सावध राहा,अन्यथा तुमचाही क्रेडिट कार्ड हॅक होऊ शकतो

बहुतांश बँका क्रेडिट कार्डसंदर्भातील आवश्यक कामे आउटसोर्स करतात. आउटसोर्सिंगचं करणाऱ्यांकडून डेटा लीक होऊ शकतो. माहिती सायबर चोरांना विकली जाऊ शकते. तुमचा फोन हॅक किंवा हरवल्यास कार्डचा तपशील चोरता येतो.

तुमच्याकडे Axis बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. Axis बँकेच्या क्रेडिट कार्डमुळे अनेक जणांची फसवणूक झालीय . बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर तक्रार सुद्धा केली आहे. अनेक जणांनी कोणतीही खरेदी केली नसतानासुद्धा त्यांना OTP येत होत्या.  क्रेडिट कार्डचा वापर करून अनधिकृतपणे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यात येत होते.
आपण बँकांच्या कार्डला सुरक्षित मानतो. मग असं का होतंय ? आज एका बँकेच्या कार्डसोबत झालेला हा प्रकार उद्या इतर बँकांच्या कार्डबाबतही होऊ शकतो.

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ज्या ग्राहकांनी कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मान्यता दिलीय त्यांना अशा प्रकारचे मेसेज येत आहेत.त्यांच्या कार्डद्वारे असे व्यवहार होत आहेत तसेच त्यांना या व्यवहारासाठी otp सह इतर मेसेजेस सुद्धा येत आहेत. क्रेडिट कार्डमधील माहिती चोरीला गेलीय म्हणजेच डेटा हॅक झालाय. ग्राहकांनी या बाबतीत बँकेकडे तक्रार केलीय.
काय आहे बँकेचा सल्ला?
बँकेनं ग्राहकांना आंततराष्ट्रीय व्यवहार डिसेबल करण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डिसेबल झालं आहे की नाही याची खात्री करा.
एखाद्या बँकेच्या कार्डचा डेटा चोरून आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी कार्ड वापर करून फसवणूक करण्याची ही पहिलीच घटना आहे. ((lower या प्रकरणी डेटा चोरी झाल्याची माहिती आहे)) आणि त्याबाबत अनेक तक्रारीही प्राप्त झाल्यात.

दरम्यान axis बँकेनं क्रेडिट कार्डस सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलंय. याशिवाय यंत्रणा हॅक झाली नसल्याचंही स्पष्ट केलंय.
अनधिकृत व्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना ब्लॉक करण्यात आल्याची माहितीही बँकेनं दिलीय. कार्डमधील काही प्राथमिक माहिती वापरून फसवणूक करण्यात आली आहे. फसवणुकीची रक्कम लहान आहे आणि संपूर्ण रक्कम वसुल करण्यात येणार असल्याचंही बँकेनं माहिती दिलीय. बँक त्यांची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नात आहे.यासाठी प्रगत व्यवहार निरीक्षण प्रणालीचा वापर करण्यात येतो.. हा BIN हल्ला असू शकतो,असंही बँकेनं माहिती दिलीय.
काय आहे BIN हल्ला?
BIN हल्ल्याला bank identification number हल्ला असेही म्हणतात .ही एक प्रकारची क्रेडिट कार्ड फसवणूक आहे. या फसवणुकीत सायबर गुन्हेगार कम्युटरच्या मदतीने विविध कार्डच्या क्रमाकांचं कॉम्बिनेशनची चाचणी करतात. या चाचणीतून सध्या सुरू असलेला एक क्रेडिट कार्डचा नंबर तयार करतात.कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधील सुरूवातीच्या 6 अंकांना bin असे म्हणतात. या बिनचा वापर करून कार्ड कोणत्या बँकेनं अथवा आर्थिक संस्थेनं जारी केलंय याची माहिती सायबर गुन्हेगारांना मिळते.
आता हा डेटा लीक कसा झाला? हा एक मोठा प्रश्न आहे. या ((lower सायबर गुन्हेगारांकडे क्रेडिट कार्डचा तपशील कसे पोचला?)) याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणतात ते पाहूयात. . सर्वात महत्वाचे कारण म्हणजे

बहुतांश बँका क्रेडिट कार्डसंदर्भातील आवश्यक कामे आउटसोर्स करतात. आउटसोर्सिंगचं करणाऱ्यांकडून डेटा लीक होऊ शकतो. माहिती सायबर चोरांना विकली जाऊ शकते. तुमचा फोन हॅक किंवा हरवल्यास कार्डचा तपशील चोरता येतो.
तुमच्या क्रेडिट कार्डचा डेटा लीक झाल्यास व्यवहारासंबंधी मेसेज यायला सुरुवात होते. तुमच्यावर अशी परिस्थिती ओढू नये यासाठी काय करावं ? तुम्हाला स्वतःला सतर्क राहावे लागणार आहे.सावध राहिल्यासच तुमची फसवणूक टळू शकते.

फसवणूक झाल्यानंतर काय कराल ?

तुमची अशी फसवणूक झाल्यास ताबडतोब बँकेकडे तक्रार करा .बँका तुमच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतील . अशा प्रकरणांमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. बँकेनं तुमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुम्हाला आरबीआयच्या लोकपालकडे तक्रार करता येते. तसेच सोशल मीडियाचाही वापर करून आपली तक्रार मांडा. त्यामुळे इतर ग्राहक जागरूक होतील.

 सावधपणे क्रेडिट कार्ड वापरा

तसेच एखाद्या हॉटेलमध्ये किंवा खरेदी करताना कार्ड वापरत असल्यास नीट लक्ष ठेवा  .तुमच्या डोळयादेखत transaction पूर्ण करा. यामुळे तुमच्या कार्डचा तपशील चोरीला जाण्याचा धोका कमी होतो. ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर कार्ड वापरताना टोकनझायशेनचा वापर करा. टोकनायझेशनमुळे कार्डचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतील .
क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उपाय करा… जागे रहा आणि या फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करा.

Published: April 16, 2024, 12:29 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App