संकटसमयी अपघाती विमा येतो तुमच्या मदतीला

भारतात दर तासाला 19 लोक रस्ते अपघातात मृत पावत आहेत. घरातून बाहेर जायचे म्हंटले की अपघाताची भीती असते. अशावेळी अपघात विमा पॉलिसी असणे महत्वाचे आहे

  • Team Money9
  • Last Updated : February 21, 2024, 08:08 IST

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणारा राजेश आता चिंतेत आहे. आता आयुष्य कसे जगायचे ? मोठ्या अपघातामध्ये तो वाचला पण त्यामध्ये त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. राजेश त्याच्या कुटुंबातील एकुलता एक कमावणारा व्यक्ती होता. अशी अवस्था असल्याने कामावर परत कसे जाणार , कर्जाची परतफेड कशी करणार , उपचाराचा खर्च कसा भरून काढणार हे सर्व प्रश्न त्याला पडले होते.

जर राजेशकडे अपघात विमा पॉलिसी असती तर त्याला चिंता करण्याची गरज नव्हती.
सरकारी आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतात दर तासाला 19 लोक रस्ते अपघातात मृत पावले आहेत.  घरातून बाहेर जायचे म्हंटले की अपघाताची भीती असते. अशावेळी अपघात विमा पॉलिसी असणे महत्वाचे आहे.

आरोग्य विमा पॉलिसीमुळे तुमचा हॉस्पिटलचा खर्च कव्हर होऊ शकतो. आयुर्विमा पॉलिसीमध्ये मृत्यू झाल्यास विमा कंपनी तुमच्या वारसाला एक रक्कम देते. परंतु अपघात विम्यामुळे पॉलिसीधारकाला शारीरिकरित्या अंशतः किंवा पूर्णतः विकलांग झाल्यास पूर्ण कव्हर मिळते. अपघात विमा कव्हरचा प्रीमियम अधिक स्वस्त असतो.

तुम्ही अनेक प्रकारचे अपघात विमा पॉलिसी घेऊ शकता. याला तुम्ही कॉम्प्रेसिव्ह मोटर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट करू शकता. हे आपल्या आयुर्विमा किंवा आरोग्य विम्यासोबत रायडर म्हणून घेऊ शकता. याव्यतिरिक्त स्टँडअलोन कव्हर घेऊ शकता ज्यामध्ये सर्व प्रकारचे अपघात सुरक्षा मिळते.

जर तुम्ही वाहन चालवत नसाल किंवा त्यातून प्रवास करत नसाल तर तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह मोटर इन्शुरन्स अंतर्गत अपघात कव्हर मिळत नाही. मोटर इन्शुरन्स अंतर्गत वैयक्तिक अपघात कव्हर सहसा 15 लाख रुपयांपर्यंत मर्यादित असतो.

स्टँडअलोन पर्सनल अॅक्सिडंट पॉलिसी ही फायद्याची आहे. याचे कारण म्हणजे यामध्ये वाहन अपघात आणि इतर प्रोटेक्शन आणि कव्हर मिळतात ज्यामध्ये तुम्ही त्या अपघातात असाल तर क्लेम करता येते. Go Digit General Insurance चे प्रॉडक्ट हेड अंशूल बोहरा सांगतात. जरी तुम्ही स्वतः वाहन चालवत असाल किंवा इतर कोणत्याही वाहनांमधून प्रवास करत असाल तर ही पॉलिसी कॉम्प्रेसिव्ह प्रोटेक्शन देते. यामध्ये आग लागणे किंवा पाण्यात बुडाल्यास इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास देखील कव्हर मिळते. तसेच स्टँडअलोन पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होणे आणि OPD चे खर्च देखील कव्हर होतात.

याव्यतिरिक्त पॉलिसीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः विकलांग झाल्यास देखील कव्हर मिळते. काही विमा कंपन्या मुलांचे शिक्षण, लोन वेव्हर, लॉस ऑफ इन्कम कव्हर, बर्न आणि फ्रॅक्चर कव्हरसारखे अॅडिशनल कव्हरेज देखील मिळते.सहसा वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये सम इंश्योर्डची मर्यादा पॉलिसी धारकाचे वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट केले जाते.

अंदाजित स्वरूपात 15 लाख रुपयांचे सम इंश्योर्ड असणारे बेसिक अपघात विमा पॉलिसीमध्ये 1,1127 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागू शकतो.  तुम्ही होम हॉस्पिटलायजेशन, कोमा बेनिफिट्स , लाईफस्टाइलमधील बदलासंदर्भातील फायदे, लॉस ऑफ इन्कम बेनिफिट, मुलांचे शिक्षण,र्न आणि फ्रॅक्चर कव्हरसहित इतर अॅडिशनल कव्हर जोडता येते. उदाहरणार्थ आदित्य बिर्ला कॅपिटलच्या Active assure personal accident plan मध्ये वार्षिक उत्पन्नाच्या 12 पट अॅक्सिडेंट कव्हर मिळत आहे. यामध्ये दुर्घटनेमध्ये मृत्यू आणि कायमचे विकलांगतेवर 100 % पेआऊटचा पर्याय मिळत आहे. 26 ते 35 वर्षाच्या व्यक्तीसाठी 20 लाख रुपयांच्या कव्हरसाठी 9,549 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल. मणिपाल सिग्नाच्या Manipal Protection Accident care प्लॅनमध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर 2,089 रुपये मिळत आहे. अॅक्सिडेंट पॉलिसीमध्ये जितके जास्त रायडर घ्याल तितकी प्रीमियमची रक्कम वाढेल.

आता यासाठी कोणत्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत ते समजून घ्या. वैयक्तिक विमा पॉलिसीमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट नाहीत , क्लेमची प्रक्रिया काय आहे , रिहॅबिलिटेशनचा खरच आणि ग्लोबल कव्हरेजसारख्या अॅडिशनल बेनिफिट्सवर लक्ष द्यावे. तसेच दारू किंवा नशेमध्ये जे अपघात होतात ते कव्हर केले जात नाहीत याची माहिती असणे गरजेचे आहे असा सल्ला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर भक्ति रसल देतात.

यासोबतच तुम्ही जो सम इंश्योर्ड निवडला आहे तो आपल्या नोकरीच्या हिशोबाने निवडावा.कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयांचे कव्हर मिळणारी पॉलिसी निवडली पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात. तसेच ही पॉलिसी रायडरव्यतिरिक्त देखील असावी.

Published: February 21, 2024, 08:07 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App