऑप्शन आहे..या योजनेमुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना घराचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत मिळते…घर विकत घेण्यासाठी किंवा डागडुजी करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना 2 लाख 67 हजारांपर्यंत अनुदान मिळते गृहकर्जावर मिळणारी आयकरावरील सवलत आणि व्याजावरील अनुदान महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहेत…

तर सिद्धार्थने त्याच्या आई किंवा पत्नीच्या नावावर घर विकत घेतले तर तो जवळपास 6 लाखांची बचत करु शकतो

सिद्धार्थप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या आई किंवा पत्नीच्या नावाने घर घेऊन पैशांची बचत करु शकता. दरवर्षी जागतिक महिला दिनी अनेक बँका आणि बांधकाम व्यावसायिक महिलांसाठी काही खास ऑफर घेऊन येतात त्यावरही आपण नजर ठेवायला हवी..

Published: March 7, 2024, 17:31 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App