कर्ज घेऊन की बचत करून तुम्ही कार खरेदी कशी करणार ?

पैशांची बचत करून म्हणजेच आर्थिक नियोजन करून कार खरेदी करण्याचे दोन फायदे आहेत. एक खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे हप्त्याची किटकिट नसणार. कार खरेदीसाठी तुम्ही किती काळ वाट पाहू शकता हे खूप महत्वाचे आहे. यातूनच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी लक्षात येतो. जेवढ्या उशिरा तुम्ही कार खरेदी कराल तेवढीच वाढ तुमच्या गुंतवणुकीत होईल.

राजेशसारख्या बहुतांश जणांसाठी घर खरेदीनंतर कार खरेदी हा सर्वात मोठा निर्णय असतो. मग अशा मोठ्या निर्णयाच्या वेळी आर्थिक नियोजनही आवश्यक आहे. या आर्थिक नियोजनात सुरूवातीला आपलं बजेट निश्चित करायला हवं. म्हणजेच तुम्हाला किती लाखांची कार खरेदी करायची आहे. सध्या मिड-रेंज कारची किंमत सात ते दहा लाख रुपयांच्या जवळपास असते. उत्पन्न, वैयक्तिक आवड-निवड आणि गरजेनुसार तुम्ही गाडीची निवड करा. एकदा बजेट ठरवल्यानंतर त्यात फेरफार करू नका. त्यानंतर पैशांची जुळवा-जुळव करा. पैसा उभारण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पैशाची बचत करून कार घ्या किंवा दुसरा पर्याय आहे वाहन कर्जाचा.

कार खरेदीसाठी कोणता पर्याय निवडावा ? 

पैशांची बचत करून म्हणजेच आर्थिक नियोजन करून कार खरेदी करण्याचे दोन फायदे आहेत. एक खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे हप्त्याची किटकिट नसणार. कार खरेदीसाठी तुम्ही किती काळ वाट पाहू शकता हे खूप महत्वाचे आहे. यातूनच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी लक्षात येतो. जेवढ्या उशिरा तुम्ही कार खरेदी कराल तेवढीच वाढ तुमच्या गुंतवणुकीत होईल.

राजेशला आवडलेल्या कारची सध्याची किंमत सात लाख रुपये आहे. मात्र, त्यांना ती कार पाच वर्षांनी खरेदी करायची आहे. सरळ आहे, पाच वर्षानंतर त्या कारची किंमत सात लाखांपेक्षा जास्त होणार. वाहन कंपन्या वर्षातून दोन ते तीन वेळा कारच्या किंमती एक ते तीन टक्क्यांनी वाढवतात. म्हणजे वर्षभरात कारची किंमत सात ते आठ टक्क्यांनी वाढते. पाच वर्षानंतर सात लाख रुपयांच्या कारची किंमत काढण्यासाठी तुम्हाला महागाईच्या कॅलक्युलेटरचा वापर करावा लागणार आहे.

एखादी वस्तू विकत घेण्यासाठी तुम्हाला सात लाख रुपये लागत असतील तर पाच वर्षानंतर त्या वस्तूची किंमत जवळपास दहा लाख तीस हजार रुपये एवढी होणार,अशी माहिती महागाईचा कॅलक्युलेटर देतो.. सध्या अंदाजित महागाईचा दर हा आठ टक्के आहे. म्हणजेच सात लाख रुपयांची कार पाच वर्षानंतर खरेदी करताना तुम्हाला दहा लाख तीस हजार मोजावे लागतील.

 दहा लाख रुपयांचं आर्थिक नियोजन कसं करावं ?

गुंतवणुकीचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे. अशावेळी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं जोखिमेचं ठरू शकते कारण इक्विटी म्युच्युअल फंडात तीव्र चढ-उतार असतात. म्हणजेच तुम्हाला कमी चढ-उतार असणाऱ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार तसेच हे आर्थिक साधन महागाईला मात करणारं असावं म्हणजे किमान सात ते आठ टक्के देणारा असावं. याबाबतीत तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहा.

गुंतवणुकीची तर माहिती मिळाली . आता दर महिन्याला किती रुपयांची बचत करावी म्हणजे पाच वर्षानंतर दहा लाख 30 हजार रुपये मिळतील. SIP कॅलक्युलेटरनुसार अंदाजित आठ टक्के परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी 14 हजार 18 रुपयांची SIP करावी लागणार तर दहा टक्के परताव्यासाठी तेरा हजार 301 रुपयांची SIP करावी लागते.

कुठं गुंतवणूक करावी ?
बाजारातील जोखिमेवर म्युच्युअल फंडाचा परतावा अवलंबून आहे. म्हणजेच बाजारानुसार परतावा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या उद्देशावर लक्ष्य टेवा गरजेनुसार SIP ची रक्कम कमी-जास्त करा किंवा फंड बदला. पाच वर्ष हा मोठा कालावधी आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्या कार खरेदीचा बजेटही वाढवावा असं वाटू शकतं. त्यामुळे बजेट वाढल्यानंतर SIP ची रक्कम वाढवा. अनेक जण दोन ते वर्षानंतर तर काही जण आठ ते दहा वर्षानंतर कार खरेदी करायचं नियोजन करतात आणि त्यानुसार आर्थिक नियोजनही करतात. अशा व्यक्तींनी कुठं गुंतवणूक करावी ते आता पाहूयात.

वाहन कर्ज घेऊनही कार खरेदी करता येते. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला कार खरेदीसाठी वाट पाहावी लागणार नाही. कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच कार घराच्या दारात उभी . मात्र,यासाठी कारच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील.

कारच्या किमतीच्या 80 ते 90 टक्के वाहन कर्ज मिळते. काही बँका आणि कंपन्या शंभर टक्के कर्ज देतात. बहुतांश वाहन कर्जाचा व्याज दर हा 9 टक्क्यांपासून सुरू होतो. SBI मध्ये वाहन कर्जाचा व्याज दर हा 8.85 टक्के आहे तर ICICI बँकेत 9.10 टक्के आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर आणि कर्जाचा कालावधी यावर व्याजाचे दर अवलंबून आहेत.

समजा राजेशनं सात लाख रुपयांची कार कर्ज घेऊन खरेदी केलीय.सुरूवातीला त्याला 20 टक्के म्हणजे एक लाख 40 हजार रुपयांचा डाऊन पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतर त्याला उर्वरित 5 लाख 60 हजार रुपयांचं कर्ज मिळणार. या कर्जावर 9 टक्के व्याज दरानं पाच वर्षांसाठी 11 हजार 625 रुपयांचा हप्ता भरावा लागणार. कर्जाची परतफेड करेपर्यंत सात लाख रुपये भरावे लागतील. यात जवळपास एक लाख 40 हजार रुपये एवढा व्याज द्यावा लागत आहे.कर्ज घेताना व्याजासोबत प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फीस तसेच कर्जाचा हप्ता चुकल्यास दंडही भरावा लागतो. कर्जाची परतफेड न केल्यास बँक तुम्ही कारही जप्त करते. तसेच मुदतीआधी कर्जाची परतफेड केल्यास फोर-क्लोजर शुल्कही द्यावे लागते.

राजेशनं आर्थिक नियोजन करून कारची खरेदी केल्यास व्याजापोठी जवळपास दीड लाख रुपयांची बचत होते. मात्र,इथं कारची गरज हा खूप महत्वाचा विषय आहे. तुम्हाला कार खरेदीची घाई नसल्यास आर्थिक नियोजन करून कार खरेदी करू शकता. मात्र, कार घेणं आवश्यकच असल्यास कर्ज घेऊनच वाहन खरेदी करणं योग्य ठरते. दोन्ही बाबींवर विचार करूनच योग्य निर्णय घ्या.

 

Published: April 2, 2024, 16:40 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App