नोकरीच्या आमिषाने हजारो भारतीय बनले सायबर गुलाम

परदेशात नोकरीच्या आमिषानं अनेक भारतीय नागरिक सायबर गुलामीला बळी पडताय ...भारतातील एजंट्स डेटा एंट्रीची नोकरीचं आमिष दाखवतात.प्रत्यक्षात परदेशात गेल्यावर नोकरीऐवजी त्यांना कैद करण्यात येतं. . या कैद्यांचा वापर भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी होतो.

मी पोलिस स्टेशनमधून बोलतोय,तुमच्या मुलीचं आणि तिच्या मित्रमैत्रिणींचं अंमली पदार्थाच्या प्रकरणात नाव समोर आलंय,असा फोन मुंबईत राहणाऱ्या मोहनला आल्यानंतर तो घाबरुन गेला… पैसे देऊन प्रकरण मिटवा, असा सल्लाही फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिला. त्यानंतर तात्काळ मोहननं 30 हजार रुपये पाठवले… पैसे पाठवल्यानंतर मोहनने पुन्हा फोन लावला तर फोन बंद होता. या सर्व घटनेनंतर मोहननं मुलीला फोन केला आणि झालेल्या प्रकरणाची माहिती दिली. तर तिनं अशी कुठलीच घटना घडली नसल्याचं स्पष्ट केलं.त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचं मोहनच्या लक्षात आलं

मोहनप्रमाणेच अनेक जण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडतायेत… सायबर फसवणुकीसोबतच सायबर स्लेवरी म्हणजेच सायबर गुलामीचीही बाब उघड झालीय.

सायबर गुलामी म्हणजे नेमकं काय ?आणि लोक कशाप्रकारे अशा फसवणुकीला बळी पडताय? 

एखाद्याला कैद्याचा वापर सायबर चोरी करून घेणं याला सायबर गुलामी असं म्हणतात….

खास करुन पूर्व आशियातल्या अनेक देशांमधून सायबर गुलामीचे प्रकरणं उघडकीस आल्या आहेत.. केवळ कंबोडियामध्ये पाच हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना बंदी बनवण्यात आलंय. भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी वापरल जायचं. गेल्या 6 महिन्यात सायबर गुन्हेगारांनी भारतीयांना जवळपास 600 कोटींचा गंडा घातलाय,अशी माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आलीय.

परदेशात नोकरीच्या आमिषानं अने जण सायबर गुलामीला बळी पडताय …भारतातील एजंट्स डेटा एंट्रीची नोकरीचं आमिष दाखवतात.प्रत्यक्षात परदेशात गेल्यावर नोकरीऐवजी त्यांना कैद करण्यात येतं. .यानंतर या कैद्यांचा वापर भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी होतो. अशाच एखाद्या सायबर कैद्यानं मोहनला फसवलंय . भारतातील सायबर फसवणुकीचे दुवे पूर्व आशियातील अनेक देशांशी जोडलेले आहेत,असं एका अहवालात उघड झालंय…भाषेचा अडसर ठरु नये म्हणून सायबर गुन्हेगार भारतीयांनाच भारतीयांची लूट करण्यासाठी वापरताय

सायबर गुलामीमध्ये फसलेल्या अनेक भारतीयांना सरकारने मुक्त केलंय पण अजूनही अनेक जण परदेशात अडकलेले आहेत…सायबर गुलामीमधून सुटलेल्या एका भारतीय नागरिकानं कशाप्रकारचे गैरकृत्य करवुन घेतले जातंय याचा खुलासा केलाय.
GFX 3 IN
सुरूवातीला महिलांच्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करण्यात येतात. त्यानंतर सोशल मीडियावर सहज फसवता येईल अशा लोकांना शोधलं जातं. त्यानंतर व्यक्तींना नंतर फेक कॉल जाळ्यात ओढतात आणि पैसे लुटले जातात. सायबर फसवणुकीचं काम करण्यास नकार दिल्यास कठोर शिक्षा दिली जाते. अनेकदा मारहाण करतात, उपाशी ठेवलं जात असे तसंच विद्युत तारेचे झटकेदेखील देण्यात येतात,अशी माहिती सायबर कैद्यानं दिलीय.
GFX OUT

सायबर फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर नेहमी सतर्क राहा.
GFX 4 IN
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका… तसंच कोणीही फोन करुन मदत मागितल्यास लगेच विश्वास ठेवू नका.. सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहा… कोणी अचानक फोन करुन अडचणीत असल्याचं सांगून पैसे मागितल्यास सतर्क राहा आणि या घटनेची माहिती पोलिसांना द्या. मी पोलिस आहे,असं कुणी फोनवरून सांगितलं तरीही
त्याला दहा प्रश्न विचारा. उदाहरणार्थ नाव, पद तसंच कोणत्या पोलिस स्टेशनमधून बोलत आहात असे अनेक प्रश्न विचारा… घाबरुन जाऊ नका.
GFX ४ OUT
घाबरलेल्या व्यक्तीला फसवणं सायबर गुन्हेगारांसाठी हाताचा मळ असतो. त्यामुळे सतर्क राहा आणि सावधान रहा…

ALPHA GFX

ALPHA

Published: April 29, 2024, 17:23 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App