कर्ज मंजूर करताना चांगला क्रेडिट स्कोअर कसा येतो मदतीला ?

चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते तसेच कमी व्याज दरात कर्ज मिळते. चांगला क्रेडिट स्कोअर आणि कर्ज मंजूर होणे याचा परस्पर संबंध पाहूयात.

कर्ज देण्याअगोदर बँका तुमचा क्रेडिट स्कोअर पाहतात.
क्रेडिट स्कोर तुमची क्रेडिट worthiness म्हणजे कर्ज चुकवण्याची क्षमता दर्शवतो… कर्ज मंजूर होण्यात क्रेडिट स्कोर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो… क्रेडिट स्को्अर हा तीन अंकी क्रमांक असतो.. वेगवेगळे क्रेडिट ब्युरो आणि क्रेडिट इँफॉर्मेशन कंपन्या क्रेडिट स्कोअर तयार करतात..यात सिबिल स्कोर सर्वाधिक परिचित आहे.

700 ते 750 चा क्रेडिट स्कोर सर्वात उत्तम समजला जातो….

चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते तसेच कमी व्याज दरात कर्ज मिळते.

क्रेडिट स्कोर आणि कर्जाचा व्याजदर यांचा परस्पर काय संबंध आहे ?.

यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाईटवरील माहिती पाहूयात.  ठराविक खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल लोनचा व्याजदर हा 12.75 ते 17.25 इतका आहे..या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचा क्रेडिट स्कोर 800 च्या वरती आहे त्यांना फ्लोटींग व्याजदर 12.75 टक्के आहे तर फिक्सड व्याजदर 13.75 टक्के आहे…750 च्या वर आणि 800 च्या आत क्रेडिट स्कोर असल्यास व्याजदर 13.75 ते 14.75 टक्के आहे.अशाच प्रकारे 650 ते 749 दरम्यान क्रेडिट स्कोर असल्यास तर 15.75 फ्लोटिंग तर 16.75 टक्के फिक्सड व्याजदरावर कर्ज मिळणार आहे.क्रेडिट स्कोर 650 च्या आत असेल तर फ्लोटींग व्याजदर 16.25 टक्के आहे आणि फिक्सड व्याजदर 17.25 टक्के राहिल……

फिक्सड व्याजदरात कर्जाची पतफेड होईपर्यंत व्याजदर स्थिर असतो तर फ्लोटींग व्याजदरात रेपो रेटनुसार व्याज दरात बदल होत असतो…

चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कमी व्याज दरात कर्ज मिळते हे तुम्हाला पीएनबीच्या व्याज दरात दिसून आलंच आहे. …750 हून जास्त आणि 800 हून क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या व्यक्तींना 13.75 टक्क्यांनी वैयक्तिक कर्ज मंजूर होते…

पण जर 650 च्या खाली क्रेडिट स्कोर असल्यास 16.25 टक्के व्याज दरानं कर्ज मिळते. म्हणजेच व्याज दरात 2.5 टक्क्यांचा फरक पडतो..

चांगल्या आणि खराब क्रेडिट स्कोर असणाऱ्या कर्जदारांच्या व्याजदरात 100 बेसिक पॉईंट म्हणजेच 1 टक्क्यांपर्यंतचे अंतर असते,अशी माहिती आर्थिक नियोजनकार यांनी दिलीय……

व्याज दरात एका टक्क्याचा फरक दिसत असला तरीही मोठ्या कालावधीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसा जातो….

तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असल्यास बँकेसोबत चर्चा करुन कमी व्याज दरात कर्ज मिळवू शकता.

कर्जावरील व्याज दर कमी करण्यासाठी काही उपाय पाहूयात.

नंबर-1) बँकेत कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोर चेक करा…

क्रेडिट ब्युरोच्या सिबिल Cibil.com या वेवसाईटवर नोंदणी करून वर्षातून एकदा क्रेडिट स्कोअर मोफत चेक करु शकता…

क्रेडिट रिपोर्ट तुम्ही डाऊनलोडदेखील करु शकता..चांगला स्कोअर असल्यास तुम्ही आत्मविश्वासाने कर्ज घेण्यासाठी बँकेत जाऊ शकता….

नंबर-2 होम लोन, पर्सनल लोन किंवा कार लोन घ्यायचे असल्यास वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर तपासणे गरजेचे आहे…एकाच बँकेशी चर्चा करुन निर्णय घेऊ नका…

बँक किंवा NBFC च्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या कर्जाची आणि व्याजदराची माहिती मिळेल.ही माहिती तुम्हाला बँकेसोबत चर्चा करताना कामी येते.

नंबर-3  कर्जा प्रकरणावर बोलताना बँकेला तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास आणि चांगल्या क्रेडिट स्कोअरची माहिती द्या <GFX 3 out>

चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज देताना बँक अटी-शर्थी शिथिल करू शकते. कर्ज परतफेडीच्या म्हणजेच क्रेडिट हिस्ट्रीवरून तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात किती सक्षम आहात याची माहिती मिळते.
.
नंबर-4)- कर्ज घेताना घाई करु नका ..वेगवेगळ्या बँकेसोबत चर्चा करा, त्यांच्या व्याजदराची तुलना करा…..

दुसऱ्या बँकेकडून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळतेय..याची माहिती कर्ज मंजूर केलेल्या बँकेला नक्की द्या….

यामुळे तुम्हाला तेवढ्याच किंवा त्याहूनही कमी व्याजदरात पहिली बँक कर्ज मंजूर करु शकते…

नंबर – 5)- अनेक प्रयत्नानंतरही बँक व्याजदर कमी करण्यास तयार होत नाही…तेव्हा घाईगडबडीत निर्णय घेऊ नका….

अशावेळी नकार देऊन दुसऱ्या बँकेशी चर्चा करा…आणि त्यांना तुमची अपेक्षा सांगा…..

क्रेडिट स्कोर जर चांगला असल्यानंम तुमची बाजू सक्षम आहे. तुम्ही बँकेसोबत Rate Shopping म्हणजे व्याज दराबाबत घासाघीस करु शकता…

कर्ज मंजूर करताना बँक फक्त क्रेडिट स्कोरच पाहत नाही. आपल्या परिस्थितीचाही बँक अभ्यास करते…. याशिवाय तुमचे उत्पन्न, तुमच्या उत्पन्नातील कर्जाचे प्रमाण, तुमचं वय आणि नोकरी या सर्व गोष्टीदेखील तुमचं प्रोफाईल किती मजबूत आणि सक्षम आहेत ते दर्शवतात…..आणि त्यावरुनच तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याजदर ठरतो .हे कायम लक्षात ठेवा….

 

 

Published: April 8, 2024, 19:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App