Tokenization मुळे बँकिंग व्यवहारांची सुरक्षितता वाढणार

टोकनायजेशनमुळे बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. त्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

  • Team Money9
  • Last Updated : December 8, 2023, 17:08 IST

RBI ने आता बँकांना कार्डसाठी टोकन तयार करण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा ऑनलाइन वापर अधिक सुरक्षित होणार आहे. सध्या फक्त ई-कॉमर्स साईट्सवर कार्ड टोकनायझेशन करण्यात येते. पण आता तुम्ही ई-शॉपिंग केल्यानंतर कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करताना कार्डसाठी टोकन तयार करू शकता.

टोकनायझेशन म्हणजे काय ? 

कार्ड टोकनायझेशनमुळे ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे करता येणार आहेत.  एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापर करता त्यावेळी 16-अंकी कार्ड नंबर, कार्ड एक्सपायरी डेट, CVV तसेच वन-टाइम पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पिन यासारख्या तपशीलांवर आधारावर हा व्यवहार असतो. ज्यावेळी सगळी माहिती अचूक भरली जाते त्यानंतरच व्यवहार पूर्ण होतो. कार्डची संपूर्ण माहिती ‘टोकन’च्या स्वरुपात देण्यात येते. हा व्यवहार करण्यासाठी टोकनच्या स्वरूपात एक कोड दिला जातो त्यालाच टोकनायजेशन असे म्हणतात. हे टोकन प्रत्येक व्यक्ती आणि डिव्हाईससाठी वेगळा असतो.

देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. फसवणुकीच्या घटन रोखण्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 पासून टोकनायझेशन लागू करण्यात आली आहे.  टोकनायझेशनसोबतच कार्डचा तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने स्टोअर केल्यानं फसवणुकीचा धोका कमी होतो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे तपशील टोकन स्वरूपात शेअर केल्याने फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

आत्तापर्यंत Amazon, Flipkart सारख्या वेबसाइट्सवर टोकनायझेशन पद्धतीचा वापर करण्यात येत होता. या वेबसाईटवर खरेदी केल्यानंतर पैसे भरताना secure your card as per RBI guidelines पर्याय दिसतो.तुम्ही हा पर्याय निवडल्यानंतर एक सुरक्षित टोकन जनरेट होतो. आता तुमच्या कार्डमधील संपूर्ण तपशीलाऐवजी मर्चंट साईटसच्या डेटाबेसमध्ये फक्त टोकन स्टोअर होतो.

आता आरबीआयने कार्ड जारी करणाऱ्या बँकांनाही कार्ड-ऑन-फाईल टोकन तयार करण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कार्ड-ऑन-फाईलमध्ये बँकेकडे टोकनसाठी विनंती करण्यात येते. बँका कार्डमधील माहितीची सत्यता पडताळतील. ग्राहकांने दिलेल्या तपशीलावर आधारित एक टोकन तयार करण्यात येतो. व्यवहार करताना ग्राहकाकडून मिळालेला टोकन व्यापारी संबंधित बँकेकडे सादर करेल आणि पैशांची विनंती करतो. टोकनद्वारे पैशांची विनंती व्यापाऱ्याने केल्यानंतर संबंधित बँक टोकनचा वापर करून आपल्या डेटाबेसमधील ग्राहकांची माहिती पडताळतील. पडताळणीत माहिती अचूक असल्यानंतर बँका व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करतात.

 वेगवान पद्धतीनं सुरक्षितपणे व्यवहार :
बँकेनं टोकन दिल्यानंतर प्रत्येक अॅप किंवा साईटसवर टोकनायझेशनची प्रक्रिया करण्याची गरज नाही. कोणत्याही नवीन ऑनलाईन साईटसवर कार्डची माहिती देण्याची आवश्यकता नाही. तसेच कार्डचा तपशील चोरीला जाण्याचा धोका कमी होतो.
तुम्ही सहजपणे बँकेच्या साईट किंवा अॅपवर टोकन अॅड करू शकता किंवा डिलिट करू शकता. तसेच बँकेच्या अॅपवर कार्डची लिमिटही सेट करता येते. त्यासोबतच सहजपणे कार्डसाठी टोकन तयार करू शकता.

Published: December 8, 2023, 17:02 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App