लग्नाच्या नावानं फसवणूक कशी केली जाते

सध्या लग्न जमावण्यासाठी अनेक जण संकेतस्थळाचा वापर करतात. मात्र, या संकेतस्थळावरून लग्नाच्या नावानं फसवणूक कशी केली जाते ते पाहा

सध्या लग्न जुळवताना मॅट्रीमोनिअल साईट्सची म्हणजेच ऑनलाईन विवाह संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय.  ओळख किंवा कुणाचाही सल्ला न घेता लग्न जमवता येते असल्यानं लग्न जमवणाऱ्या संस्थाची मागणी वाढलीय .. ऑनलाईन विवाह संस्थांची लोकप्रियता वाढल्यानं सायबर चोरांचीही वाईट नजर या संस्थांवर पडलीय. त्यामुळे  तुम्ही पण अशा साईट्वरुन लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध व्हा.. . मॅट्रीमोनिअल साईट्सचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणावर लोकांना लुटणारी टोळी सक्रिय आहे… अनेक शहरांतून अशी फसवणुकीची प्रकरणं समोर आलीत,अनेक जणांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय..

तुम्हीदेखील ऑनलाईन विवाह संस्थाची मदत घेऊन लग्न जमवण्यासाठी प्रयत्नात असाल तर काही बाबी ध्यानात ठेवा 1. अशी होतेय ऑनलाईन विवाह संस्थांच्या नावाने फसवणूक… अशा फसवणुकीत एक व्यक्ती किंवा पूर्ण टोळीचा समावेश असू शकतो…यात सायबर चोर त्यांचे प्रोफाईल ऑनलाईन विवाह संस्थांच्या वेबसाईटवर बनवतात… यात चोर स्वतला एनआरआय असल्याचे सांगतात. ओळख वाढवून विश्वास संपादन केल्यानंतर ते अडचणीत असल्याचे सांगून किंवा इतर कोणतेतरी काम असल्याचे सांगत पैसे मागवतात… विश्वास ठेवून समोरच्याने पैसे दिल्यानंतर हे सायबर चोर गायब होतात. इतकंच नाही तर त्यांची प्रोफाईलही ते गायब करतात.

2. महागड्या भेटवस्तुंच्या नावावरही होतेय लूट अनेकदा हे सायबर चोर भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगत समोरच्याला खुश करतात.. पण हे गिफ्ट घ्यायचे असेल तर एअरपोर्टवर फीस किंवा टॅक्स चुकवावे लागेल असे सांगितले जाते…या फिच्या नावावर हजारो तर कधी लाखो रुपयेदेखील लंपास केले जातात..इतकंच नाही तर कस्टम ऑफिसरचा फेक कॉलदेखील येतो आणि पैसे न चुकवल्यास तुरुंगवास होण्याची भीतीदेखील दाखवली जाते…

3. लग्न केल्यानंतरसुद्धा होऊ शकते फसवणूक… काही प्रकरणात लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पैसे आणि दागिने घेऊन चोरांनी पळ काढल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली असतील…. अशा फसवणुकीत महिला चोरांचा सहभाग मोठा आहे.

4. पैशांशीच नाही तर भावनांशीदेखील होतो खेळ… सायबर चोर अशा लोकांना हेरतात ज्यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे..अशा महिला किंवा पुरुषांशी मैत्री करुन, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर विविध प्रकारच्या गरजांच्या नावावर पैसे लुटले जातात.

5. सरकारनेदेखील दिलाय सतर्कतेचा इशारा… गृह मंत्रालयानेनेदेखील ऑनलाईन विवाह संस्थांच्या वेबसाईट्सवरुन होणाऱ्या फसवणुकीबाबत लोकांना सतर्क राहण्याचा संदेश दिलाय… अशा प्रकारच्या साईटवर स्वतःचे नाव नोंदवायचे असल्यास त्यासाठी वेगळा ईमेल आयडी तयार करण्याचे तसंच समोरील व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच विश्वास ठेवण्याचा सल्ला दिलाय.

6. ऑनलाईन विवाह संस्थादेखील घेताय सुरक्षिततेची काळजी लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना व्यक्तींना होत असलेली फसवणूक पाहता आता लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सनीदेखील खबरदारीची पाउलं उचलायला सुरुवात केलीय.. अनेक वेबसाईट्सवरआता ओळखपत्र, शिक्षण, नोकरीचे ठिकाण यांसारख्या गोष्टी तपासून मगच प्रोफाईल बनवण्यास परवानगी दिली जाते… अशा वेबसाईटवरचे मेसेजेसदेखील कुठेही कॉपी करता येऊ शकत नाही त्यामुळे ते सुरक्षित असतात आणि कोणी त्याचा चुकीचा वापर करु शकत नाही. यासोबतच बनावटी प्रोफाईल ओळखण्यासाठी मल्टी स्टेज प्रोफाईल रिव्युदेखील केले जाते.

7. धोक्याची घंटा ओळखा बनावट प्रोफाईल असलेली व्यक्ती तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत नक्की विचारेल.. ते तुमच्यासी लवकर मोकळेपणाने बोलायला सुरुवात करतील, तुमच्या प्रेमात पडले असल्याचे सांगतील, त्यांची कोणतीही सोशल मीडिया प्रोफाईल तुम्हाला सापडणार नाही…असली तरी त्यावर अगदी तुरळक माहिती आणि मित्रपरिवार असेल… एकाहून अधिक मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल…अशा व्यक्तीने त्यांच्या घरी एकटे बोलवल्यास किंवा कोणत्या हॉटेल रुममध्ये भेटायला बोलवले तर स्पष्ट शब्दात नकार द्या.. सार्वजनिक ठिकाणी भेटणे कधीही सुरक्षित आहे.

8. अशा फसवणुकीपासून कसे वाचाल ? अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्वतः सावध असणे कुप गरजेचे आहे. कोणावरही डोळे झाकुन विश्वास ठेवू नका… ज्यांना तुम्ही अजून भेटला नसाल अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, ऑनलाईन विवाह संस्थांच्या प्रोफाईल व्हेरिफिकेशन, सिक्योर मॅसेजिंग यांसारख्या सुविधांचा लाभ घ्या.. कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याविरुद्ध लगेच तक्रार करा…यामुळे आपण इतरांनाही फसवणुकीपासून वाचवू शकतो..

कुठे करायची तक्रार? जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडला असाल तर लगेचच नॅशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल –cybercrime.gov वर लगेचच तक्रार करा..किंवा 1930 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

Published: May 2, 2024, 11:29 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App