केवायसी अपडेट करणे का आहे गरजेचे ?

केवायसी अपडेट न केल्यास कोणत्याही फिनटेक ऍप किंवा पेमेंट ऍपवर तुमचे पॅन कार्ड लिंक केले असेल तर त्याचा उपयोग कोणीही अनोळखी व्यक्ती कोणतेही डिजीटल लोन घेण्यासाठी वापरु शकतो.अशा एक नव्हे तर अनेक घटना घडल्या आहेत..

RBI ने पेटीएमवर KYC च्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली
या कारवाईचा इतर फिनटेक कंपन्यांनीही धसका घेतलाय आणि त्यांनीही त्यांची केवायसी प्रक्रिया सदोष होण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत…(२) केवायसी प्रक्रिया नियमाप्रमाणे नसल्याचे लक्षात आल्यास सरकार त्या कंपन्यांवर आता रोख दंड तसंच कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यापर्यंत पाऊल उचलणार आहे… त्यासाठी
केवायसी प्रक्रिया गरजेची का आहे? 
केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर,यात ग्राहकाचा पत्ता आणि ओळखपत्र हे बँक किंवा कर्ज देणाऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेला ग्रााहकाने देणे अपेक्षित असते.केवायसी बँक, वित्तीय संस्था आणि ग्राहक यांच्यात एका दुव्याप्रमाणे काम करत असते. त्यामुळे ते करणे अत्यंत आवश्यक आहे.. पण पेटीएमच्या बाबतीत अनेक ग्राहकांची केवायसी प्रक्रिया करण्यातच आली नाही तर बऱ्याच केवायसी प्रक्रियांमध्ये गोंधळ झाल्याचे लक्षात आले.
पॅनकार्डचा गैरवापर 
आता हे समजून घेणे गरजेचे आहे की या गोंधळाचा ग्राहकावर काय परिणाम होऊ शकतो…जर तुम्ही कोणत्याही फिनटेक ऍप किंवा पेमेंट ऍपवर तुमचे पॅन कार्ड लिंक केले असेल तर त्याचा उपयोग कोणीही अनोळखी व्यक्ती कोणतेही डिजीटल लोन घेण्यासाठी वापरु शकतो…अशा एक नव्हे तर अनेक घटना घडल्या आहेत…प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीच्या पॅनकार्डचा गैरवापर करुन एका अज्ञात व्यक्तीने तिच्या नावे कर्ज घेतले होते.. तक्रार केल्यानंतरदेखील सदर ऍपकडून तिची कोणतीही मदत करण्यात आली नाही,असा दावा  सनी लिओनीने केला.अशा घटनांमध्ये ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर चेक केल्यानंतर किंवा क्रेडिट हिस्ट्री चेक केल्यानंतरच फसवणूक झाल्याचे समजते… त्यांच्या नावे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कर्ज घेतल्याने आपले आर्थिक नुकसानच होतेच पण आपला सिबिल स्कोरही खराब होतो…
केवायसीमध्ये गोंधल झाल्यास तर केवळ ग्राहकावरच नाही तर पूर्ण वित्तीय संस्थेवर त्याचा दुष्परिणाम होतो. यामुळे बँकेच्या कामकाजावरचा लोकांचा विश्वास उडतो आणि हळूहळू याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसतो..
केवायसी अपडेट न केल्यानं फसवणूक
केवायसी फसवणूकीची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसतेय.ग्राहकांनी जागरुक होणे गरजेचे तर आहेच पण (8)तुम्ही  वापरत असलेल्या विविध अॅप विश्वासार्ह आहेत का ते पाहा. वेळोवेळी आपला सिबिल स्कोर तपासत राहा . यामुळे तुमच्या पॅनकार्डच्या दुरुपयोगाला आळा बसेल तसंच यूपीआयचा वापर आपल्या रोजच्या खर्चासाठी करणे जास्त फायदेशीर आहे..कोणत्याही पेमेंट अॅपवर किंवा वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापेक्षा युपीआयचा वापर जास्त सुरक्षित आहे तर नेहमी सावध रहा, सतर्क रहा आणि  आर्थिक जोखिमांपासून वाचण्यासाठी पाहत राहा मनी9 मराठी….
Published: March 30, 2024, 18:17 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App