ग्राहकांमध्ये भ्रम तयार करून बँका करतात कमाई

बॅका कर्ज मंजूर करताना छुप्या छुल्काची माहिती देत नाहीत.तसेच ऑनलाईन कर्ज घेतल्यानंतर बँकेत येऊन कर्ज बंद करा असा सांगतात.

एकदाही बँकेत न जाता मोहितला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं कर्ज मंजूर झालं. आता, मोहितला मुदतीआधीच परतफेड करून कर्जाचं खातं बंद करायचं होतं. मात्र, बँकेनं ऑनलाईन पद्धतीनं कर्जाऊ खातं बंद करता येणार नाही त्यासाठी बँकेतंच यावं लागेल अशी अट घातली.ऑनलाईन कर्ज बंद करण्यासाठी बँकेत जाण्याची काय गरज आहे ? असा प्रश्न मोहितला पडलाय.

खरंतर बँका जाणुनबुजून असे जाचक नियम तयार करतात. नियमाला कंटाळलेला कर्जदारावर लवकर बँकेत येण्यासाठी वेळ काढू शकत नसल्यानं कर्ज सुरूच राहते. बँकेच्या या व्यवहाराला म्हणतात डार्क पॅटर्न.
आता हा डॉर्क पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे ? हे पाहूयात.
स्पष्ट सांगायच झाल्यास, डार्क पॅटर्नचा उपयोग ग्राहकांचा खिसा रिकामा करण्यासाठी वापरला जातो. सरकारही डॉर्क पॅटर्नकडे गांभीर्याने पाहतेय.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांच्या खरेदी आणि इतर गरजांना प्रभावित करण्यासाठी डार्क पॅटर्नचा वापर करून भ्रमित करताय,असं मत ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी व्यक्त केलंय.
आता केवळ ऑनलाईन शॉपिंग कंपन्याच नाही, तर ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्मदेखील डार्क पॅटर्नचा वापर करताय. कर्ज घेणारे ग्राहक हे बँकांचं लक्ष आहे.

पर्सनल लोन मंजुर करताना ग्राहकांना छुप्या शुल्कांची माहिती दिली जात नाही. ग्राहकाला विनातारण 8 टक्क्यांनी कर्ज देण्यात येईल असे सांगण्यात येते. पण नंतर वेगवेगळे शुल्क आणि नियम लावण्यात येतात. ग्राहकाला तब्बल 36 टक्क्यांपर्यंत व्याज भरावे लागते.याची माहिती कर्जदाराला देण्यात येत नाही.

deep pricing किंवा hidden charges या डार्क पॅटर्नची खूप चर्चा आहे. ग्राहकाला प्रीमियम क्रेडिट कार्ड मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पहिल्याच बिलात हजारो रुपयांचे शुल्क लावले जातात.या शुल्कांची कल्पना कार्ड देताना ग्राहकांना दिली जात नाही.
डिप प्राइसिंगमध्ये उत्पादनाची किंमत कमी सांगितली जाते. पण
डिप प्राइसिंगमध्ये उत्पादन किंवा सेवेची किंमत कमी सांगितली जाते. पण नंतर खरेदी करतांना बिलामध्ये वाढीव किंमत पाहून आपल्याला धक्का बसतो.

ऑनलाईन बँकिंगचा वापर करणारे 60 टक्के ग्राहक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत,अशी माहिती LocalCircles ने केलेल्या एका सर्वेक्षणात उघड झाली आहे .देशाच्या 363 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय. बँकेच्या छुप्या खर्चाला 63 टक्के लोकं बळी पडलते. interface interference मुळे 41 टक्के ग्राहक त्रस्त असल्याचीही माहिती या सर्वेक्षणातून मिळाली आहे.

interface interference मध्ये ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगमध्ये अतिरीक्त गोष्टी किंवा स्किम घेण्यासाठी प्रभावित केलं जातं. subscription traps नावाचा असाच आणखी एक प्रकार आहे.

एखाद्या ग्राहकांनं ऑनलाईन प्रोडक्ट किंवा सर्विससाठी सबस्क्राईब केल्यास वारंवार शुल्क वसूल केली जाते. इच्छा असूनही अनेकदा ग्राहकाला ती सेवा लवकर बंद करता येत नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान होतच राहते…याशिवाय 39 टक्के ग्राहकांना Bait and Switch चा फटका बसलाय. यात कर्जाच्या आकर्षक व्याज दराच्या नावानं अव्वाचा सव्वा व्याज दर आकारला जातो.
सरकारकडून डार्क पॅटर्नवर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तरीही लोकांना फसवण्याचे हे सत्र अद्याप थंडावलं नाही

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोव्हेंबर 2023 मध्ये ग्राहकांच्या अधिकारांच्या सुरक्षेसाठी ‘डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. ही अधिसूचना भारतातील सर्वच वस्तू,सेवा देणारे सर्व प्लेटफॉर्म, जाहिराततदार आणि विक्रेते यांना लागू आहे.

ऑनलाईन बँकिंगच्या या डार्क पॅटर्नपासून स्वतःला वाचवायचे असल्यास ग्राहकांनी कर्ज घेतांनी सर्व अतिरीक्त शुल्काबद्दल कसून चौकशी करावी..कर्जावरील मूळ व्याजदर काय ?, कर्जाच्या वार्षिक टक्केवारी दर म्हणजे APR ची लिखित माहिती मागा. ऑनलाईन ऑफलाईन कर्ज किंवा कोणतेही कार्ड घेण्याअगोदर सर्व अटी आणि नियमांची नीट माहिती घ्या..

अनेकदा अटी आणि नियमाच्या ठिकाणी तुम्हाला एक छोटा स्टार दिसत असतो. अटी आणि नियम कशाप्रकारे लागू असणार आहेत याची महत्त्वाची माहिती त्या स्टारमध्येच दडलेली असते. डार्क पॅटर्नमुळे तुमची फसवणूक झाल्यास तक्रार करा. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमाकांच्या 1915 या नंबरवर संपर्क करा ..किंवा व्हॉट्सपवर 8800001915 या नंबरवर लेखी तक्रार दाखल करा.

 

Published: April 2, 2024, 13:04 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App