आधार कार्ड लॉक करा आणि फसवणूक टाळा

सध्या आधार कार्डचा वापर करूनही फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्ड लाक करून फसवणूक टाळता येते

  • Team Money9
  • Last Updated : December 7, 2023, 16:32 IST

देशात वाढत्या डिजिटलायझेशनमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच AePS ही डिजिटल पेमेंटची सोपी पद्धत बनली आहे. साधारणपणे आधार क्रमांक तुमच्या सर्व बँक खात्यांशी जोडलेला असतो. लहान शहरे आणि दुर्गम भागात बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी मायक्रो एटीएम हा एक चांगला पर्याय ठरत आहे. या मायक्रो एटीएममध्ये व्यवहार करण्यासाठी फक्त बँक खाते, आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्स लागतं. सायबर ठग लोकांचा फिंगरप्रिंट डेटा चोरून फसवणूक करत आहेत. अशा फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, कोलकाता पोलिसांनी लोकांना आधार कार्डमधील बायोमेट्रिक पर्याय लॉक करण्याचे आवाहन केले आहे.

आधार कार्डचा वापर वेगानं वाढण्यासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. आधार कार्डमध्ये बोटांचा ठसा , डोळ्यातील बुबुळं आणि चेहऱ्याच्या बायोमेट्रिकबद्दल माहिती असते. हे सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय असते. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही हा डेटा वापरू शकत नाही.

आधारशी संबंधित डेटा सुरक्षित न ठेवल्यास तुमचीही फसवणूक होऊ शकते. फसवणूक टाळण्यासाठी आधार कार्ड लॉक करा.  गरजेनुसार आधार कार्ड अनलॉक करता येतो. आधार लॉक केल्यास संपूर्ण डेटा सुरक्षित राहील आणि तुम्ही ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहाल.

आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याचे अनेक पर्याय आहेत.

 SMS द्वारे आधार कार्ड लॉक कसा करतात ?

आधार लॉक करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून GETOTP लिहून स्पेस द्या. आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहा आणि 1947 या क्रमांकावर पाठवा.त्यानंतर तुम्हाला सहा अंकी OTP मिळतो. कार्ड लॉक करण्यासाठी LOCK UID लिहा आणि स्पेस द्या आणि आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहा, पुन्हा स्पेस द्या आणि OTP लिहून 1947 वर पाठवा. यामुळे तुमचे कार्ड लॉक होते.तसेच ते अनलॉक करण्यासाठी UNLOCK UID लिहा स्पेस द्या आणि आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहा. नंतर स्पेस द्या आणि OTP टाका त्यानंतर आधार कार्ड अनलॉक होतो.

 वेबसाईट आणि mAadhaar App च्या द्वारे आधार कार्ड लॉक कसे करतात ?
www.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.त्यानंतर My Aadhaar चा पर्याय निवडा आणि Aadhaar Services वर क्लिक करा. त्यानंतर लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर Send OTP पर्यायावर क्लिक करा.तुम्हाला आलेला OTP टाका. आता तुम्हाला बायोमेट्रिक तपशील लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय मिळतो. तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा . mAadhaar अॅप डाउनलोड डाऊनलोड करून देखील आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करता येतं.

फसवणूक झाल्यास काय करावे?
आधारचा वापर करूण एकावेळी फक्त 10 हजार रुपये काढता येतात.  एका दिवसात जास्तीत जास्त 50 रुपये काढण्याची मर्यादा आहे. AePS द्वारे खात्यातून पैसे काढून तुमची फसवणूक झाली असल्यास त्या घटनेबद्दल अगोदर बँकेला माहिती द्या. तसेच तुमचे खाते ब्लॉक करा. हे माहिती तुम्ही अॅपच्या माध्यमातूनही देऊ शकता. तसेच फसवणूकीची तक्रार दाखल करा. सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारींसाठी सरकारने राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ सुरू केले आहे. या पोर्टलला भेट देऊन झालेल्या फसवणुकीची 90 दिवसांच्या आत तक्रार करा. तसेच फसवणुकीबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवा.

-आधार कार्डचा गैरवापर होऊ नये आणि फसवणुकीच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉकची सुविधा मोफत देते

– कुणालाही बायोमेट्रिक तपशील लॉक करता येतो. त्यामुळे डेटा सुरक्षित राहतो आणि फसवणुकीपासून बचाव होतो.

Published: December 6, 2023, 17:08 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App